Posts

Showing posts with the label moviereview

आनंदी गोपाळ

Image
खरं तर हल्ली लिहायचा खूप कंटाळा येतो! म्हणजे आळस वाढलाय असो... वीकेंड ला अमृता (बायको) , सूर(मैत्रीण) आणि नीलम (मित्र) ) गेलेले ह्या मूवी ला, मी आणि आई (शुभदा) अन्वया(मुलगी माझी) साठी थांबलो, मला पण जाता आलं असतं पण मी इतका 'कीन' नव्हतो, का कुणास ठाऊक, रिव्हुज भारी होते, गाणी पण छान तरी बघायचा का नाही ह्यावर स्वतःशीच दुमत होत होतं, पण मग घरच्या लोकांनीच "बघ रे, मस्तय... सुंदर अभिनय... मिनिमम मेकअप" असा घरगुती रिव्ह्यू दिल्या नंतर राहावे ना, ऑफिसातून ६:३०ला निघून ७:१५ला घरी आलो, येताना अमृताला माझं आणि आईचं तिकीट काढायला लावलं, मग संध्याकाळचं ऑफिसचं ट्राफिक कापत १०मिनिटाच्या रोड वर ३०मिनीट काढत पोचलो, ७:५०च्या शो ला ८:०५ला, शेजारच्या एका अगडबम्ब देहाला "कधी सुरु झाला हो?*" असं विचारलं त्यानेही अगदी कौजुअली "काही जास्त नाही, जस्ट इन्ट्रोडक्शन मिस केलत... ३/४मिनिटेच झाली, जास्त नाही" असं सांगितलं न मला जरा बरं वाटलं. 😂 आता चित्रपटा बद्दल... मी अभ्यास करून, गूगल वर नावं वगैरे शोधून कलाकार किंवा इतर मंडळींची नावं लिहीत रिव्ह्...

तमाशाल्लाह!

Image
तमाशाल्लाह! मुद्दामूनच लोकांची मतं नजरअंदाज करत चित्रपट पाहायला गेलो, इंटरवल पर्यंत चित्रपटातली तीन गाणी संपली, आता तीन उरलेली, आता इंटरवल का असतो हा नेहमीचा प्रश्न पडला, ठरल्या प्रमाणे इंटरवल नंतर पोटाच्या आकाराचे मोठे सॉल्टेड-पॉपकॉर्नचे डबडे घेऊन जागेवर येऊन बसलो... ह्यावेळी त्या डबड्यात मध्येच एक कैरेमलचा पॉपकॉर्न मिळाला, तसा होता 'तमाशा' एकदम हटके! इम्तियाझ अली... मानला बुआ! एक वेगळाच अनुभव, भारतीय सिनेमा आणि संगीत रंगभूमी ह्यांचा सुंदर मिलाप! आणि ह्यातून काय मस्त खुलावतो तो विचारांचे अंतरंग, विविध पेहलू, बारकावे... सध्या तरी कोणी दिग्दर्शक त्याला हात लाउ शकेल असे वाटत नाही, रॉकस्टार मग हायवे आणि आता तमाशा, सर्वांचा आत्मा एक! त्याचं म्हणणं एकच 'स्वतःला ओळखा!' रहमान आणि इम्तियाझ यांची जोडी तर आता इतकी मस्त जमली आहे! 'दो जिस्म इक जान है हम' असा काहीसा प्रकार झालाय, तमाशामधून परत एकदा इम्तियाझचे डोळे आणि रेहमानचे कान उधार घेऊन चित्रपट पाहिल्याचे असीम सुख मिळते! चित्रपटात गाणी अखंड न वापरण्याचा शाप आहे रहमानच्या गाण्यांना... मला त्याची नेहमी ख...

'द मार्षन'

Image
'द मार्षन' ३आठवड्यांपूर्वी 'एवेरेस्ट' (आइमैक्स थ्रीडी) पाहिला, मग मागच्या आठवड्यात 'द वॉक' (आइमैक्स थ्रीडी) आणि आज हा!  'द मार्षन' (मैक्स थ्रीडी) तीनही एकसेबढ कर एक!!! 'एवेरेस्ट' आणि 'द वॉक' हे दोन्ही उत्कृष्ट 'थ्रीडी' अनुभाव साठी पहावे असे... आणि 'द मार्षन' खास 'मैट डेमन' साठी पहावा! अप्रतिम गंभीर विषय असून विरंगुळायुक्त अश्या काही विचित्र 'जॉनर'चा 'द मार्षन' ****

Ringing phone has to be answered, doesn't it? 'फोन बूथ'

Image
Isn't it funny? You hear a phone ring ... and it could be anybody. But a ringing phone has to be answered, doesn't it? 'फोन बूथ' हा चित्रपट १दाच पाहिलाय  विजय चित्रपट गृह, पुणे… २००२ एप्रिल  जिथे जास्त करून इंग्लिश चित्रपटच लागायचे  दीड तास खीळवून ठेवलेलं ह्या 'फोन बूथ'नी  कॉलीन फेर्रेल, त्याचं नाव 'स्टू' पूर्ण नाव स्त्युअर्ट शेफर्ड  खोटार्डा, लोकांना फसवून पैसे कमावणारा , जशास तसे घडले त्याच्या बाबतीत! एकानी अद्दल घडवली त्याला! एकाच 'लोकेशन' वर असूनही अप्रतीम वेग असलेला 'फोन बूथ' कमीत कमी 'बजेट' मध्यॆ केलेला, अतिशय सुसाट कथानक असलेला 'फोन बूथ' 4Starts from me! # सशुश्रीके | ९ ऑक्टोबर २०१४