Posts

Showing posts with the label people

आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव!

Image
दुबई मेट्रो! आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास  (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव! नेमकी आज मेट्रो मध्ये तोबा गर्दी, त्यात इथे मुंबई सारखं वरती पकडायला काही नसतं, त्यामुळे मेट्रोनी पिकअप घेतला की सगळे टेन्शन मध्ये येतात! ज्यांना बाजूच्या स्टील बार्सचा आधार असतो किंवा जे टेकून उभे असतात त्यांचं चालून जातं हो, पण ज्यांना कसलाच आधार नाही त्यांचे वांदे, मग ह्याच्यापायावर पाय, त्याच्या कंबरेत/पोटावर हात, कुठेतरी(कोणालातरी) पकडून उभे राहायचा सभ्य प्रयत्न! आणि मग मेट्रोला एकदाची स्थिर गती प्राप्त झाली की मग पूर्ववत अवस्थेत येउन कोणी जोक झाल्यासारखं हस्तं, कोणी शरीराला भोक पडल्यासारखं तोंड करतं, कोणी अशी खुन्नस देतात की विचारू नका! सगळे आपल्या आपल्या स्वभावा नुसार 'रीएक्ट' होतात. #सशुश्रीके । २१ ऑक्टोबर २०१५

थोडसं खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!

Image
ये तारा वो तारा हर तारा… देखो जिसे भी लगे प्यारा ये सब हो साथ मे, तो जगमगाया आसमां सारा! जगमग तारे, दो तारे, नौ तारे, सौ तारे, हर तारा ही शरारा… ये तारा वो तारा... अन्वया ला ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं... शहारे आले ऐकून आणि बघून ही! त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा! जमिनीवर सारवलेल्या शेणाचे तुकडे तोडत, कितीही झोप आलेली असताना, एकही सीन वाया न घालवता शेवटपर्यंत! कोणी शाल ओढून कोणी जैकेट अडकवुन! सुंदर चांदण्याचा प्रकाश, गावातल्या शाळेच्या आवारात, अर्धे ओळखीचे-अर्धे अनोळखी... पण काही दमदार / हास्यास्पद सीन घडला की जन्मोजन्मांतरी ओळख असल्यासारखी टाळी / दाद द्यायचे! खुप अप्रूप असायचं, आता घरोघरी टीव्ही झालेत, तेव्हा १०घरांपैकी २घरांकडे ब्लैकएंडव्हाइट आणि एकाकडे कलर टीव्ही असे, आणि असे सार्वजनिक चित्रपट वर्षातून एक-दोंदाच! हे असे मी सारखे सारखे भुतकाळात का जातो! वर्तमान का...

STRESS!

हल्ली तरुण वयातच हाय बीपी, शुगरचे प्रोब्लेम्स व्हायचे प्रमाण वाढलेत राव! माझ्या मामालाच ३६-३७वयाच्या असताना एकदा हार्टअट्टेक येऊन गेलाय, ३०वर्षाच्या एका मित्राला शुगर डीटेक्ट झालेली.. आणि पर्वाच एक जवळच्या मित्राला अंग जड़ वाटायला लागले विशेष करुन डावा हात... रात्री १२वाजता इमर्जंसी तपासणी केली... दुसऱ्या दीवशी रिपोर्ट मध्ये 187ब्लडप्रेशर डीटेक्ट झाले, खुप स्ट्रेस घ्यायचे परिणाम! डॉक्टर म्हणाले दुबैत राहायचे असेल तर स्ट्रेस घेऊ नका...ते जमत नसेल तर दुबई सोडा! हल्ली कामात स्ट्रेसचे प्रमाण वाढले आहे अश्यात अवेळी जेवण / कमी झोप + योगा /व्यायाम ह्या बबतीतली उदासीनता... एकूणच स्ट्रेस लेवल डोक्यवारुं मनावर घेतल्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय! सर्वांनाच आनंदी राहायला जमत नाही.. किवा आनंदी राहणे म्हणजे जे काम आवडते तेच करणे हे ही आता चौकटीच्या बाहर जात आहे (एक्स्ट्रा वर्किंग आवर्स)... उपाय काय!? • भोसड्यात जाओ दुनिया मी बरा माझे काम बरे • लै झाली दुनियादारी • मी कशाला स्ट्रेस घेऊ... देतो त्यापेक्षा... असे विचार करण्याऱ्यांची संख्या वाढत जाणार नक्कीच! ‪#‎ सशुश्रीके‬

'आन्ना' वय वर्ष ४५

Image
'आन्ना' वय वर्ष ४५ त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं,  त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची, आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला... काळा वर्ण पांढरी दाढी, पट्टेरि हाप चड्डी, इतर वेळी फूल पांढरा मळका शर्ट, कामाच्या वेळी फूल बनियान, पांढऱ्या निळ्या स्लीपर्स, गळ्यात रुमाल, दात पुढे, आणि त्याची दोन मुलं, सेम टू सेम त्याच्या सारखीच दिसायला आणि वागायला ही, एखादं काम सांगितलं की नाही असं कधी ऐकलच नाही आम्ही. हल्ली जेल लावून (तारे जमीं पर मधल्या आमिर अठवा) कसे 'यो' दीस्तात! तशी सेम हैरस्टाइल होती आन्नाची, फ़क्त जेल ऐवजी चापडून तेल लावयचा, चहा प्यायला पायऱ्यांवर बसला की अक्ख्या गावच्या खबरा सांगत हातातली कपबशी मधला चहा पटापटा संपवायचा भुरके मारत, कोळी स्टाइल कधी कधी लुंगी पण घाटलेला पाहिलाय मी, लांब जाऊन...