स्पीड डेमन!

आज खूप दिवसांनी मायकल जॅक्सनची गाणी परत ऐकतोय, आमच्या कडे एक व्हीएचएस होती, त्यात काही जुनी इंग्लिश गाणी होती त्यात एक मायकलचं पण गाणं होतं, ते पाहिल्या पासून ह्याचा फॅन झालेलो. त्याची गाणी तर हिट असायचीच पण जास्त मजा यायची व्हीडीओ पाहायला, जणू 'मिनी मूव्ही'च!

स्पीड डेमन... https://youtu.be/uZEGu-TA2cU गाणं काही खास नाहीये इतर मायकलच्या गाण्यांच्या तुलनेत, पण ह्या व्हीडीओ मध्ये एक अफलातून वेग आहे आणि तो पण स्टॉप अनिमेशन मध्ये... अनिमेशन मधला सगळ्यात अवघड प्रकार, एक न एक फ्रेम साठी प्रचंड कष्ट, त्यात खरा खुरा मायकल जॅक्सन त्यात त्याच्या अशक्य फास्ट स्टेप्स... ह्या सगळ्याची मस्तच मांडणी, जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा हे कसं बुवा केलं असेल असा प्रश्न पडायचा, मग जस जसं एनिमेशन इंडस्ट्री बद्दल कळत गेलं तसं ह्या व्हिडिओबद्दलची उत्सुकता अजूनच वाढत गेली! कालांतराने कॅसेट्स गायब झाल्या, आता युट्युबने परत आठवण करून दिली!

व्हीडीओच्या शेवटी 'नो एन्ट्री' सारख्या फलका मध्ये 'एर्रो' ऐवजी मायकलच्या पाय दाखवले आहेत! त्याच्या जवळपास सर्वच म्युजिक व्हीडीओज मध्ये शेवट असाच खास असतो.

लिंक चिकटवली आहेच वरती, इच्छुकांनी नक्की लाभ घ्यावा 🤘

#सशुश्रीके | २८ एप्रिल २०१७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...