Posts

चिक्कीय... चिक्कीय

Image
चिक्कीय - चिक्कीय     चिक्की घेऊन यायचे पूर्वी लोक, काही जणं आइसक्रीम, बिस्कीटं, चोकॉलेट्स, पण लोणावळा चिक्की, वेगळीच मजा होती त्याची! खास करून तो 'मगनलाल' चा लोगो बघुन डोळे मोठे व्हायचे! लाळ सुटायची लाळ, त्यात मिक्स चिकी पैक असेल तर डाळ आणि नारळवाली नालायक चिक्की सोडून, बाकी सर्व अर्ध्या दिवसभरात फस्! एका मागोमाग एक,  काजू नंतर बदाम नंतर आपली रेग्युलर शेंगदाणा, परत चक्र चालू! आत्ता तीच खातोय, डेस्क वर कोणीतरी आणून ठेवलेली माझ्या, विकत घेऊन खाणे बहुतेक ते सगळ्यांनाच जमतं, मागवून मिळणं ते पुण्य! न मागता अश्या गोष्टी मिळणं! महा-पुण्य! चिक्कीय - चिक्कीय ओरडणारा तो घसा ट्रेन ते एसटी ते ह्या डोक्यात - परत चक्र चालू! आठवणींची चिक्की! #सशुश्रीके । २४/०२/२०१५ । २.३१

आठवणी!

Image
॥श्री॥ फुंकर मारत पाणी गरम केले आहे का कधी!? त्या चुलीत जळणारे नारळाचे काथे लालबूंद करत करत... तोंडात ब्रश... तंद्री! अगदी पहाटे, सूर्योदय होण्याच्या ही अगोदर कधी येणार तो दीवस परत अस झालय! पानगी खावीशी वाटत्ये...मस्त खमंग... त्यावर सरसरीत गरम तूप... केळीच्या पानावर आजीच्या हाकेसकट... पडवीत झोपाळ्यावर पावसाची रपरप बघत! त्या उन्हाळाच्या दुपारी आजीचा डोळा लागलेला आजोबा गोठ्यात अन मी झोपाळयावर... एका हातात दोरी, दुसरा हात जमीनीवर, ते बोट खरवडत नखांचा आवाज करत, लक्ष्य हळूच कलडे वाळत घालण्यासाठी अडकवलेल्या बांबूवर, पाहूण्या सारखा भुंगा बाहेरून पडवीत, त्याच्या आवडत्या बांबूवर गुफ्तगू, झिंग झुंग असा तो, ऐकवेना, मी कुस बदलली, दुसऱ्या हाताला दोरीची जवाबदारी देत पहिला हात जमीनीवर, आता डोळे झोपाळ्याच्या मागच्या खिडकीवरुन कौलांकड़े, या कौलांमध्ये एका कौलाच्या जागी फ्रॉस्टेड काच., ज्यातून दैवी प्रकाश आत यायचा, धूलीकण चा क्यालीडोस्कोप दाखवायचा, चटपट पाली मध्येच लक्ष्य वेधायच्या, जळमटांच्या बाजुनी पळायच्या, कोणीतरी जणू 'स्टेचू' म्हणून थाम्बवल्या सारख्या गोठायच्या का...

अजूनही...

॥श्री॥ त्या उन्हाळाच्या दुपारी आजीचा डोळा लागलेला आजोबा गोठ्यात अन मी झोपाळयावर...  एका हातात दोरी... दुसरा हात जमीनीवर... ते बोट खरवडत नखांचा आवाज करत... लक्ष्य हळूच कलडे वाळत घालण्यासाठी अडकवलेल्या बांबूवर... पाहूण्या सारखा भुंगा बाहेरून पडवीत, त्याच्या आवडत्या बांबूवर गुफ्तगू... झिंग झुंग असा तो, ऐकवेना... मी कुस बदलली... दुसऱ्या हाताला दोरीची जवाबदारी देत पहिला हात जमीनीवर... आता डोळे झोपाळ्याच्या मागच्या खिडकीवरुन कौलांकड़े...त्या कौलांमध्ये एका कौलाच्या जागी फ्रॉस्टेड काच... ज्यातून दैवी प्रकाश आत यायचा... धूलीकण चा क्यालीडोस्कोप दाखवायचा... चटपट पाली मध्येच लक्ष्य वेधायच्या, जळमटांच्या बाजुनी पळायच्या, कोणीतरी जणू 'स्टेचू' म्हणून थाम्बवल्या सारख्या गोठायच्या काय परत पळायच्या काय... त्यात हळू हळू डोळे मिटायला लागायचे... हाततली दोरी जागा सोडायची, परत उठल्याशिवाय घेता नाही येणार इतकी लांब जाऊन रुसायची...आता फक्त झोपाळ्याचा आवाज... बाहेरच्या किड्यांचा... रास्त्यावरच्या चपलांचा आवाज... सर्व आवाज कमी कमी होत मग आवाज यायचा स्वतःच्या श्वासाचा... आवाज ही हळू हळू ...

'वाह...क्या सीन है...'

