Posts

धनंजय माने...

Image
धनंजय माने... होय त्याचं नाव मी 'धनंजय माने'नावानी सेव केलय मोबाइल मध्ये, खरं नाव धनंजय गोखले. मुळचा नाशिकचा, गुटगुटीत बांधा, मध्यम ऊंची, वरची सपाट धावपट्टी (टक्कल), घामाचा कारखाना असलेला... आमचा गोखल्या! वरून कितीही नारळ, फणस, कलिंगड़ दिसत असला तरी 'काट के देखो साब... अंदर से मीठा है... पैसा वसूल है साब... एक बार ट्राय कर के तो देखो!' असा प्रकार! ह्याची माझी ओळख झाली जयंत विध्वंस यांच्या कडून, त्यांच्या बद्दल नंतर सांगतो, बेसिकली जयांता म्हणाले... की एक दोस्त आहे आपला, दुबैतच असतो, हा घे नंबर, जमलं तर भेटा! 'जमलं तर!' वगैरे... अशी वाक्य म्हणजे अपमान माझा! आपल्याला भेटायला आवडतं, एक मेंदू... ह्रदय... आणि त्यात मित्राचा मित्र म्हणालं की संपला विषय! थेट-भेट-ग्रेट-भेट कामाच्या व्यापानी कधी उशिरा कधी अती उशिरा पण... सोडत नाय कोणाला. मिलेंगा मतलब मीलेंगाइच!!! पूर्वी ऍफ़बी आता व्हाट्सऐप्प... भेटलो माझ्या घरा खालीच! म्हणालो वेळ असेल तर ये वरच.. त्या दिवसापसुन आज पर्यंत सेम डायलॉग! "जवळच आहे तुझ्या घराच्या... काय आणु का... वडापाव वगैरे!?" की मग ...

थोडसं खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!

Image
ये तारा वो तारा हर तारा… देखो जिसे भी लगे प्यारा ये सब हो साथ मे, तो जगमगाया आसमां सारा! जगमग तारे, दो तारे, नौ तारे, सौ तारे, हर तारा ही शरारा… ये तारा वो तारा... अन्वया ला ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं... शहारे आले ऐकून आणि बघून ही! त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा! जमिनीवर सारवलेल्या शेणाचे तुकडे तोडत, कितीही झोप आलेली असताना, एकही सीन वाया न घालवता शेवटपर्यंत! कोणी शाल ओढून कोणी जैकेट अडकवुन! सुंदर चांदण्याचा प्रकाश, गावातल्या शाळेच्या आवारात, अर्धे ओळखीचे-अर्धे अनोळखी... पण काही दमदार / हास्यास्पद सीन घडला की जन्मोजन्मांतरी ओळख असल्यासारखी टाळी / दाद द्यायचे! खुप अप्रूप असायचं, आता घरोघरी टीव्ही झालेत, तेव्हा १०घरांपैकी २घरांकडे ब्लैकएंडव्हाइट आणि एकाकडे कलर टीव्ही असे, आणि असे सार्वजनिक चित्रपट वर्षातून एक-दोंदाच! हे असे मी सारखे सारखे भुतकाळात का जातो! वर्तमान का...

स्वभावाला औषध नसते!

वहीतली काही पानं खराब किंवा नकोशी झाली की ती पानं फाडायचो, मग सहाजिकच त्यालाच जोडलं गेलेलं वहीचं दुसरं पान सैल पडायचं! मग ते पण फाडायचो, २०० पानाची वही १२०पानी व्हायची, सैल व्हायची वही… नवीन वह्या किती घ्यायच्या? मग आईने युक्ती सांगितली १सेमी जागा सोडून किंवा त्रिकोण कारायचा त्यापानाचा, म्हणजे निदान १२० ऐवजी १६०ची वही तरी वापरायला मिळेल! तसेच काही मित्र, पूर्ण पान फाडण्यापेक्षा… आपलं… पूर्ण संबंध तोडण्यापेक्षा २हात लांब राहीलेले बरे! कारण तुमच्या स्वभावाला तो पूरक नसतो आणि त्याचा स्वभावाला तुम्ही, आणि स्वभावाला औषध नसते! ॐ मित्राय नमः #सशुश्रीके । २४ ऑगस्ट २०१५

दवाई-ऐ-गुलजार!

