व्यक्त व्हा!
मोठी गोष्ट! व्यक्त व्हा... म्हणजे फेबु / ट्वीटर हे माध्यम नाही प्रत्येक गोष्ट सांगायला, पण इन जनरल सांगतोय.
हल्ली कमी वयातच तणावाने हार्ट एटॅक येतात, काही आत्महत्या करतात, आणि ह्याचा अंत चांगला नसतोच. भविष्यातील 'डॅमेज' अटळ!
आनंद वाटण्याने सुख वाढते, आणि निराशा न वाटण्याने दुःख. हे लिहायला/बोलायला/ऐकायला कितीही सोपे असले तरी हेच खरं आहे.
मनात जे असेल ते मनात ठेवून मन जड करण्यापेक्षा हलकं व्हा, खिडकी बंद करून श्वास कोंडण्यापेक्षा जराशी उघडी खिडकी कधीही चांगली... नाहीतर शेवटी ऑक्सीजन लावायची वेळ येते.
स्वतःची काळजी घ्या, तुमच्यावर इतरही अवलंबून आहेत हे लक्षात ठेवा.
- तुमचाच काहीसा गंभीर समीर.
Comments
Post a Comment