डिट्टो!
माणसाचं असं असावं, जे त्याच्याकडे नाही त्याकडे
लक्ष, म्हणजे ज्याचा कडे भरपूर पोट असेल तो सपाट पोटाकडे पाहत राहील,
ज्याचं नाक नकटं तो तरतरीत नाकाकडे, माझ्याबाबतीत माझ्या घाऱ्या डोळ्यांकडे
पाहून बरेच लोकं 'मला पण आवडले असते असे डोळे मला असते तर' वगैरे म्हणतात.
आणि मी त्यांच्या भरघोस केसांकडे पाहून म्हणतो आणि मला तुझ्या/तुमच्या
सारखे केस असते तर! असो... तर सलून मध्ये गेल्यावर केस कापायला आलेल्या
केशसंपन्न लोकांकडे मी नेहमीच फार हेवायुक्त दृष्टीने पहात बसतो!
२-३महिने तरी लागतात मला केस कापवून घेई पर्यंत वाढवायला, मागच्या वेळी अडीच महिन्यांपूर्वी पुण्यात कापलेले केस त्यानंतर आज इथे दुबईत, नेहमीप्रमाणे ३-४लोकं आधीच बसलेले असतात स्कुठल्याही सलून मध्ये जा, पण सुदैवाने आज गर्दी नव्हती अगदी थेट पायलट जाऊन बसतो विमानात तसा थेट जाऊन बसलो, बाजूच्याकडे लक्ष गेलं न उडालोच! McBc डिट्टो कोहली... काही न विचार करताच त्याला म्हणालो, भाय तू तो सेम कोहली जैसा दिखता है! (हल्ली जी काही टी नवीन स्टॅईल निघाल्ये, भांग पाडतात न एका बाजूचा भाग कमी केसांचा दुसर्या बाजूला केसांचा पुंजका... मध्ये हायवे सारखी लांब रेष काय! मज्जाच (जे केश संपन्न त्यांनाच जमतं म्हणा). असो माझ्या त्या 'कॉम्पिलमेन्ट' वर स्मित हास्य देत तो तरुण म्हणाला "याह, आय गेट धिस फ्रॉम लॉट्स ऑफ पीपल म्यान!" मी त्याचा फेक अमेरिकन इंग्लिश ऍक्सेन्ट ऐकून जास्त विषय वाढवला नाही. तो गेल्यावर सलून वल्याला विचारलं, हा काय नेहमी येतो का इथे, कुठल्या गावचा आहे... तर म्हणाला *पाकिस्तानी आहे, पेशावरचा.* मी म्हणालो मग पाकिस्तानी सलून मध्ये का जात नाही, सलूनवाला म्हणाला त्यांच्या पेक्षा आपल्या सलूनमध्ये त्याला जास्त भाव देतात म्हणून असेल 🙄😁
मला त्याचं हे उत्तर पटलं... शेवटी आपल्या (असून नसलेल्या) लोकांची कदर आपल्या कडून जास्त होणार, डुप्लिकेट का असेना!
पण नंतर अजून एक डुप्लिकेट बसला त्याच जागेवर... अतिशयोक्ती नाही! *डिट्टो मन्नाडे*... फक्त चष्मा नसलेला! क्या बात है, वयानी जास्त असलेल्याने त्यांना सांगू की मन्नाडे सारखे दिसता की नको अशी मन:स्थिती असताना सलून वालाच म्हणाला, "अब आपकी कहोगे की ये भाईसाब मन्नाडे साब की तराह दिखते है!" हे ऐकून सगळेच हसायला लागले! शुक्रवार असावा तर असा, लक्षात राहणार हा कायमचा 👌
😂😂😂
आज दिवसभर मन्नाडे ऐकणार, आओ ट्विस्ट करे, बाबू समझो इशारे, जिंदगी कैसी है पहेली, एक चतुर नार... करके सिंगारर्र्रर्रर्र!
#सशुश्रीके | ३१ मार्च २०१७

Mast
ReplyDelete