Image
॥श्री॥ 'वाह...क्या सीन है...'  भाग - १ लहानपणी काही मालिका चित्रपट इतके पाहिले की जन्मभर विसरणे अशक्य आमच्या कडेVCR होता त्यामुळे रात्री किव्वा संध्याकाळी वगैरे चित्रपट / नाटक / मालिका लागल्यास टाइमर वर सेट करून बाबा रेकॉर्ड करायचे... मग आरामत वेळ झाला की तो सह परिवार पहायचा असा कार्यक्रम असायचा! शांती, स्वाभिमान, राउ, स्वामी सारख्या मलिका... दीवार, विधाता, चार्ली च्याप्लिन, रोजा, होम अलोन, टॉम एंड जेरी असली भेळ असलेली पर्सनल VDO पार्लर जणू होतं घरच्या घरी. आणि वेळ मिळाला की त्याच त्याच कैस्सेट्सची पारायणं करायचो, त्यामुळे अजुन ही टी.व्ही. वर त्या जुन्या गोष्टी लागल्या की जुने 'VDO लायब्ररी'चे दिवस आठवतात. तसं पाहिलं तर खाली नमूद केलेल्या सिनेमा पैकी कोणाला काय आवडेल हे फार व्यक्तिसापेक्ष असेल पण मला भावलेल्या सीनचे तुकडे जरा थोडक्यात मांडतोय... सीन होता 'दीवार' मधला... अमिताभ आणि शशी कपूर देवळाबाहेर निरुपा रॉयची वाट बघत उभे असतात, माय येते दोन्ही लेकरांकडे बघत हातात प्रसाद देते, अमिताभ नास्तिक, शशी त्याला समजावतो, आई प्रसाद समजून द...

'Hollywood पूर्वी सारखं राहीले नाही हो!'

Image
॥श्री॥   ​ १९९३-९४... बाबा मला घेउन डाईनॉसरच्या चित्रपटाला घेउन गेले... संध्याकाळचा शो असेल.. प्रभात टॉकिज, बाहेर पड़े पर्यन्त रात्र झालेली, आणि डोक्यात नुसता डाईनॉसर डाईनॉसर... त्यात ज़रा बौद्धिक खाज म्हणून स्कूटर वर उलटा बसलो, इमेजिन करायला... इथून असा आला तर कोण कसं गल्पटेल वगैरे! नुसता थैमान! आणि आता कितीही गोंधळ घाला त्या स्क्रीन वर... 'बरा होता मूवी अजुन चांगला करता आला असता' वगैरे बोलुन टिकिट फेकून देणे ह्या पलीकडे... 'Hollywood पूर्वी सारखं राहीले नाही हो!' असा पुणेरी तड़का जोडीस कोबरा स्टाइल - 'गप्प घरी पाहिला असता तर पैसे वाचले असते... कसे!?' #सशुश्रीके

मी राहतो...

॥श्री॥ नशा, झिंग, हवाहवासा वाटणारा, थकवणारा, आनंद देणारा, अहो व्यसनच की हे... आयुष्यात कधी 'लिहीन' असं वाटलं नव्हतं, 'वाचायला'ही आता जमतं... हे बाळ रोज रांगतं... डोक्यातली हालचाल उतरवतं ह्या ५इंची पडद्यावर... आकाशतुन थेट जमीनीवर. डोळ्यांच्या काचा, झोपेचे बारा, सकाळ चा पात्तळ थर... मग ओढ़ाताण दीवसभर, आठवड्यातून एकदा तरी ठरवतो असं, नाही लिहायचं आज तरी सोडायचं, जमे ना काय ते झाले आता सहा ते महीने... पण कमवलं की... भूतकाळ गमवतात, मी कमावला... रोज जातो खेचून आणतो... वर्तमानाच्या दोरीवर टांगतो... घेतो पांघरूण अदृश्य भविष्याचे, घालतो लोटांगण... व्यक्तींचे सरपण... ऊब शेकोटि.. खूब मस्ती... मित्रांची वस्ती अठवणींची गस्ती वाहवत जातो अरश्यात पाहतो राहतो मी राहतो मी राहतो... #सशुश्रीके । १७-०२-२०१५ रात्रीचे ११.११

हैप्पी जर्नी ( Movie Review )

Image
।। श्री  ।। हैप्पी जर्नी माझा हल्लीचा आवडता मराठी नट अतुल कुलकर्णी (निरंजन) आणि आवडती नटी प्रिया बापट (जानकी) हे दोघे आहेत मुख्य कलाकार, बाकी कास्ट ही मस्तच आहे! पल्लवी सुभाष (Alice नाव असलेल्या ख्रिस्ती मुलीचा रोल मस्तच साकारलाय) तर Alice आहे निरंजनची प्रेयसी आणि जानकी बहीण. जरा पचायला अवघड पण तितकाच छान हाताळलाय दिग्दर्शकानी (सचिन कुंडळकर) ही जरी प्रेमाची गोष्ट असली तरी भाऊ-बहिणीच्या नात्यातले प्रेम हा प्रमुख पाहुणा आहे! ह्या सिनेमात एक ओळखीचा चेहरा पण दिसला मला! तेजस मोदक, मी त्याला मोदक म्हणायचो… तसं त्याचं नाव तेजस मोडक, पुण्यात असताना कार्टून्स करायचा, कथा वगैरे लिहायचा, आता गाणी लिहितो हे पहिल्यांदाच कळालं! आणि त्याचा छोटा रोल ही आहे, बिल घ्यायला येतो दारावर आणि निरंजनशी २-३ वाक्य बोलतो असा सीन आहे. चित्रपटाच्या कथानकाला आत्ता उजेडात आणलं तर काही फरक नाही पडणार कारण बर्यापैकी दिवस उलटून गेलेत, लोकांच्या समीक्षा पण आत्ता पर्यंत बाहेर पडल्या असतील, सहजा सहजी माझ्या आईला सिनेमे (मराठी असो वा हिंदी) आवडत नाहीत, मग आईनेही रेकमेंड केलाय म्हणल्यावर मी पाहिलाच! आता ही कहाणी...