आनंदी गोपाळ



खरं तर हल्ली लिहायचा खूप कंटाळा येतो!

म्हणजे आळस वाढलाय

असो...

वीकेंड ला अमृता (बायको) , सूर(मैत्रीण) आणि नीलम (मित्र) ) गेलेले ह्या मूवी ला, मी आणि आई (शुभदा) अन्वया(मुलगी माझी) साठी थांबलो, मला पण जाता आलं असतं पण मी इतका 'कीन' नव्हतो, का कुणास ठाऊक, रिव्हुज भारी होते, गाणी पण छान तरी बघायचा का नाही ह्यावर स्वतःशीच दुमत होत होतं, पण मग घरच्या लोकांनीच "बघ रे, मस्तय... सुंदर अभिनय... मिनिमम मेकअप" असा घरगुती रिव्ह्यू दिल्या नंतर राहावे ना, ऑफिसातून ६:३०ला निघून ७:१५ला घरी आलो, येताना अमृताला माझं आणि आईचं तिकीट काढायला लावलं, मग संध्याकाळचं ऑफिसचं ट्राफिक कापत १०मिनिटाच्या रोड वर ३०मिनीट काढत पोचलो, ७:५०च्या शो ला ८:०५ला, शेजारच्या एका अगडबम्ब देहाला "कधी सुरु झाला हो?*" असं विचारलं त्यानेही अगदी कौजुअली "काही जास्त नाही, जस्ट इन्ट्रोडक्शन मिस केलत... ३/४मिनिटेच झाली, जास्त नाही" असं सांगितलं न मला जरा बरं वाटलं. 😂

आता चित्रपटा बद्दल...

मी अभ्यास करून, गूगल वर नावं वगैरे शोधून कलाकार किंवा इतर मंडळींची नावं लिहीत रिव्ह्यू देणार नाहीये बर का.

सगळ्यांनी आपापल्या डीपार्टमेंट मध्ये देर्जेदार काम केलेले आहे 👌

त्या 'बालक पालक' मधल्या मुलीने, 'चि. आणि चि सौका' मधल्या हिरोने परफेक्ट १८७०/८०च्या काळातला अभिनय साकारलाय, ह्यांनीच काय तर अगदी एक्ष्ट्राज कडून सुद्धा त्यांच्या परीने सुंदर अभिनय केलाय.

महत्वातचं म्हणजे आर्ट डिपार्टमेंट! फ्रेम्स... पार्श्वसंगीत, गाणी... हे सगळं कुठेच मागे पडलय असं वाटतच नाही.

अजून एक आवर्जून सांगावस वाटतं ते म्हणजे अलिबाग बद्दल, तिथे लहानपण घालवलं आहे, तिथली घरं निसर्ग सिनेमात पाहून काय झक्कास वाटतं सांगू! दिलं खुश एकदम 💕🙏🏼

आता कथानका बद्दल.. सरळ सुटसूटीत, हे असं का झालं, हे पटलच नाहीये वगैरे प्रश्न कधी पडला नाही. आता जरा मसाला ऍड केलाय कुठे कुठे, पण तो हवाच जरा, शेवटी चित्रपट आहे, डॉक्युमेंटरी नाही!

'गोपाळराव जोशी.' ह्या माणसाला पण आनंदीबाईं इतकच महत्व आहे, आणि त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबाला ही, १८७०च्या काळात सासू ने... अरे हो! साधी सुधी सासू नाही, तर गोपाळरावांच्या आधीच्या बायकोची आई! त्यांनी साथ द्यावी आनंदीबाईंना शिक्षणासाठी, हॅट्स ऑफ!

धम्माल म्हणजे गोपाळरावांच्या आधीच्या बायकोचा मुलाचे कैरेकटर! 😂 हा तर एक नंबर आहे, जरा कुठे विषय सिरीयस होणार की हा येतो न चड्डीच काढतो त्या सिरियस झालेल्या सीनची,  अर्थात कथानक पुढे जायला असली हलक्या फुलक्या गंमतीची छान गुंफण आहे शेवटपर्यंत!


मध्यांतरा आधी हळू हळू शिक्षणाचा खडतर प्रवास आजून खडतर होणार ह्याची प्रचीती येते, आणि तसच होतं, जिद्द... ओढ, स्वप्न आकांक्षा सगळ्या शिगेला पोचतात, आनंदीबाई एकटी अमेरिकेत जाणार शिक्षणाला, त्यात गोपाळरावांना काम मिळत नसतं अश्या सगळ्या चिंतेच्या गर्दीत शेवटचा प्रवास आहे, तुम्ही हरवून जाता चित्रपटात... हेच तर यश आहे दिग्दर्शकाचं!

खूप छान मांडणी, केवळ अप्रतिम!

चित्रपटाच्या शेवटी ३०/४० भारतीय महिलांचे फोटोज आणि त्यांची एक ओळीची माहिती असा व्हीडिओ आहे, म्हणजे इंडियाज फर्स्ट लेडीज पायलट पासून अत्ताच्या बॅडमिंटनपटू सिंधू पर्यंत, खरच अभिमानास्पद सगळं! ही बाई जमात भारी.. आई बायको आजी मावशी... सगळ्या कोण, बाई जमात! हे सगळं घर सांभाळून, मान गए!

असो, चला झोपतो... 'आनंदी नाईट' 😊




#सशुश्रीके | १७ फेब्रुवारी २०१९


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!