घोरुन निर्घृण खून!

घोरुन निर्घृण खून!
हो हो...झोपेचा खून...
मोनो..स्टीरियो...सराउंड
अश्या विविध ध्वनीप्रक्षेपणास्त्रात उपलब्ध असलेल्या
ह्या 'किलर'ला शिक्षा कधीच होत नाही.
शिक्षा होते ती निद्रा देवतेचा श्राप असलेल्या माझ्या सारख्यांना!

काही लोकांना काही झा#‪#‎ फरक‬ पडत नाही हो!
(काही लोकांना) पडल्या पडल्या झोप लागते म्हणे!
(काही लोकांना) झोप लागली की आलाप सुरू...
कोणी राग भैरवी कोणी राग तोडू...
आणि माझा राग अनावर!

मध्ये आई बाबा एका शिबीराला गेलेले...
विपश्यना का काहीतरी... १०दीवस बोलायचं नाही म्हणे!
बाबांचा रूम पार्टनर बाबांच्या दुर्दैवानी घोरण्यात गोल्ड मेडलिस्ट निघाला!
शेवटी रागानी स्टूल फेकत ८व्या दीवाशीच् शिबीर त्याग केला!
कारण काही बोलायचं नाही... मग स्टूलला कंठ फ़ूटले!

मी किंग सिर्कल ला राहायचो,
असाच एक 'घोर-किंग' रात्री स्टीरियोत आलाप सोडायचा!
मी जोरात 'टॉक टॉक' करायचो...
मझ्याबरोबर इतर २मित्रांची ही झोप मोड़!
पण तो 'घोर-किंग' साला २श्वास मानवा सारखे घेऊन
३रा श्वास परत स्टीरियो!
परत सकाळी उठल्यावर
'कोण रे च्यायला टॉक टॉक...' वगैरे!

असला रआआआग यायचा म्हणून सांगू!!!
काही पराक्रमी तर प्रावासातही घोरतात!
आता ह्यांना काय म्हणाव!
फ्लाइट मध्ये एक सरदार इतका घोरत होता की
त्यालाच त्याच्या घोरण्यानी जाग येत होती...
मग येड़ा स्वतःच डिस्टर्ब होउन 'सिज़ोफ्रेनिया' चा
रुग्ण असल्या सारखा वागायचा! जणू मीच घोरतोय..
आणि तो मी नव्हेच!

मी बायको आणि एक मित्र गप्पा मारत होतो,
मध्येच ड्रिलिंग चा आवाज येत होता,
'रात्रीचे ११वाजता कोण ड्रील करतय!?' असा प्रश्न पडला...
मग साक्षात्कार झाला की अन्वयाचा बेबी मोनिटर चालू होता बेडरूम मध्ये
अन्वयाला झोपवता झोपवता बेडरूम मध्ये आई झोपलेली...
आणि बेबी मोनिटर च्या हॉल मधल्या स्पीकर मधून घोरण्याचा आवाज येत होता!
जो ड्रिल मशीन सारखा ऐकू येत होता!

मी ही कधीतरी घोरतो म्हणे!
खुप थकलो असलो की वगैरे...
हे म्हणजे किती वाइट!...मला पटेचना
मग मला पुरावा दीला,
रेकॉर्डिंग वगैरे करवुंन ऐकवलं,
हे म्हणजे फारच ऐम्बेरसिंग होतं बुआ!
हे म्हणजे एखाद्या गुरख्याला चोरी करताना पकडले जाण्या सारखे काहीतरी!

झोप उडणे... ती लैंड होणे... पार्किंग करणे
झोप परत उडणे, परत लैंड होणे, परत पार्किंग...
ह्या सर्व प्रकरणात रनवे कितीही मोठा / चांगला असला
तरी खराब हवामानाचा अडथळा हा गोची करतो!
तो अडथळा कितीही लहान मोठा असला तरी
यात्रा शुभ हो... अशी फालतू अपेक्षा न ठेवता
फ्लाइट त्याग करणे हेच उत्तम!

‪#‎सशुश्रीके‬ | २/२/२०१५ | वेळ - कोणी घोरत नसताना

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!