सात दिवस

त्या सकाळी म्हणालो...
"सात दिवस उरले"
आज...
"सात दिवस संपले कसे!?"

सात दिवस आपले,
अडीच दिवस माझ्या पुण्याचे,
बाकीचे आमच्या मुंबईचे,
सात दिवस संपले!

एक उन्हाळा
एक लग्न

काही मित्र
काही नाती

कधी एकटा
कधी गर्दी

रोज आठवण
रोज ऑनलाइन

आज पण...
ऑनलाइन

इथे असलो की तिथली ओढ
तिथे असलो की इथली

असला मी पूर्ण अर्धवट
सदा हावरट

सगळं हवं

हे सात दिवस
प्लस मायनस

गोळा बेरीज शून्य
आई बाबांचे पुण्य

सात दिवस उरले
पासून
सात दिवस संपले

सात दिवस हरवले
सात दिवस

‪#‎सशुश्रीके‬ । २७ एप्रिल २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!