जाने कहा गए वो दिन!

मुंबईत XXX ओफिस मध्ये एकदा क्लाएंट कडे काम पाठवलं आणि दुसरी काही गडबड नसेल किंवा लन्च टाइम ला आम्ही रँडम नंबर ला कॉल करून काहीही बडबडायचो, एकदा मी असाच एक कॉल लावला, टीपी सुरु झाला, आज काही जमत नव्हतं, म्हणजे रोजच्या सारखी मजा येईना, आमच्या टोळीमधला एक कलीग म्हणाला, चल हो बाजूला मला करुदे आता कॉल!

त्याने लावला कॉल (त्यावेळी डिरेक्ट्री असे, त्यामुळे ज्याला फोन लावायचा असेल त्याचं नाव घेतलं की अर्ध काम फत्ते) फोन उचलल्यावर तो म्हणाला Mr कदमजी है, उनसे एक अर्जंट बात करनी है... समोरच्या व्यक्तीने... "सर आपके किये कॉल है" वगैरे सुरु झालं, आणि मग झाला टाईमपास सुरु, "आपने दिये हुए पैसे खतम हो गये सर" अशी काहीही बडबड सुरु झाली हे सगळं संभाषण जवळजवळ ८-१० मिनिट चालू होतं, शेवटी त्या Mr. कदमला ही कळालं असावं की समोरचा टाइम पास करतोय, कारण माझा मित्र इतका सुटलेला की त्याला अधून मधून हसणं कंट्रोल होत नव्हतं, त्यामुळे तो Mr कदम ही मित्राला मस्त उत्तरं द्यायला लागला, शेवटी मित्राचाच पेशन्स संपला, त्याला काळालं की हा आपल्या पेक्षा कलंदर दिसतोय!

फुल्ल इम्प्रेस झाला 'गम्मत मै गम्मत पराग गम्मत' म्हणून तो Mr कदमला म्हणाला...

"यार छोड, मेरी चोरी पकडी गई तू जिता मै हारा, अब इतना टाईमपास होगया है तो थोडा और सही , मेरे बॉस XXX को फोन लगा, नम्बर है XXX उसको सिर्फ बोल XXX कंपनी से XXX बात कर रहा हू , आज के मीटिंग मै एक ड्रेस कोड है, आपको ब्लॅक सूट ग्रीन शर्ट और रेड टाय मै आना पडेगा और..." आणि हे सगळं बोलताना मागे वळून बघतो तर बॉस सगळं ऐकत होता गुपचूप.

मित्राच्या चेहऱ्यावर १२ वाजलेले, काही न बोलताच रिसीव्हर फोन वर हळूच ठेऊन दिला. मला आणि इतरांना कुठे जाऊ काय करू झालेलं, पण कहानी मै 'अनएक्सपपैक्टेड' ट्विस्ट असा की बॉस इतका 'सर्प्राइसजिंगली कूल' होता त्याने तो डेस्क वरचा फोन हातात घेऊन रिडायल मारला आणि फोन उचलल्यावर शून्य हावभाव ठेवत म्हणाला, "ये नम्बर सेव कर लेना भाई, अगर वापस आए तो उठाना मत! बडे शैतान किसम के लोग बैठे है याह पे!" आणि शांत पणे स्वतःच्या कैबिन मध्ये मित्राला घेऊन गेला, आत काय झालं ते महत्वाचं नाही पण त्यानंतर मात्र कधीच आम्ही ऑफिस मध्ये बॉस 'असताना' असले चाळे केले नाहीत.

असो... धम्माल होती, तेव्हा असले शाळेत/कॉलेज मध्ये शोभणारे पण डेंजर लेव्हल वाले किडे/राडे करायला जाम म्हणजे जाम मजा यायची, पिझ्झे/बर्गर ऑर्डर करा, आले की सांगायचो आम्ही नव्हते केले, आणि बरच काही... कामामुळे कितीही 'लागलेली' असली तेरी 'निर्लज्ज' आणि 'सदासुखी' नावाच्या गाढवांशी गट्टी होती जमलेली!

मुंबईच्या ऍडव्हरटाईजींग एजेन्सीची सर कुठेच नसणार फॉर शूअर... सगळेच एक्सेक कैरेकटर्स बीसी!

#सशुश्रीके 


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...