पांघरूण
भयंकर झोप येत असते, हा देह त्या पलंगावर स्वतः ला खिंडीत ढकलून दिल्या सारखा कोसळतो...
आणि महा भयंकर कंटाळा येतो ते पांघरूण घ्यायला... नीट घडी करून पायाखाली असलेले!
कोण देणार का ते पांघरूण अंगावर...
आता झोप आणि माझ्यात कटुता निर्माण व्हायला सुरुवात
ते पाय मध्यस्थी करू पाहतात, पण ते हात थोडीच आहेत, हातांचा न्यूनगंड न मनाचा आळशीपणा तसाच!
पाय मात्र लढा देणे सोडत नाहीत, अर्धी खिंड जिंकली... घुडघ्यापर्यंत पांघरूण येतं!
१० मिनिटांच्या ह्या ओढाताणीत झोपेचा खून होतो...
पुढचे १/२ तास पांघरूण अंगावर असून ही निद्रा नाराज महोत्सव चालू असतो!
शेवटी नकळत कधीतरी निद्रा देवता प्रसन्न होते!
सकाळी जाग येते तेव्हा पुन्हा त्याच पांघरुणाचे ऋण पलंगाखाली धारातीर्थी झालेले असते!
ह्या पांघरुणाला कोणीतरी अक्कल द्या रे... तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं, पण ह्या विषयात कोणी काहीच केलं नाही अजून ही!
निषेध निषेध निषेध
समस्त झोपमोडी संघटना सदस्य #सशुश्रीके ह्यांच्याकडून बेअक्कल पांघरूण समाजाचा त्रिवार निषेध
Comments
Post a Comment