दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम...

लिफ्ट मध्ये भयाण शांतता असते, आणि मॅक्सिमम कॅपसिटी १०लोकं असेल आणि त्यात तेव्हढीच लोकं असतील तर काही बघायला नको, डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी लोकं वर खाली *शून्य अवकाशात शून्य* पाहात असतात, तेवढ्यात एक आवाज येतो, नको तिथून...

...म्हणजे पोटातून... भूक लागल्यावर येतो तो! 😯

माझ्या बाजूलाच एक लठ्ठ माणूस डोळे वर करून *हे आत्ताच व्हायला हवं होतं का?* अश्या भावनेचा चेहराविष्कार करतो. 🙄

माझ्या हातात असलेला बिस्कीट पुडा मी हळूच त्याच्या हातात सुपूर्त करतो, तो घ्यायचा नाहीये ह्या शरीराविष्कार तुडवत हातात घेतो. तेव्हढ्यात माझा मजला येतो. 🚶🏽

🤚 राहूदे चा हाताविष्कार फुलवत मी माझ्या मजल्यावर रवाना होतो.

धन्य ते पोट... धन्य त्याचं नशीब! 😂

दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम ते हेच! 😇

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!