आजी
आजीला आमटी खुप आवडायची,
दात नसतील म्हणुन काय!?
पोळी, भात, थालीपीठ काय जे असेल त्यात आमटी,
आमटी कमी असेल तर...
त्यात पाणी ओतून गरम करून पोळी कुस्करून खायची,
मला ही द्यायची!
आणि आमटी नसेल तर चहा पोळी!
त्यात माझाही वाटा…
ते पण तिच्या हातांनी :)
तेलकट कपाळ, कपाळाला अगदी चिकटलेले तिचे अर्धे पांढरे काळे केस, चेहर्यावर सुरकुत्या, ओठांवर उभ्या बडीशोप आकाराच्या सुरकुत्या, जवळपास सर्वच दात गेलेले, एक छोटी काळी टिकली, कानातलं घालायची… ५मोती असलेला तो प्रकार मस्त दिसायचा तिला… लुगडं, बहुदा काही नक्षी असलेले आकाशी निळ्या रंगाचं, पांढरा ब्लाउज, भेगा पडलेले थकलेले पाय, तिच्या पायावर हिरव्या शीरा दिसायच्या, कधी कधी तंद्री लागायची त्या बघताना! हातात बघावं तेव्हा कुठलं तरी देवांचं पुस्तक, तोंडात सदैव देवस्मरण… ऐकायला कमी कमी येऊ लागल्यांनी बाबांनी श्रावणयंत्र आणून दिलेले, कधी कधी मुळीच ऐकू यायचं नाही मग सगळ्यांचाच आवाज वाढायचा, मग म्हणायची "अरे हो हो ऐकू आलाय मला!" म्हातारपण हो! काय इलाज नसतो म्हातारपणाला, असो… मोठा चष्मा… वाचायला आणि लांबचं पहायला ही, तीला गुजरातीही उत्तम यायचं, बडोद्यात होती ना रहायला, मग किंगसर्कल-माटुंगा, त्यामुळे अर्ध्याहून ज्यादा पब्लिक गुजराती होतं, मला छान छान गोष्टी सांगायची, खास करून बाबांचे आणि काका-आत्याचे लहानपाणीचे किस्से ऐकताना तिचे बोलणे कधी संपूच नये असं वातायचं! 'नष्ट' आहे मेला… किंवा 'नतद्रष्ट' असे मला दिवसातून एकदा तरी म्हणायचीच!!!

४मुलं १मुलगी असलेली, ३नातू १नात असलेली माझी आजी, पूर्ण नाव 'प्रमिला केशव केतकर'. बाबा-आई मला रागावले की मला जवळ घ्यायची, तिचा तो ओला पदर जाम माया द्यायचा, ही माझी आजीची काय माझ्या सारख्या लाखो मुलांची आजीची ओळख असेल! आजी म्हणजे २आयांची मिळून ओतलेली माया! तिच्या शिवायचं बालपण म्हणजे वाया… भर उन्हातली थंड छाया!
आजी परत भेटशील तेव्हा कुस्करलेली पोळी आणि ती आमटी परत दे हं!
डोळे-चिंब, दाट-लाळ, कंठ-कडक! असच होतं… नेहमी आठवण येते नी असच काहीतरी होतं!
कठोर देव!
#साशुश्रीके । १५ ऑगस्ट २०१५ । वेळ ११.२४

खूपच छान.
ReplyDeleteमस्त लिहलयस..
ReplyDeleteChaha poli !!!!!!! Aaahh mazi aaji athavli
ReplyDelete