आठवणींचं जग

आठवणींचं जग कसं वेगळं असतं,
बंधनं नसतात, नसतात नियम!

कुठे ही जा, केव्हा ही जा...

पण काय आहे ना...
सगळं 'स्क्रीपटेड' असतं,
माहीत असतं काय होणार!
कसं, केव्हा, कधी.. सगळं.

काहीच बदलता येत नाही...

तरी आठवणींत रमायला जास्त आवडतं,
कितीही 'स्क्रीपटेड' असलं तरी शेवटी,
'ओरिजिनल' ते 'ओरिजिनल'च असतं.

तुमच्या आमच्या सगळ्यांचं,
आठवणींचं जग कसं वेगळच असतं!

#सशुश्रीके । १४ डिसेंम्बर २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!