मी राहतो...

॥श्री॥

नशा,
झिंग,
हवाहवासा वाटणारा,
थकवणारा,
आनंद देणारा,
अहो व्यसनच की हे...
आयुष्यात कधी 'लिहीन'
असं वाटलं नव्हतं,
'वाचायला'ही आता जमतं...
हे बाळ रोज रांगतं...
डोक्यातली हालचाल उतरवतं
ह्या ५इंची पडद्यावर...
आकाशतुन थेट जमीनीवर.

डोळ्यांच्या काचा,
झोपेचे बारा,
सकाळ चा पात्तळ थर...
मग ओढ़ाताण दीवसभर,
आठवड्यातून एकदा तरी ठरवतो असं,
नाही लिहायचं आज तरी सोडायचं,
जमे ना काय ते झाले आता सहा ते महीने...
पण कमवलं की...

भूतकाळ गमवतात,
मी कमावला...
रोज जातो खेचून आणतो...
वर्तमानाच्या दोरीवर टांगतो...
घेतो पांघरूण अदृश्य भविष्याचे,
घालतो लोटांगण...
व्यक्तींचे सरपण...
ऊब शेकोटि..
खूब मस्ती...
मित्रांची वस्ती
अठवणींची गस्ती

वाहवत जातो
अरश्यात पाहतो
राहतो मी राहतो

मी राहतो...


#सशुश्रीके । १७-०२-२०१५ रात्रीचे ११.११

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!