फणस!

 






 
आत्ताच एक क्लिप पाहिली, फणस किती उपयोगी फळ आहे, वगैरे वगैरे!
तडीक शेयर पण केला व्हिडिओ... असो, मला काय म्हणायचं होतं ते सांगतो
एकदा अक्षीला दुपारी जेवल्यानंतर म्हशीचा चारा असतो ना त्यावर जाऊन खेळायचं, म्हणजे ती फाईव्हस्टार हॉटेल वाली गादी असते ना, तसाच अनुभव! कितीही दंगा करा... मस्त 'सेफ' वाटायलाचं!

एके दिवशी त्या पेंढ्यावर गोणपाट होतं, ते नाजरंदाज करत जी काय उडी घेतली मी त्यावर, आणि जो काय बोंबललोय नंतर, त्या गोणपाटा खाली फणस होता हो! एक नाही चांगले २-३होते!

पण हे सांगणार कोणाला... रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्याचा पिल्लासारखा कळवळलो न ढुंगण खाजवत दंगा त्या दिवाशीपुरता रद्द केलानी... काय समजलात!

#सशुश्रीके | २२ मे २०१६


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!