Image
इलाज करवाते हम वही से... जहा जख्म होते है दवाई के लिए जहां पल गुजरे बिना घडी के, जहां हो थोडीसी जमी थोडा आसमां, जहां चाँद पोहोचे बिना इजाजत के, जहां हो मुसाफिर का ठिकाना, जहां आए जाने वाला पल पलट के, जहां दो दीवाने एक शेहर मे, जहां सजते है सपने सात रंग के, जहां पहचान होती है आवाज से, जहां अरमां हो पुरे दिल के, जहां सपनों में दिखे सपने, जहां रात हो ख़्वाबों की, जहां गले लागए झिंदगी, जहां ना हो कोई शिकवा झिंदगी से, जहां नाराज ना हो झिंदगी , जहां हैरान ना हो झिंदगी, इलाज करवाते हम वही से... जहां जख्म होते है दवाई के लिए दवाई-ऐ-गुलजार! #सशुश्रीके | १९ अगस्त २०१५ । १.४८

फूडी वीकेंड!

काल एका रेस्टरन्ट मध्ये गेलेलो, मला वाटलं राजस्थानी असेल! श्री गंगोर फ़ूड चैन वालं, निघालं इटालियन! नाव पण जरा विचित्र होतच म्हणा, OTTIMO RESTORANTE, तेव्हाच जराशी संशयाची पाल चूकचुकलेली! ...

बापट काका

Image
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले... त्यातल्या त्यात नवीन, कारण गावात आरामात ७०-८०वर्ष जुनी घरं असतात, तर ते घर होतं बापट काकांच, तसे होते ते खुप म्हातारे, पण येणारे जाणारे सर्व बापट काका म्हणून हाक मारायचे, मग मी ही. माझी आजी दूध घेऊन ५-६घरांत जाऊन द्यायची, आमच्या कडे २म्हशी होत्या तेव्हाची गोष्ट, तीन्हीसांजाच्या वेळी, ना धड उजेड ना काळोख... आजीचा हात किंवा पदर धरून जायचो, बापट काकांकडे पण जायचो, रस्त्याच्या लगद नसल्यानी आत पर्यंत जाऊन त्याना हाक मारून तो स्टीलचा डबा द्यायचा मग ते आपल्या घरच्या भांड्यात आतून घेणार... असा दिनकर्म(क्रम)... मला बघुन भुवया उंचावून हसायचे आणि मग आजीकडे माझ्या आई...

डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी!

Image
डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी! डाणेदार... त्यकारीता ते जाडे दणकट पिवळे डबे! त्यावर गडद हिरवे झाकण, स्वयंपाक घरात नेहमी दिसायचे पूर्वी आणि ऐवज संपला त्यातला की ते बाथरूममध्ये दीसायचे डीटर्जन्ट पावडर साठी, कधी दिअसायचे स्वयंपाक घराच्या कपाटांत, तांदूळ, बेसन वगैरे साठी! माझी आजीतर त्यात दागिने/पैसे ही ठेवायची! त्यालाच कापून दोन भोकं पडून 'डब्याला' ही वापरलेले पाहिले आहे! आजकाल प्लास्टिकच्या त्या पिशव्या असतात, यांना साफ करून काही लोक रद्दीतही विकतात म्हणे! नाहीतर टीन मिळतात, पण ती मजा नाही! काय मस्त होते ते डबे!… डालडाचा पाहिजे तो (मला जो आठवतो तो) आकार गुगल वर ही मिळाला नाही! उमदाचा पण मस्त होता डबा, जरासा बारीक डालडा पेक्षा, आणि फॉन्टपण स्लीम ट्रीम आता लिहीता लिहीता लक्षात आलं! पूर्वी प्रिंटींग संदर्भात मर्यादा असल्यानी खूप गोष्टी कमीत कमी रंग वापरून केलेली असायची! त्यामुळे सहाजिकच कमी खर्चात आणि 'मिनिमल' लूक असलेली असायची! आता तो ट्रेंड परत येतोय! मध्ये मध्ये ४रंग काय!? - स्पेशल प्रिंट काय... पार लैंडस्केप असायचं प्रौडक्टवर! असो… जुने ते सो...