Posts

Showing posts with the label school

आठवणींचा पत्ता

Image
या मेंदूच्या महालात काही असे कोनाडे असतात. दुर्लक्षित, काळोखात हरवलेले, जळमटांनी भरलेले... त्यात डोकावलं की पुढे पडलेले पाऊल परत मागे जातं, नको नको म्हणत! काही प्रसंग जे विसरून जावेसे वाटतात, आणि हे वाटतानाच सारखे सारखे आठवण करू देतात, तशीच एक आठवण. मॉडर्न हायस्कूल, जंगली महाराज रोड . परीक्षेचे दिवस, मी आपला जसा जमेल तसा पेपर लिहून मोकळा झालेलो, तितक्यात आमच्या वर्गातला एका मुलाला घाईची शी लागली म्हणून तो बाईंना विचारून धावत पळत वर्गाबाहेर गेला, आईने सांगितलेले पेपर झाला असला तरी वेळ झाली कीच वर्गाबाहेर पडायचं, लवकर बाहेर पडून घरी लवकर यायचं नाही! तो सल्ला जरा मोडून वेळेच्या बरोबर १०-१५ मिनिटे आधीच बाहेर पडलो, खूप वेळानी श्वास घेतला की कसं वाटतं तसं काहीसं वाटायचं परीक्षा संपल्यानंतर बाहेर पडताना. बाहेर आलो शाळेच्या गेट पाशी, खूप गर्दी होती नेहमीपेक्षा, शाळेचे शिपाई वगैरे तिथे मुलांना बाजूला करत होते, तो मघाशी बाहेर पडलेला मुलगा गेट पाशी असलेल्या मुतारीच्या दरवाज्यासमोरच उभा होता, त्याला बहुतेक तिथेच झालेली, खूप लोकांना / मुलांना माहीत नसावे की तो मतिमंद होता, का...

काय वजन असतं क्षणांना!

Image
काय वजन असतं क्षणांना! आज अन्वयच्या 'केजी-वन' चा पहिला दिवस! तिला कधीपासूनच्या आवडणाऱ्या 'बिग येलो स्कूल बस' ने आज शेवटी ती शाळेपर्यंत गेली, मी ही गेलेलो मागे मागे, अमृताचा सल्ला ऐकला, 'जाऊन बघून ये हं, ती निट  जात्ये की नाही शाळेत!' शाळेत उतरल्यावर माझ्यासारखे उत्साही पालक मंडळी ही तिथे हजर होतीच, मी कुतुहलतेनॆ तिचा फोटो कढायला जरा तिच्या जवळ गेलो, त्यांची छान रांगेची 'ट्रेन' करवत शाळेची एक कार्यकर्ती त्यांना शाळेत घेऊन जात होती… मी फोटो काढला तेव्हढ्यात अन्वयाने मला पहिले आणि हसली :) मी ही तिला पाहुन हसलो… अमृताने सांगितलेला सल्ला पाळला, पण तिचा आतपर्यंत पाठलाग करायची माझी खाज महागात पडली, अन्वया मला बघत आत त्यांच्या 'क्लासरूम' शिरताच रडायला सुरुवात! मला राहवेना, पण आत गेलो असतो तर ती अजून रडली असती! जड पावलांनी रिव्हर्स गियर मारला… पुढे अमृताच्या शिव्या खाल्ल्या, आता पोट भरलय. हे सर्व लिहिताना माझा शाळेतला पहिला वाहिला दिवस आणि तो क्षण आठवला, माझ्या उंचीपेक्षा जास्त असलेल्या खिडकीच्या गंजांना पकडून ढसाढसा रडत होतो, समोर आ...

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक'

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक' बोरिवलीत आम्ही राहायचो तेव्हाची गोष्ट, २-३रीत असेन, नेहमीप्रमाणे शाळेत गेलेलो, मुलं-मुली एकत्र असलेला वर्ग, 'ठरल्याप्रमाणे' महिन्यातून ३-४ वेळेला कोणा न कोणाचातरी वाढदिवस असायचाच, तसा एका मुलीचा वाढदिवस होता, 'ठरल्याप्रमाणे' चोकलेटं वाटपाचा प्रोग्राम घडला, 'ठरल्याप्रमाणे' किस-मी नावाची फेमस(अजून ही) चोकलेटं वाटली, 'ठरल्याप्रमाणे' २-३ मोठी पाकीटं ४ जण आपापल्या बाकांच्या रांगेत वाटत होती, 'ठरल्याप्रमाणे' प्रत्येकी २ असे गणित. पण 'अचानक' मधली सुट्टीच्या आधीच म्हणजे जेवणाच्याही आधी मुलांच्या पोटात 'अचानक' दुखायला लागले! ५-६ जण सोडून (त्यात मी आणि २ जण ज्यांनी 'ती' चोकलेटं पचवली होती आणि २-३ जणं ज्यांनी 'ती' चोकलेटं खाल्ली नव्हती) 'अचानक' जवळ जवळ सर्वच मुले डोळे वर करत पोटाच्या आजूबाजूला हात गरागरा फिरवत उलट्या काढत दिसत होती, शाळेच्या सर्व मास्तरीण आणि शिपायांच्या तोंडाचे 'अचानक' १२ वाजलेले कळत होते, सर्व मुलांना एका मागोमाग रिक्षात कोंबून जवळच्या हॉस्पिट...