वाट

वाट पाहणे संपत नाही...

जागा बदलतात
माणसं बदलतात
स्वप्न बदलतात

वय वाढतं
अपेक्षा वाढतात
वाढतात नाती

वाट पहायची सवय लागते
वाट सोडण्याची गरज वाटते
वाट दाखवण्याचे धाडस लागते

पहिल्या श्वासा पासून
शेवटच्या श्वासा पर्यंत...

वाट पाहणे थांबत नाही!

#सशुश्रीके । २ डिसेंम्बर २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!