Posts

Showing posts from May, 2016

फणस!

Image
    आत्ताच एक क्लिप पाहिली, फणस किती उपयोगी फळ आहे, वगैरे वगैरे! तडीक शेयर पण केला व्हिडिओ... असो, मला काय म्हणायचं होतं ते सांगतो एकदा अक्षीला दुपारी जेवल्यानंतर म्हशीचा चारा असतो ना त्यावर जाऊन खेळायचं, म्हणजे ती फाईव्हस्टार हॉटेल वाली गादी असते ना, तसाच अनुभव! कितीही दंगा करा... मस्त 'सेफ' वाटायलाचं! एके दिवशी त्या पेंढ्यावर गोणपाट होतं, ते नाजरंदाज करत जी काय उडी घेतली मी त्यावर, आणि जो काय बोंबललोय नंतर, त्या गोणपाटा खाली फणस होता हो! एक नाही चांगले २-३होते! पण हे सांगणार कोणाला... रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्याचा पिल्लासारखा कळवळलो न ढुंगण खाजवत दंगा त्या दिवाशीपुरता रद्द केलानी... काय समजलात! #सशुश्रीके | २२ मे २०१६

उनाड दुपार

Image
उनाड दुपार - भाग १ झोप... छे!   झोप वगौर म्हातारे लोक्स घेतात! झोपेची वेळ तर फार महत्वाची वेळ, अक्ख गाव झोपलेलं आणि तुम्ही मस्त जेवण जिरवायला मोकळे, ताकाची चूळ भरून... दातात अडकलेले लोणी दातांच्या फटीतून खेचत उनाडगिरीला सुरुवात! पहिली भेट विहिरीला.. त्या अर्धमेल्या छोट्या बादलीला पायाने ढकलून बळजबरी 'आत्महत्या' करायला लावत माझे स्वार्थी दोन हात तिला जीवदान देण्यासाठी परत वर खेचत, का तर तांब्यातले पाणी पुरले नाही म्हणून! आणि अश्या ताज्या थंड पाण्याला कोण सोडणार, त्यातच ते पाणी अर्ध अंगावर, मग ते सुखवण्यासाठी उन्हात काठी आणि टायर घेऊन सुसाट ह्या वाडीतून त्या वाडीत. घाबरायचो नाही कोणालाच भीती मात्र वाटायची त्या भल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक खांबाची, किर्रर्रर्रर्रर्र असा अखंड आवाज, आणि त्यावर वायरांच ते जंजाळ! तिथे आलो की माझा वेग कमी असेल तर वाढायचा आणि जास्त असेल तर कमी व्हायचा! कायतरी विचित्र जागा होती ती... कोकणातलं सूक्ष्म बर्मुडा ट्रायांगल म्हणा ना! असो, रस्त्यावर पडलेल्या आणि गाड्यांच्या चाकांमुळे चिरडल्या गेलेल्या शहीद चिंचा आणि जांभळं पाहून मन कसं जड...

रामभाऊ

रामभाऊ आमच्या शाळेतले शिपाई. नाव रामभाऊ... घंटा वाजवायला, फाईली आणायला, फाईली पोचवायला, पालकांना विद्यारथ्यांचे वर्ग दाखवायला, साफसाफाई वगैरे अगदी सर्वच कामासाठी रामभा...

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते! दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील… पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला. युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप. त्यात माझ्या पुणेरी ड्रायविंगला आई पदोपदी 'मी चालवू का' अशी दाद देत होती, मी म्हणायचो अगं मी चालवतोय तशी चालवली नाही तर आपण आत्ता युनिव्हर्सिटीलाच असतो! फिल्म इंस्टीट्यूटच्या सिग्नलला परत तेच, 'मी चालवू का!?' मी शेवटी वैतागून उतरलो, म्हंटलं 'घे बाई, चालव!' निदान मागे बसून आईच्या शिव्या खाण्यापेक्षा व्हाट्सपिंग/फेसबुकिंग करावं! तर मागे बसल्या बसल्या मंदारचा फोन (माझा मित्र) त्यात त...