१०२ नॉट आऊट / 102 NOT OUT

102 NOT OUT छानच टाइम पास आहे, 
दोन महान बॉलीवूड म्हाताऱयांनी मजा केली आहे मस्त, शेवटी भावनात्मक शेकोटी आहे, कथानकेकला उबदार पणा छान येतो त्यामुळे, कुठे बोर वगैरे होत नाही. १०२ वर्षाचे वडीलच मुलाला वृद्धाश्रमात टाकतात ही गम्मत तर ट्रेलर मध्येच सांगून टाकली आहे त्यामुळं त्याहून जास्त काही पाहायला मिळेल असं वाटतं... आणि तसं आहे ही काही, पाहून बघा... आवडला नाही तरी नाही आवडला असं तरी म्हणणार नाही असा काहीसा आहे... म्हणजेच वन टाइम वाच नक्कीच! औलाद अगर नालायक हो, तो उसे भूल जाना चाहिये, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिये. अमिताभने हा डायलॉग इतका नैसर्गिकपणे म्हटला आहे, की अभिषेकला सिनेमे मिळत नसल्याचं आठवल्याशिवाय राहवत नाही. डायलॉग रायटरला दंडवत!  

3 स्टार्स फ्रॉम मी

#सशुश्रीके


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...