Posts

Showing posts from March, 2017

लाल पाठ

Image
एकदा लहानपणी... म्हणजे साधारण पणे २रीत वगैरे असेन, तेव्हा पेप्सीकोला घेतलेला, एक सोडून २... लांब वाले १रुपयाचे, हातात होते जस्ट घेतलेले. ब्राह्मण म्हणून जेवायला गेलेलो त्याची दक्षिणा मिळालेली त्या पैशाची अशी उधळपट्टी करायचो... समोरून आई आली, हातात पिशव्या होत्या, चालून चालून दमली होती बिचारी, मला बघून म्हणाली काय आहे हातात... मी लपवत होतो, आईने पिशव्या खाली ठेवल्या, आणि माझ्या मागे आले,मी हात पुढे नेले, हे काय!? काही नाही काठ्या आहेत रंगीत   माझी पाठ लाल झाली काही क्षणातच! #सशुश्रीके

दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम...

लिफ्ट मध्ये भयाण शांतता असते, आणि मॅक्सिमम कॅपसिटी १०लोकं असेल आणि त्यात तेव्हढीच लोकं असतील तर काही बघायला नको, डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी लोकं वर खाली *शून्य अवकाशात शून्य* पाहात असतात, तेवढ्यात एक आवाज येतो, नको तिथून... ...म्हणजे पोटातून... भूक लागल्यावर येतो तो! 😯 माझ्या बाजूलाच एक लठ्ठ माणूस डोळे वर करून *हे आत्ताच व्हायला हवं होतं का?* अश्या भावनेचा चेहराविष्कार करतो. 🙄 माझ्या हातात असलेला बिस्कीट पुडा मी हळूच त्याच्या हातात सुपूर्त करतो, तो घ्यायचा नाहीये ह्या शरीराविष्कार तुडवत हातात घेतो. तेव्हढ्यात माझा मजला येतो. 🚶🏽 🤚 राहूदे चा हाताविष्कार फुलवत मी माझ्या मजल्यावर रवाना होतो. धन्य ते पोट... धन्य त्याचं नशीब! 😂 दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम ते हेच! 😇 #सशुश्रीके

Those 2 nights of ARRahman's LIVE IN CONCERT by Matrubhumi in Sharjah, UAE 18th March 2017

#Rockstar नंतर सुफी कॉन्सर्ट आता मी इथे दुबईत २००७ मध्ये आल्या पासून साहेबांचा हा तिसरा कॉन्सर्ट... नेहमीप्रमाणेच उत्सुकता! आमच्या #ARRahman फॅन ग्रुप्स वरती हीच चर्चा, त्यात ३ आठवड्यापूर्वी दिनेश वैद्य नामक ग्रेट फॅन्स पैकी एका, त्यांचा पर्सनल मेसेज... जाणार आहेस का / तिकीट काढलेस का? लिंक आहे का... मी लगेच चौकशी सुरु केली, मातृभूमी नावाच्या ग्रुप ने आयोस्जईत केलेला... तिकिटाचे रेट्स म्हणजे 'अग्ग बाबॉ' भारतीय रुपयांच्यात सांगायचं झालं तर ३५,६५३ पासून ८९२ पर्यंत. मला प्लॅटिनम गोल्ड परवडणार नव्हतं आणि मागून पाहायची इच्छा नव्हती, सुवर्णमध्य साठी सिल्वर वगैरे काढायची इच्छा झालेली पण उशीर झालेला निर्णयाला, शो पर्वा आणि सिल्वर पण आता जवळपास संपायला आलेली. Anand Swamy नावाचा एक 'जबरा फॅन' आहे आमच्या रहमानचा! (लिंक चिकटवतोय युट्युबची - https://www.youtube.com/watch?v=APg8MPre92g ) तो म्हणाला "आपण काही तरी 'जुगाड' करू तिकिटांचा, तू काळजी करू नकोस!"... हे ऐकल्यावर मी मनातल्या मनात कॉन्सर्ट पाहण्याची स्वप्न रंगवू लागलो!... पण त्याआधी अजून एक महत...

वाचला!... नाही तर...😆

स्थळ पुणे - २०१७ जानेवारी - गाडी चालवत असताना गरवारे ब्रिज च्या अलीकडे गोंधळलो - की डावी कडे जाऊ की उजवीकडे!, असो त्यामुळे ह्या गडबडीत सिग्नल न देता डावी कडे वळालो, मागून भरधाव येणारा बुलेट वाला गडबडला, बहुदा निळा/भगवा झेंडा वाला असावा, तोंडात मस्त लाल ऐवज वाला... मला भकाराच्या शिव्या देत दात ओठ खायला लागला, मी त्याला काच खाली करून चूक झाली, आता काय काय कारणारेस असे बोललो! तो अजून रागाने बघु लागला... मी पूर्ण काच खाली केली! तितक्यात मागून पोलिसांच्या गाडीचा आवाज आला... काहीतरी संप/मोर्चा सदृश प्रकार होता त्यामुळं पोलिसांची संख्या इतर दिवसांपेक्षा जास्त होती, पोलिसांची गाडी बघताच बुलेट अक्षरशः बोइंग असल्यासारखी उडवली न पळाला. वाचला! नाही तर...😆 पण काय डामाडोल झालेला मी वळल्या वर, एक्सप्रेशन्स प्राईस लेस!!! 😂 #सशुश्रीके

'तुला ग्राफिक डिजाइनर व्हायचंय? परत विचार कर...'

