Posts

Showing posts with the label sleep

घोरुन निर्घृण खून!

घोरुन निर्घृण खून! हो हो...झोपेचा खून... मोनो..स्टीरियो...सराउंड अश्या विविध ध्वनीप्रक्षेपणास्त्रात उपलब्ध असलेल्या ह्या 'किलर'ला शिक्षा कधीच होत नाही. शिक्षा होते ती निद्रा देवतेचा श्राप असलेल्या माझ्या सारख्यांना! काही लोकांना काही झा# ‪#‎ फरक‬ पडत नाही हो! (काही लोकांना) पडल्या पडल्या झोप लागते म्हणे! (काही लोकांना) झोप लागली की आलाप सुरू... कोणी राग भैरवी कोणी राग तोडू... आणि माझा राग अनावर! मध्ये आई बाबा एका शिबीराला गेलेले... विपश्यना का काहीतरी... १०दीवस बोलायचं नाही म्हणे! बाबांचा रूम पार्टनर बाबांच्या दुर्दैवानी घोरण्यात गोल्ड मेडलिस्ट निघाला! शेवटी रागानी स्टूल फेकत ८व्या दीवाशीच् शिबीर त्याग केला! कारण काही बोलायचं नाही... मग स्टूलला कंठ फ़ूटले! मी किंग सिर्कल ला राहायचो, असाच एक 'घोर-किंग' रात्री स्टीरियोत आलाप सोडायचा! मी जोरात 'टॉक टॉक' करायचो... मझ्याबरोबर इतर २मित्रांची ही झोप मोड़! पण तो 'घोर-किंग' साला २श्वास मानवा सारखे घेऊन ३रा श्वास परत स्टीरियो! परत सकाळी उठल्यावर 'कोण रे च्यायला टॉक टॉक...' वगैरे...

झोप... नशीबात लागते हो!

झोप... नशीबात लागते हो! ती कधी येते, कधी बोलवायला लागतं, कधी आलेली कळत ही नाही, कधी येतच नाही, कधी इतकी येते की नशा बरा! जसं नशीब तशी झोप! मध्ये कोणी तरी म्हणालेलं... 'नींद तो बचपन में आती थी अब तो बस थक कर सो जाते है!' ते वाक्य बाप जन्मात विसरणार नाही! कारण ते इतकं पटलय! मला झोप मेली घरीच छान लागते बघा... त्यात प्रवासात किव्वा बाहेरगावी/नातेवाईकांकडे म्हणजे, तो मिण्मिण्ता-डोकावणारा प्रकाश, पंखा जास्त-कमी, खिड़की उघड-बंद न घडाळ्याची टिक-टिक यांमधेच झोपेचा बट्याबोळ! पूर्वी तर १२वाजता १२वेळा टांण टांण / कुक कुक वाजणाऱ्या घड़ाळयाचा सामना केलेलाय मी! असो, कशीबशी झोप मेहरबान होणार तेवढ्यात कायतरी अजुन अनपेक्षित व्यत्यय येऊन परत झोपेला बोलावणं करायला लागायचं.. महागच ती, माझ्या सारख्या निद्रा उदासीन व्यक्तिमत्वाला न परवाडणारं प्रकरण! मग दुसरा दीवस ते झोपचं ओझं पेलवत डोळ्यांचे व्यायाम चालू... कारण काय तर नशीबात लागते हो झोप! त्यातल्या त्यात डुलकी हां प्रकार उत्तम! वेगळच जग... त्या डुलकीतून बाहर आलं, की टाइम ट्रावेललिंग केल्या सारख्ं वाटतं, डोळ्याची आणि में...