Posts

Showing posts from April, 2016

"चख ले ये मुरब्बा"

Image
"चख ले ये मुरब्बा" हे गाणं आणि अमित त्रिवेदी हा खरच एक 'मुरब्बा' आहे 👍👌 आज शफल वर गाणी ऐकत होतो, आणि मुरब्बाचं डूएट व्हर्जन लागलं, लयबद्ध... टीपटाप... सहज... साथीला व्हाओलीन... इलेक्ट्रॉनिक गिटार... बेस गिटार... स्मूद ज्याझ्झ... अमितचा स्वतः चा आवाज... कविता सेठ चा गोड'खारा' आवाज... अँड आइस ओंन केक म्हणजे स्वानंद किरकिरे साहेबांचे शब्द. अमिताभ स्लो मोशन मध्ये त्याच्या 'फॅन' नी आणलेला 'मुरब्बा' चाखतो! काय मस्तय सीन तो, हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा परत एकदा ऐकावच लागतं, कधी कधी तीनदा कधी चारदा. आत्ता ह्या लेखा निमित्त ५व्यांदा ऐकतोय ले...चख ले मुरब्बा किसी का संजोया हुआ तुझ तक आया है ले... चख ले ये मुरब्बा किसी का कदरदारियों का सरमाया है ये दिल मै रख ले रख ले ये... मुरब्बा ह्या कडव्या नंतर जो काय सोलो गिटार पीस आहे! बास रे बस!!! (2:32-2:47) ह्याच अलबम मधल्या बाकीच्या गाण्यांमध्ये अजून वक गाणं पण मस्तय, 'अक्कड बक्कड' गायलंय मोहित चौहाननी... अक्कड बक्कड बंबे बो, एस्सी नब्बे पुरे सौ... सौ ...

सात दिवस

त्या सकाळी म्हणालो... "सात दिवस उरले" आज... "सात दिवस संपले कसे!?" सात दिवस आपले, अडीच दिवस माझ्या पुण्याचे, बाकीचे आमच्या मुंबईचे, सात दिवस संपले! एक उन्हाळा एक लग्न काही मित्र काही नाती कधी एकटा कधी गर्दी रोज आठवण रोज ऑनलाइन आज पण... ऑनलाइन इथे असलो की तिथली ओढ तिथे असलो की इथली असला मी पूर्ण अर्धवट सदा हावरट सगळं हवं हे सात दिवस प्लस मायनस गोळा बेरीज शून्य आई बाबांचे पुण्य सात दिवस उरले पासून सात दिवस संपले सात दिवस हरवले सात दिवस ‪#‎ सशुश्रीके‬ । २७ एप्रिल २०१६

।। प्रश्नावली ।।

बाबा बाबा दमलास का? बाबा बाबा दमलास का? ऑफिसच्या कामांनी थकलास का? जरा मोबाईल बाजूला ठेवतोस का? मग टीव्ही समोर असा बसतोस का? माझ्याशी जरा खेळतोस का? खेळणी जरा मांडतोस का? पत्...

प्लॅटफॉर्म

Image
'प्लॅटफॉर्म' इसी 'प्लॅटफॉर्म' पे... अमीर देखें, देखे हमने गरीबभी. यहां देखी सुबह सुरजसे पेहले, यहां देखी रात चांदके साथ, यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद. यही दिखते थे लोग अंजाने, कोई घबराए, कोई मुस्कुराते, कोई मेरे जैसे, जाने अंजाने, इसी 'प्लॅटफॉर्म' पे... मस्त नाव आहे नई? मला तर जाम आवडतं, (प्लॅटफॉर्म म्हणजे... रेल्वे प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, इतर ही प्लॅटफॉर्म असतात म्हणा पण मुंबईत राहिलेल्या माणसाला एकच प्लॅटफॉर्म माहीत असतो त्यातलाच मी एक, असो...) त्यावर सगळी मंडळी (वाट बघत) असतात! अगदी न जन्मलेल्या जीवापासून ते अंतिम श्वास घेणाऱ्या जीवापर्यंत. तिकीट खिडकीमधले काका/काकू निष्कामकर्मयोगाने तिकिटे देत असतात, आता तर काय, स्वयंचलित यंत्रे पण आहेत... पैसे घाला तिकिट बाहेर... मनात गाणं सुरु, "गाडी बुला राही है, प्लॅटफॉर्म  पे आ राही है". ह्या प्लॅटफॉर्म वर आपापल्या 'मंझिल' साठी लोकलची वाट बघत प्रवासाला सज्ज होतो मुंबईकर, कोणी फर्स्टक्लास मध्ये तर कोणी सेकण्ड तर कोणी थेट टपावर! कोणी पासवाला तर कोणी तिकिट, विना तिकीट...

"सचिन… सचिन!"

Image
पर्वा मित्राने एक चित्रफीत पाठवली व्हाट्सअप वर, त्या चित्रफीतीत एक चिमुकला फलंदाजीचा सराव करत होता, जेमतेम १०सेकंदाच्या फितीत एक देखणा फटका... पुढे सरसावत अगदी... अगदी हुबेहूब तेंडुलकर सारखा! मी बघता क्षणीच म्हणालो कोण रे हा! काय डिट्टो सचिन स्टाइल मारलाय शॉट! मित्र म्हणाला... माझा भाचा आहे, अरे त्याला तेंडुलकर कोण माहीत पण नाही, त्याचा आदर्श विराट! विराट सारखा खेळतो तो हे ऐकल्यावर कसंतरीच झालं ना! अमुक अमुक प्रसिद्ध व्यक्तीला तेंडुलकर माहीत नाही, ही न्युज होते हल्ली! आता तेंडुलकर निवृत्त झाल्यावर नवीन पिढीला तेंडुलकर बद्दल तेव्हढी ओढ/आदर नसणार जितका आपल्या किंवा आपल्या आधीच्या काही पिढ्यांना आहे. माझ्या सारख्या लोकांना पण पूर्वीच्या क्रीकेटपटुंची महती कळणार नाहीच! मोठयांकडून ऐकतो मी नेहमी असं काहीतरी... "अरे पूर्वी सारखे खेळाडू नाहित आता, वेस्टइंडीज टीम इतकी खतरनाक होती, की मायकल होल्डिंग, मैलकम मार्शल, अँडरसन रॉबर्ट ह्यांपुढे कोणी टीकणं तर महा कठीण इतर गोलंदाज अक्रम, वकार, मैकग्रा, लिली वगैरे पण काय स्विंग काय स्टाईल!... बोलींग मध्ये एक 'क्लास' होता, फलंदाजांमध्ये विवि...

