आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव!


दुबई मेट्रो!

आज उशीर झालेला मला वाटलं गर्दी नसेल म्हणून गोल्ड क्लास (उच्च श्रेणी) न घेता सिल्वर क्लास  (दुय्यम श्रेणी) मध्ये चढलो, पण दुर्दैव!

नेमकी आज मेट्रो मध्ये तोबा गर्दी, त्यात इथे मुंबई सारखं वरती पकडायला काही नसतं, त्यामुळे मेट्रोनी पिकअप घेतला की सगळे टेन्शन मध्ये येतात! ज्यांना बाजूच्या स्टील बार्सचा आधार असतो किंवा जे टेकून उभे असतात त्यांचं चालून जातं हो, पण ज्यांना कसलाच आधार नाही त्यांचे वांदे, मग ह्याच्यापायावर पाय, त्याच्या कंबरेत/पोटावर हात, कुठेतरी(कोणालातरी) पकडून उभे राहायचा सभ्य प्रयत्न! आणि मग मेट्रोला एकदाची स्थिर गती प्राप्त झाली की मग पूर्ववत अवस्थेत येउन कोणी जोक झाल्यासारखं हस्तं, कोणी शरीराला भोक पडल्यासारखं तोंड करतं, कोणी अशी खुन्नस देतात की विचारू नका! सगळे आपल्या आपल्या स्वभावा नुसार 'रीएक्ट' होतात.

#सशुश्रीके । २१ ऑक्टोबर २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!