स्वभावाला औषध नसते!

वहीतली काही पानं खराब किंवा नकोशी झाली की ती पानं फाडायचो, मग सहाजिकच त्यालाच जोडलं गेलेलं वहीचं दुसरं पान सैल पडायचं! मग ते पण फाडायचो, २०० पानाची वही १२०पानी व्हायची, सैल व्हायची वही… नवीन वह्या किती घ्यायच्या? मग आईने युक्ती सांगितली १सेमी जागा सोडून किंवा त्रिकोण कारायचा त्यापानाचा, म्हणजे निदान १२० ऐवजी १६०ची वही तरी वापरायला मिळेल!

तसेच काही मित्र, पूर्ण पान फाडण्यापेक्षा… आपलं… पूर्ण संबंध तोडण्यापेक्षा २हात लांब राहीलेले बरे!

कारण तुमच्या स्वभावाला तो पूरक नसतो आणि त्याचा स्वभावाला तुम्ही, आणि स्वभावाला औषध नसते!

ॐ मित्राय नमः

#सशुश्रीके । २४ ऑगस्ट २०१५

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!