ईंटर्नशिप साठी आलेली काल एक सुबक ठेंगणी, तिला आल्या आल्याच आमच्या वीरांनी घाबरवायला सुरुवात केली, तिला मुद्दामून विचारलं 'तुला ग्राफिक डिजाइनर व्हायचंय? परत विचार कर...' तिचा चेहरा पाहण्या सारखा झालेला! 🤢 अजून २-३ किस्से झाले असेच दिवसभरात, शेवटी संध्याकाळी ५-५३० दरम्यान माझ्याकडे आलेला वर्कलोड ला वैतागुन मी बोललो WTF... मोर शीट, सेम सैलेरी यो! 😁 आज १० वाजता येणार होती... आलीच नाही! आम्हा सर्वाना फार वाईट वाटलं... एखाद्याचं करियर चालू होण्याच्या आधीच आपण संपवलं की काय??? 😳 पण आली विचारी ११ वाजता, कालच्या पेक्षा जरा जास्तच गंभीर! असो... भविष्यात पुढे काय काय पाहायला मिळेल तरी दाखवला आम्ही, शेवटी कोण सुखी असतं, आपण सगळे तसेही आपापल्या जॉबला शिव्या घालताच असतोच! सत्यपरिस्थितीशी लवकरात लवकर हस्तांदोलन केलेले कधी ही उत्तम! 😆😆😆 #सशुश्रीके | २१ मार्च २०१७

कोई कारण होगा!

------------------------------------------------------- काही लोकं खूप संवेदनशील, असतात काही कोडगे! काही नास्तिकची आस्तिक होतात, आणि आस्तिक नास्तिक होतात! व्यसनाधीन माणसांना पाहून लांब पाळणारे, त्यांनाच नियमित 'चियर्स' करायला लागतात! कधी काळी आत्मविश्वासाने भरलेले डबे... अचानक एके दिवशी खच्चीकरणाने रिकामे होतात, नक्कीच काहीतरी कारण असतं!... परिस्थिती बदलवते माणसातला. . . . सुख जितकं हसवतं, तितकच दुःख रडवतं! . . . नक्कीच काहीतरी कारण असतं!... परिस्थिती घडवत असते माणसातला. ------------------------------------------------------- एक भजन आहे हिंदी, बोल काही असे आहेत... "इक झोली मै फूल खिले है, इक झोली मै कांटे रे...   कोई कारण होगा !" हे 'कोई कारण होगा!' वाक्य... मनात इतकं ठासून ठेवा! की उद्या कुठली ही परिस्थिती असो, हे एक वाक्य तुम्हाला नक्कीच दिशा देईल! ------------------------------------------------------- # सशुश्रीके

'लाईट हाऊस' - अविनाश गोगटे

Image
अवी म्हणतात त्यांना, अन्वया आबा म्हणते, नाव अविनाश गोगटे , सासरेबुआ माझे आणि सुबोधचे, अश्विनी आणि अमृताचे वडील, पण नाही... मी कधी त्यांना सासरेबुआ ह्या दृष्टीने पाहिलंच नाही. माझ्या साठी पहिल्यापासूनच काका, जसे इतर काका असतात ना... मित्रांचे/मैत्रिणींचे वडील, अगदी तसेच. माझे बाबा गेल्यानंतर काकाच माझे बाबा. पण बाका/काबा म्हणण्यापेक्षा काका बरं नाही का? म्हणून काकाच. डोक्याचा जवळपास पूर्ण चंद्र, कामामुळे अखंड महाराष्ट्र भर फिरल्यामुळे प्रत्येक भागाची माहिती त्यांच्या चेहऱ्यावर... म्हणजेच रापलेले. 'बाबा गोरे होते पण टुरिंग जॉब मुळे...' असं अमृता नेहमी सांगाते. बाकी ते स्ट्रीकट् आहेत वगैरे अमृता सांगायची, पण कधी जाणवलं नाही तसं कधी. किव्वा मला जाणवून दिलं नसावं, त्यांनाच माहीत. 'समीर आयुष्यात दारू आणि बाईचा नाद करू नकोस' हा सल्ला मला अधून मधून अगदी न चुकता मना पासून देतात, त्यांच्या भावांचे, मित्रांचे... झालच तर त्यांच्या ऑफिस-टुरिंगच्या वेळचे किस्से सांगातात, महाराष्ट्रात कुठे कुठला पदार्थ उत्तम मिळतो वगैरे गप्पा नेहमी होतात. नंतर नंतर तेच तेच किस्से परत पण...