झोप... नशीबात लागते हो!

झोप... नशीबात लागते हो!
ती कधी येते,
कधी बोलवायला लागतं,
कधी आलेली कळत ही नाही,
कधी येतच नाही,
कधी इतकी येते की नशा बरा!
जसं नशीब तशी झोप!

मध्ये कोणी तरी म्हणालेलं...
'नींद तो बचपन में आती थी
अब तो बस थक कर सो जाते है!'

ते वाक्य बाप जन्मात विसरणार नाही!
कारण ते इतकं पटलय!

मला झोप मेली घरीच छान लागते बघा...
त्यात प्रवासात किव्वा बाहेरगावी/नातेवाईकांकडे म्हणजे,
तो मिण्मिण्ता-डोकावणारा प्रकाश, पंखा जास्त-कमी,
खिड़की उघड-बंद न घडाळ्याची टिक-टिक यांमधेच झोपेचा बट्याबोळ!
पूर्वी तर १२वाजता १२वेळा टांण टांण / कुक कुक वाजणाऱ्या घड़ाळयाचा सामना केलेलाय मी!
असो, कशीबशी झोप मेहरबान होणार तेवढ्यात कायतरी
अजुन अनपेक्षित व्यत्यय येऊन परत झोपेला बोलावणं करायला लागायचं..
महागच ती, माझ्या सारख्या निद्रा उदासीन व्यक्तिमत्वाला न परवाडणारं प्रकरण!
मग दुसरा दीवस ते झोपचं ओझं पेलवत डोळ्यांचे व्यायाम चालू...
कारण काय तर नशीबात लागते हो झोप!

त्यातल्या त्यात डुलकी हां प्रकार उत्तम!
वेगळच जग... त्या डुलकीतून बाहर आलं, की टाइम ट्रावेललिंग केल्या सारख्ं वाटतं,
डोळ्याची आणि मेंदुची तार क्षण भर जुळत नसते...
आणि जुळली की ताड़कन्नी वस्तवाचा चटका बसतो!
ह्या डुलकीला ही नशीबाची साथ हवी असतेच...
कमनशिबी माणसाची डुलकी.. वसई चा विरार करून जाते!
(म्हणजे वसई स्टेशन वर उतरायचे असेल तर डुलकी लागल्यानी
बरीच लोकं विरार ला पोहोचतात... त्यात लास्ट ट्रेन असेल की भोज्जाच...
रिक्षानी वसईला जावं लागायचं पब्लिकला!)

कोणी घोरत असेल की...
त्या चीड़चीडीला तर तोडच नाही!

मुम्बईत होता एक रूम पार्टनर,
अर्रर्र... काय सुर लागायचा त्याचा😈
बरं.. श्वास घेतानाही आवाज न सोडताना ही!
डबल धमाका.. मग मी -टॉक-टॉक- करायचो,
त्यामुळे इतर रूममेट्सचीही झोपमोड़..
तो गधडा १ते५श्वास सामान्य मानवा प्रमाणे घ्यायचा की ६व्या श्वासला परत सूरू...
घार्र् न घुर्र आणि परत सकाळी उठल्यावर विचारणार 
"कोण रात्री साला -टॉक-टॉक- कोण करत असतं झोपेची फुल्याफुल्याफुल्या"
असो...शेवटी काय नशीबात लागते हो झोप!

एकदा माझा मित्र आलेला घरी...
गप्पा गोष्टी जेवण वगैरे मध्ये उशीर झाला म्हणून म्हणालो झोप आता इथेच...
सकाळी नीघ, मला काय माहीत साहेब घोरतात..
अर्धा तास सहन केलं...४५मिनट झाली... नाहीच गाडी काय थांबेना!
शेवटी माझा जूना प्रयोग -टॉक-टॉक- केलं २-३दा,
हाहाहा तो मध्यरात्री त्याच्या घरी निघाला..
म्हणाला सॉरी रे तू झोप शांत पणे, मी नघतो.
मला जरा औड़ वाटलं थोडं पण बरं ही वाटलं!
पण त्या रात्री झोपेचे ग्रह खराबच होते...
घडाळयाच्या टिक टिक नी जागं ठेवलं मला नंतर!
कारण, नशीबात लागते हो झोप!

नशीब लागतं हो, आता हेच बघा ना...
आमचे सासरबुआ, बोलता बोलता झोपतात, कुठे ही कधी ही! 
हेवा वाटतो, मातोश्रींना कितीही आवाज असला तरी झोप लागते,
लहान मुलांच् बेस्ट, झोपणार कुठेही बाबांच्या आईच्या खांद्यावरून बेड वर अगदी घरपोच सेवा...
कश्याचा काय पत्ता नाही...
आणि कधीकधी तर त्यांना झोपवता झोपवता आपल्याला झोप येते!
कारण, नशीबात लागते हो झोप!

सगळ्यात वाइट झोप म्हणजे...
डेस्टिनेशन आले आहे ५ मिनीटाच्या अंतरावर आणि ड्राइविंग करताय तुम्ही,
थांबून झोपता ही येत नाही न जोरात हाणता ही येत नाही...
मग डोक्यालाच हात लाव... पाणी पी, अस्वस्थ डोळे नी सुन्न डोकं,
एवढं सगळ झाल्यावर झोपलोय घरी पोहोचताच... तर नाही!
कारण नशीबात लागते हो झोप!
अजुन एक खेदाची बाब म्हणजे, दुपारची झोप!
झोप येत असली तरी झोपत नाही!
का... तर दुपारी झोपणं म्हणजे वेळ वाया घालवणं! हे असलं थिंकिंग आमचं...
मग बसा बोमलत डोळे ताणत!
अजुन करा झोपेचा अपमान...
नशीबात लागते हो झोप!
झोप... नशीबात लागते!
हे बाघा ना आता, उद्या ओफ्फिस आहे...
वीकेंड असून, त्या विचाराने झोप यईना!
पूर्वी पेरीक्षेमुळे.. मग प्रेमामुळे... वगैरे वगैरे कारणं काय संपतच नाहीत,
कारण नशीबात लागते हो झोप!

सो गया ये जहां
सो गया आसमाँ
सो गई है सारी मंझिले
है सारी मंझिले
सो गया है रस्ता!
हे सगळेच नशीबवान!
कारण...
नशीबात लागते हो झोप!


#‎सशुश्रीके‬ |  १७ जानेवारी रात्रीचे १२.३४

Comments

  1. अगदी खरयं...नशीबातच लागते झोप. बाकी 'घरपोच सेवा' आवडले :D

    ReplyDelete
  2. अगदी खरयं...नशीबातच लागते झोप. बाकी 'घरपोच सेवा' आवडले :D

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!