"सचिन… सचिन!"

पर्वा मित्राने एक चित्रफीत पाठवली व्हाट्सअप वर, त्या चित्रफीतीत एक चिमुकला फलंदाजीचा सराव करत होता, जेमतेम १०सेकंदाच्या फितीत एक देखणा फटका... पुढे सरसावत अगदी... अगदी हुबेहूब तेंडुलकर सारखा!

मी बघता क्षणीच म्हणालो कोण रे हा! काय डिट्टो सचिन स्टाइल मारलाय शॉट!

मित्र म्हणाला... माझा भाचा आहे, अरे त्याला तेंडुलकर कोण माहीत पण नाही, त्याचा आदर्श विराट! विराट सारखा खेळतो तो

हे ऐकल्यावर कसंतरीच झालं ना! अमुक अमुक प्रसिद्ध व्यक्तीला तेंडुलकर माहीत नाही, ही न्युज होते हल्ली! आता तेंडुलकर निवृत्त झाल्यावर नवीन पिढीला तेंडुलकर बद्दल तेव्हढी ओढ/आदर नसणार जितका आपल्या किंवा आपल्या आधीच्या काही पिढ्यांना आहे.

माझ्या सारख्या लोकांना पण पूर्वीच्या क्रीकेटपटुंची महती कळणार नाहीच! मोठयांकडून ऐकतो मी नेहमी असं काहीतरी... "अरे पूर्वी सारखे खेळाडू नाहित आता, वेस्टइंडीज टीम इतकी खतरनाक होती, की मायकल होल्डिंग, मैलकम मार्शल, अँडरसन रॉबर्ट ह्यांपुढे कोणी टीकणं तर महा कठीण इतर गोलंदाज अक्रम, वकार, मैकग्रा, लिली वगैरे पण काय स्विंग काय स्टाईल!... बोलींग मध्ये एक 'क्लास' होता, फलंदाजांमध्ये विवियन रिचर्ड्स, वौ बंधू, बॉर्डर, बॉथम, ग्राहम गूच, आपला गावसकर, श्रीकांत... अष्टपैलूंमध्ये इम्रान, कपिल, सोबर्स, हैडली वगैरे."

३३ वर्षात निदान २० वर्ष तरी क्रिकेट पहात आलेलो असेन, सचिनच्या विक्रमांच्या आसपास यायची चेष्टा सेहवाग, लारा आणि पोंटिंग ने केली आणि कोहली कदाचित ते विक्रम नजीकच्या काळात तोडेल ही, पण सचिन सचिन आहे! कोणी आसपास असेल तरी सचिनच दिसेल मला आधी!

"सचिन… सचिन!"

#सशुश्रीके । १२ एप्रिल २०१६


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!