'टर्म्स अँड कंडीशन्स अप्लाय!'

मुंबईत होतो तेव्हा लोकल मधून प्रवास करायचो तेव्हा चाळी /इमारती दिसायच्या... त्यांच्या खिडक्यांमधून पंखे दिसायचे... काही श्रीमंत काही गरीब 

प्रत्येक खिडकी वेगळी

वेगळं सगळं

काही सेकंद दुसऱ्या घरात डोळे अडकायचे, काय असेल त्यांचं जग ह्याचा विचार काही सेकंद

स्वतःच्या जगाचा विचार बाजूला ठवून असं दुसऱ्यांच्या जगात डोकवायचं

मला कधी कधी वाटतं की असं सहज शक्य असतं विचार करणं तसं दुसऱ्या माणसात आपण जाऊन कसं वाटेल!?

म्हणजे दुसरा आपल्यात त्याच्यात आपण! दृष्टिकोन सोडा... थेट आत्मा चेंज... धिस इज बीयोंड सायन्स आय नो... 

काय होईल असं झालं तर!?

अजब ना... रिक्षा वाला... चहा वाला पासून थेट तेंडुलकर अंबानी वगैरे

एक्सपेरिअन्स डिजाईन / प्रोडक्ट.. व्ही आर वगैरे हे सगळे बेसिक प्रकार... प्रायव्हसी इज इशू!

पण करा ना असा विचार

विचार करायला नो बौन्ड्रीज

थिंक वाईल्ड... जग मोठं आहे... आपलं मनाचं जग छोटं आहे! 

आत्ता ठरवलं तर तुम्ही तुमच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यात जाऊ शकता... हे भारी आहे!

हवं युरेका पेक्षा मोठं आहे!

#सशुश्रीके ला वेड लागलं आहे का वगैरे असा विचार होऊ शकेल हे वाचून, पण आत्माला परिसीमा नसाव्यात.. नसतील ही... कल्पनाशक्ती हा अफाट विषय आहे! गरीब श्रीमंत ही असू शकतो... जर तो आनंदी असेल तर! 

'टर्म्स अँड कंडीशन्स अप्लाय!'

गुड नाईट 😊

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...