लाल पाठ

एकदा लहानपणी... म्हणजे साधारण पणे २रीत वगैरे असेन, तेव्हा पेप्सीकोला घेतलेला, एक सोडून २... लांब वाले १रुपयाचे, हातात होते जस्ट घेतलेले. ब्राह्मण म्हणून जेवायला गेलेलो त्याची दक्षिणा मिळालेली त्या पैशाची अशी उधळपट्टी करायचो...

समोरून आई आली, हातात पिशव्या होत्या, चालून चालून दमली होती बिचारी, मला बघून म्हणाली काय आहे हातात...

मी लपवत होतो, आईने पिशव्या खाली ठेवल्या, आणि माझ्या मागे आले,मी हात पुढे नेले,

हे काय!?

काही नाही काठ्या आहेत रंगीत

 












माझी पाठ लाल झाली काही क्षणातच!

#सशुश्रीके


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!