वाचला!... नाही तर...😆

स्थळ पुणे - २०१७ जानेवारी - गाडी चालवत असताना गरवारे ब्रिज च्या अलीकडे गोंधळलो - की डावी कडे जाऊ की उजवीकडे!, असो त्यामुळे ह्या गडबडीत सिग्नल न देता डावी कडे वळालो, मागून भरधाव येणारा बुलेट वाला गडबडला, बहुदा निळा/भगवा झेंडा वाला असावा, तोंडात मस्त लाल ऐवज वाला... मला भकाराच्या शिव्या देत दात ओठ खायला लागला, मी त्याला काच खाली करून चूक झाली, आता काय काय कारणारेस असे बोललो! तो अजून रागाने बघु लागला... मी पूर्ण काच खाली केली!

तितक्यात मागून पोलिसांच्या गाडीचा आवाज आला... काहीतरी संप/मोर्चा सदृश प्रकार होता त्यामुळं पोलिसांची संख्या इतर दिवसांपेक्षा जास्त होती, पोलिसांची गाडी बघताच बुलेट अक्षरशः बोइंग असल्यासारखी उडवली न पळाला.
वाचला! नाही तर...😆

पण काय डामाडोल झालेला मी वळल्या वर, एक्सप्रेशन्स प्राईस लेस!!! 😂

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!