वाल
आत्ता घरी हातसडीचे पोहे खात असताना एक किस्सा आठवला...
आईने सांगितलेला 'वाला' बद्दल एक किस्सा...
आम्ही आक्षी गावातून जात होतो,
आम्ही म्हणजे मी बायको मुलगी आणि आई,
समुद्रावर जाता जाता शेतजमिनी दिसत होत्या,
आई आम्हाला सांगत होती...
"ह्या ज्या जागा दिसत आहेत ना,
त्या आम्ही भाड्याने घ्यायचो,
वालाच्या शेतीसाठी."
मग मी कुतूहलतेने विचारलं
"मग तुम्ही विकायचे का ते!?"
तर आईचं उत्तर
"नाही रे, घरच्यासाठीच!"
हे ऐकून मला काय बोलावं कळेच ना,
म्हणजे जागा भाड्याने घेऊन मेहेनत करून पिकवलेले अन्न
स्वतः च्या घरापूरते वगैरे!
थोडक्यात काय
*आता पैसे कमावतात...*
*पूर्वी अन्न कमवायचे लोकं*
म्हणून अन्नाला *चव* आणि *किंमत* दोन्ही होती!
#सशुश्रीके १४/११/२०१७
(वाल*- कोकणात ह्याच वल्याची उसळ खूप प्रसिद्ध आहे)
म्हणून अन्नाला *चव* आणि *किंमत* दोन्ही होती!...क्या सही बात कही है दोस्त👌👍😊
ReplyDelete