सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!

दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील…
पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला.

युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप. त्यात माझ्या पुणेरी ड्रायविंगला आई पदोपदी 'मी चालवू का' अशी दाद देत होती, मी म्हणायचो अगं मी चालवतोय तशी चालवली नाही तर आपण आत्ता युनिव्हर्सिटीलाच असतो! फिल्म इंस्टीट्यूटच्या सिग्नलला परत तेच, 'मी चालवू का!?' मी शेवटी वैतागून उतरलो, म्हंटलं 'घे बाई, चालव!' निदान मागे बसून आईच्या शिव्या खाण्यापेक्षा व्हाट्सपिंग/फेसबुकिंग करावं! तर मागे बसल्या बसल्या मंदारचा फोन (माझा मित्र) त्यात त्या अती-छोट्या रस्त्यांवरच्या अती-प्रचंड ट्राफिक मध्ये मला त्याचं काही ऐकू येत नव्हतं, आई आपली चालवत होती मला डबलसीट घेऊन जमेल तसं, तिला एकटे चालवायला छान जमत असेल हो! पण कोणाला मागे घेऊन चालवणे वेगळी गोष्ट आहे, असो. माझा फोन चालूच होता 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मंदारला सांगत होतो…

सिग्नल आला नळ स्टॉप च्या अलीकडचा, आईनी वाहन थांबवले, माझा फोन चालूच,  'फोन वर आवाज येत नाही' असं मी मित्राला वारंवार सांगत होतो ते आईने ऐकले आणि वैतागून मला म्हणाली 'अरे, ऐकायला येत नाही तर… पुढे जाऊन बोल!' हे बाजूच्या दुचाकी वीराने ऐकले… तो उत्तरला "अजून कुढे पुढे जाऊ म्याडम?" मी आणि आईने त्या माणसाकडे पाहिले, आणि मी झालेल्या 'गलतफैमिली' वर हसत उत्तर दिले, (हातातला फोन तसाच ठेवत) 'अहो काका, तुम्हाला नाही बोलली ती, ती माझाशी बोलत आहे, मी फोन वर आहे, आणि मला आवाज येत नाही म्हणून 'पुढे जाउन बोल' असं सांगत्ये, तुम्हाला काही बोलली नाही हो ती!' हे ऐकताच मला तो ईसम म्हणतो कसा... 'अरे पण तू चालव की, आईला कशाला त्रास देतोयस!' ह्यावर मी अजून हसून म्हणालो, "अह्हो, सांगावीपासून मीच चालवतोय, मागच्या सिग्नल पासून आई चालावत आहे, तिला मागे बसून घाबरायला होतंय म्हणून!" हे वाक्य संपताच सिग्नल सुटला, आणि तो सिग्नल हिरवा होताच साहेबांनी जो काय पीकअप घेतला ते थेट सायकल लेन मध्ये, जिथे स्टील चे ३ खांब असतात, जीथे फक्त चालणारे किव्वा सायकल वालेच जाऊ शकतात, त्यात त्यांची ती छोटी दुचाकी त्यांच्या विराट कौशल्याने घुसवत साहेब गायब! शेवटी मी नळ स्टॉपवर आईला म्हणालो 'आई मी चालवतो आता गाडी, तू चालवत असशील नीट, पण एकटे चालवणे वेगळे आणि कोणाला मागे बसवून चालवणे वेगळे!' आईला माझा सल्ला पाटला (किंवा तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हता, असं समजा), मग पौड रोड ला लागेपर्यंत त्या 'दुचाकी वीराबद्दल' आम्ही बोलत होतो!

बाकी सिग्नल वर ईतकी बडबड फक्त पुणेरीच करू शकतो, आणि त्यात मी ही अर्धा पुणेकर, तो सिग्नल अजून एक मिनटाचा वगैरे असता तर त्या माणसाचे नाव-गाव ही कळाले असते! असो…

ह्या सर्व भानगडीत फोन कधी कट झाला त्याकडे लक्षच गेले नाही. पुन्हा कधी (पुण्यात) मागे बसूनही फोन न घेणे हेच ईष्ट!

#साशुश्रीके । ०५ मे २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!