'आन्ना' वय वर्ष ४५

'आन्ना' वय वर्ष ४५
त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं,  त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची,
आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला... काळा वर्ण पांढरी दाढी, पट्टेरि हाप चड्डी, इतर वेळी फूल पांढरा मळका शर्ट, कामाच्या वेळी फूल बनियान, पांढऱ्या निळ्या स्लीपर्स, गळ्यात रुमाल, दात पुढे, आणि त्याची दोन मुलं, सेम टू सेम त्याच्या सारखीच दिसायला आणि वागायला ही, एखादं काम सांगितलं की नाही असं कधी ऐकलच नाही आम्ही.

हल्ली जेल लावून (तारे जमीं पर मधल्या आमिर अठवा) कसे 'यो' दीस्तात! तशी सेम हैरस्टाइल होती आन्नाची, फ़क्त जेल ऐवजी चापडून तेल लावयचा, चहा प्यायला पायऱ्यांवर बसला की अक्ख्या गावच्या खबरा सांगत हातातली कपबशी मधला चहा पटापटा संपवायचा भुरके मारत, कोळी स्टाइल कधी कधी लुंगी पण घाटलेला पाहिलाय मी, लांब जाऊन ब्रिस्टल ओढायचा की काम सुरू...

हे सगळ वर्णन १९९०च्या अलीकडलं... तेव्हा तो ४५वगैरे चा असणार, आता ६५+ चा नक्कीच, आक्षीचं घर/जागा सर्व विकलं ६-७वर्षापूर्वी, नंतर कधी भेटता आलं नाही, आणि कधी ती वेळ येईल असं वाटत नाही.

आन्ना सारखे खुप चेहरे अजुन त्याच 'वयात' फ्रीझ झालेले आहेत, ते तेव्हढेच तरूण आणि मी ही तेव्हढाच लहान आहे अजुन, 'माइचा पोरगा ना रे तू' 'आप्पांचा नातू ना रे तू' अश्या लोकांच्या हाका अजुनही रास्त्यावर जिवंत आहेत, इंदुमतीचं दूकान, बपटांचं घर, चिटणीसांची वाडी, दातारांचा टीव्ही, गणपतीचं देऊळ, त्याच्याच डाव्याबाजूला असलेला फोरिनरनी विकत घेतलेलं घर, त्याचा समोर भीड्यांचं अर्ध पडलेलं/पाडलेलं घर, गोळा वाला राजू भैया, कुल्फी वाला, पोस्टमन काका... हे सगळे अजुन ही दिसतात... सगळे आठवतात!

आन्ना त्यांच्या पैकीच एक... वय वर्ष ४५



#सशुश्रीके | २९ जानेवारी २०१५ | रात्रीचे १२.४५

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!