The Most Embarrassing Moment
The Most Embarrassing Moment का काय असतं त्यातलं एक...
आई वर्षभर बाहेरगावी राहायला गेल्याने मी मिनल मावशी कडे राहिलो... आईची बालमैत्रिण, जाम कडक होती, पानात वाढलं ते खायचं, अमुक अमुक वेळ अभ्यास व्हायलाच हवा वगैरे वगैरे, अशी लोकं लहानपणी 'व्हिलन' वाटतात... एके दिवशी आईच्या एका मैत्रिणी कडे मी गेलेलो (खरे काकू), तिथे सर्व बोललो अगदी, मला मिनल मावशी का नाही आवडत वगैरे!
असो... एके दिवशी मावशी कडे खरे काकू आल्या, कारण आई आलेली त्यामुळे गप्पा चालू होत्या, अचानक माझा विषय निघाला,आता खरे काकूंकडे कडे मी जे काही ओकलो मला काय वाटतं वगैरे ते सर्व त्यांनी माझ्या समोरच आई आणि मावशीला सांगितले, कारण आडनावातच 'खरे' होतं. कुठे काय आणि कोणाकडे बोलायचं ह्याचं भान नसलेला मी पूर्णतः फसलेलो!
'कहा जाऊ कैसे खुजाऊ'
'गळा दाबू की गोळी घालू'
'आज कल भलाई का जमाना ही नही रहा'
'ये सब मेरे साथ ही क्यू होता है?'
ह्या सर्व वाक्यांचं वादळ फिरत होतं डोक्यात.
त्या रात्री झोप नाही आली, मावशीने परत काही विषय नाही काढला म्हणा, पण मनातून तो विषय आजतागायत गेलेला नाही, जाणार ही नाही.
दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये, हे तेव्हा लक्षात आलं, त्याचा पुढे किती फायदा / तोटा झाला ही गोष्ट अलाहिदा.
पण The most embarrassing moment म्हणून हा प्रसंग कधीच off the list होणार नाही हे नक्की 😣
#सशुश्रीके । ११ जुलै २०१७
Comments
Post a Comment