पाणी चालूच, नळ वाहतोय बदाबदा!

परवा एका हॉटेलात गेलेलो,
जेवून झाल्यावर हात धुवायला बेसिनला...
माझे हात धुवुन झाले रुमाल काढला चेहरा पुसला,
समोर एक तरुण त्याचे हात धुवून झाल्यावर चेहरा आरश्यात बघत टाइम पास करत होता,
१०-२०सेकंद झाली त्याचा टाइम पास सुरूच...

पाणी चालूच, नळ वाहतोय बदाबदा!

१: तेव्हा माझ्यातला क्रांतिकारी त्याच्या जवळ गेला, 
बेसिनच्या त्याच नळावर त्याचं डोकं इतकं जोरात आपटलं की रक्त वाहू लागले नाकातून, 
म्हणालो वाहू दे मदत येई पर्यंत.

२: तेव्हा माझ्यातला गांधी नळाजवळ गेला, 

नळ बंद केला, हसत हसत म्हणालो... 
"नळ बंद करायला विसरलात का आपण!?"

३: माझ्यातला मी पाहात बसलो... 

आणि निघून गेलो!

आजकाल 'मी' असलेले खूप आहेत जगात,
जास्त करून आपल्या अवती भवती!

आणि आपण म्हणतो आपण बदलल्या शिवाय देश कसा बदलेल!

लाज वाटत आहे लिहिताना,
पुढच्या वेळी असं काही घडलं तर क्रमांक एक करण्याची कितीही इच्छा असली तरी आवाक्यात असलेला क्रमांक २नक्की निवडीन.

🙏🏽

मी #सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...