"The Best Camera Is The One That's With You"

Image
"The Best Camera Is The One That's With You" अगदी लहानपणापासूनच कॅमेरा पहात आलोय, माझ्या वडलांना फोटो काढायची खूप हौस, त्यांचे जुने फोटो अल्बम घेऊन बसलो की २ तास कसे जातात कळतही नाही! 'याशिका ट्वीन लेन्स कॅमेरा', 'याशिका इलेक्ट्रो ३५' (पहिला वाहिला बैटरी चलीत कॅमेरा), '१००० पोलोरोइड' असले विविध प्रकार…पण 'याशिका इलेक्ट्रो ३५' सोडल्यास बाकीच्या दोन्ही कैमेर्याच्या फिल्म्स आता मिळत नसल्यानी 'कलेक्टर्स आयटम' विभागात गेलेले आहेत आता. अजून ही आहेत सर्व जपून ठेवलेले, ह्या पोस्टात हे सर्व कॅमेरे छायाचित्रांद्वारे चिकटवतोय. जन्मा आधी - जन्मा पासून - कॉलेज पर्यंत बाबांमुळे खूप क्षण फोटोमध्ये कैद झाले, त्यांच्या ह्या अनमोल खाजीन्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे तेव्हढे कमीच. ५०-६० वर्षापूर्वी जन्माला आलेल्या आणि छायाचित्र काढण्यात रस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे 'एव्हल्युशन' अनुभवले, ब्लाक एंड व्हाईट - सेपिया पासून आत्ताचे रंगीत छायाचित्रांपर्यंत! त्यानंतर आले ते डिजिटल कॅमेरे माझा पहिला कैमेरा म्हणजे सोनीचा मोबाईल कैमेरा, जास्त ...

काय वजन असतं क्षणांना!

Image
काय वजन असतं क्षणांना! आज अन्वयच्या 'केजी-वन' चा पहिला दिवस! तिला कधीपासूनच्या आवडणाऱ्या 'बिग येलो स्कूल बस' ने आज शेवटी ती शाळेपर्यंत गेली, मी ही गेलेलो मागे मागे, अमृताचा सल्ला ऐकला, 'जाऊन बघून ये हं, ती निट  जात्ये की नाही शाळेत!' शाळेत उतरल्यावर माझ्यासारखे उत्साही पालक मंडळी ही तिथे हजर होतीच, मी कुतुहलतेनॆ तिचा फोटो कढायला जरा तिच्या जवळ गेलो, त्यांची छान रांगेची 'ट्रेन' करवत शाळेची एक कार्यकर्ती त्यांना शाळेत घेऊन जात होती… मी फोटो काढला तेव्हढ्यात अन्वयाने मला पहिले आणि हसली :) मी ही तिला पाहुन हसलो… अमृताने सांगितलेला सल्ला पाळला, पण तिचा आतपर्यंत पाठलाग करायची माझी खाज महागात पडली, अन्वया मला बघत आत त्यांच्या 'क्लासरूम' शिरताच रडायला सुरुवात! मला राहवेना, पण आत गेलो असतो तर ती अजून रडली असती! जड पावलांनी रिव्हर्स गियर मारला… पुढे अमृताच्या शिव्या खाल्ल्या, आता पोट भरलय. हे सर्व लिहिताना माझा शाळेतला पहिला वाहिला दिवस आणि तो क्षण आठवला, माझ्या उंचीपेक्षा जास्त असलेल्या खिडकीच्या गंजांना पकडून ढसाढसा रडत होतो, समोर आ...

विचित्र हल्काफूल्का किस्सा

आज गम्मतच झाली, मी ऑफिसच्या लिफ्ट मधून येत होतो, एक मलबारी आणि एक सिरीयन/अजीप्शियन असावा, दोघांच्या हातात फेड-एक्स चे मोठे खोके होते, मलबारीच्या हातात जो खोका होत्यावर लिहिलेले फ्रॉम 'कराची, पाकिस्तान' मी मनातल्या मनात म्हणालो चायला बॉम्ब वगैरे तर नसेल ना, पण उगाच मी माझे हे 'भोळे भाबडे' विचार जाहीर रीत्या प्रकट करण्यात सफल झालो, पण तेव्हढ्यात तो सिरीयन/अजीप्शियनच बोलून गेला … 'आय होप इट्स नॉट बॉम ऑर समथिंग लाइक दैट!' हे ऐकून लिफ्ट मधले आम्ही सर्व भुवया उचावून हसलो, मी बॉम्ब फुटायचा छोटा आवाज ही केला… एकूणच विचित्र हल्काफूल्का किस्सा झाला, माझा मजला आल्यावार मी त्यांना 'बेस्ट ऑफ लक' देऊन हा स्टेट्स अपडेट मारला. Feeling #कानफाट्या_नाव_पडलं_की_असंच_होतं !