Posts

Showing posts with the label sashushreeke

एक मोठा शेवटचा दिवस!

एक मोठा दिवस शेवटचा दिवस! दुसऱ्या दिवशी दुबईला जायची गडबड उरलेली २ महत्वाची कामे ... होतो कोथरूडला आणि २ पर्याय होते. एक काम होतं पौड रोड वर आणि एक पेठेत! पेठेत ६ नंतर म्हणजे महाभयंकर ट्रॅफिक, त्यात तिळक रोड वर जायचं होतं, काम होतं मित्रासाठी तबला हातोडी विकत घेणे आणि दुसरं काम होतं मिलिंद देशपांडे नावाच्या कॉलेज वर्गमित्राला भेटून त्याकडून त्याने केलेले संस्कृत भाषेतले खेळायचे पत्ते घेणे, (संस्कृत भाषेत पत्ते म्हणजे एक वेगळेपण आहेच पण त्याने केलेले त्यावरचे काम पण खास! लिंक शेर करीन कामाची त्याची लेखाच्या शेवटी) तर ह्या २ कामांपैकी १च काम होणे शक्य होते, मी सजीव माणसाचा विचार केला .. निर्जीव हातोडी घेण्यापेक्षा सजीव माणसाला भेटून त्याला/त्याच्या कलेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.  त्याने पाठवलेला मॅप चालू केला, १-२ दा डियो (दू-चाकी वाहन) थांबून मॅप पाहिलाही... एके ठिकाणी शेवटचे मुख्य वळण आले आहे का हे पाहायला डावा हात खिशात घातला, मोबाईल हातात घेतला, वळण अगदी समोरच पण सिग्नल पण, त्यात समोरची तीन चाकी मालवाहतूक रिक्षा थांबली! मी ही त्याच प्रयत्नात, पण मेट्रोचे काम चालू असलेल्या...

अनोळखी ओळख

खुप वर्षे झाली आज लिहीन नंतर लिहीन असं म्हणता म्हणता आज योग आला लिहायचा हे... अनोळखी ओळख बोरिवलीच्या 'श्री गणेश' बिल्डिंग मधला तळ मजला, बंद घर... काचा फुटलेल्या, त्या घरा समोर खेळायचो आम्ही मुलं, चेंडू जायचा आत एका घरात, कित्येकदा तो गेलेला चेंडू मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, ते प्रयत्न करत करत आत डोकावायचो... पूर्वी दरवाज्याच्या वर एक आडवी खिडकी असायची त्यातून की कुठून तरी आठवत नाही पण आत शिरलेलो, प्रचंड धूळ जळमटे वगैरेंनी श्रीमंत झालेलं ते घर!  मालक आर्किटेक्ट किंवा तसल्याच काही क्षेत्रात असावा. सुबक टुंबदार (फोम बोर्ड / थर्माकोलचे) बंगले आठवतात! आजूबाजूला छान छोटी छोटी झाडे, पार्किंग मध्ये गाडी...  आणि चेंडू हातात... बाहेर मित्र वाट बघतायत न मी त्या छोट्या बंगल्यांकडे बघत बसायचो. कोणालाही सांगितलं नाही की मी काय पाहायचो आत, आत चेंडू जायची वाट बघायचो! गेला की मी जाणार आत हे ठरलेलं. नंतर कळलं की मालक अमेरिकेत वगैरे असतो, फ्लॅट आहे पडूनच. नंतर आम्ही मुंबई सोडलं, आता ह्या गोष्टीला २९/३० वर्ष होतील. ते घर आहे तसेच राहीलं आहे मनात, ती धूळ बंगल्यावरची... काय कडक फिनिश! तो जो काय मा...

खेळ आठवणींचा!

आठवणी नेहमी मागे असतात  मी नेमका उलटा, आठवणींच्या मागे मी असतो    एखाद्या प्रसंगी कुणाची ना कुणाची आठवण येतेच म्हणजे आता नसलेली व्यक्ती,  आजी आजोबा बाबा काही जुने मित्र  मग ते सल्ले ही देतात  'रिऍक्ट'ही होतात  आठवणींत असलेलले हावभाव, त्यांचे संवाद  तो साऊंडबोर्ड वाजतो तडीक जाम मजा वाटते! उदाहणार्थ... मॅच चालू असेल शेवटच्या टप्प्यातली  काही कमी बॉल्स मध्ये अशक्य वाटणारी धावसंख्या असेल  तर नेहमी बाबांची आठवण येते,  ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आशा ठेऊन असायचे.  असे अनेक परत परत घडणारे प्रसंग येतात आयुष्यात  त्या त्या क्षणी तो तो माणूस येऊन डोकवून जातो  #सशुश्रीके 

नशीबवान मी...

काही वर्षांपूर्वी आक्षीला गेलेलो, जुनं घर पहायची इतकी सवय होती... त्याच ठिकाणी आता आलिशान बंगला दिसला, पूर्ण नव्हता झाला, पण शेवटच्या टप्प्यात, मी गाडीतून उतरलो... कामगार येत जात होते, मी जणू काही मालकच असा शिरलो जागेत, बंगल्याच्या उजव्या बाजूने मागच्या बाजूला गेलो. आनंद आणि दुःखाचे असे काही तरी विचित्र कॉम्बिनेशन मनात खेळ करू लागले, जुन्या घरावरची कौलं, लोखंडी मोरपिशी रंगाचे खिडकितले गंज, काही लाकडं... थोडक्यात भंगारा साठी जमवलेल्या पण माझ्यासाठी असलेल्या लहानपणापासूनच्या आठवणी अश्या जमिनीवर एकावर एक रचलेल्या! डोळ्याचा कैक मेगापिक्सेल असलेला कॅमेरा मॅक्सिमम लेवल च्या अँगल मधून पॅन करत करत विहिरीपाशी आलो, दगडी आणि जेमतेम फूटभर उंची असलेल्या गोल कठड्यावर आता ३फुटी गोल भिंत पण आली होती! रहाट मात्र ठेवलेला आहे तसा होता... नशीबच त्याचं! असो, आनंद ह्याचा की अश्या अवस्थेत का होईना निदान त्या आठवणी त्या दिवशी पाहायला मिळाल्या, दुःख ह्याचं की त्या कायमच्या जाणार कुठेतरी. वस्तू काय, वास्तू काय... जीव असतो त्यांच्यात! म्हंटल तर निर्जीव, पटलं तर सजीव! आणि नाशिवंत, म्हणजेच अंत आहेच प्रत्य...

भयाण Corona

काय ना... २०२० वर्ष असलं उलथापालथ करणारं असेल असं वाटलं नव्हतं... वर्षाचा ३राच महिना! वर्क फ्रॉम होम करून ११ दिवस होतील आज, फक्त २दा बाहेर पडलो आहे ह्या दिवसात, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मनुष्य मनुष्याला इतका घाबरायला लागेल!  १० काय १०मिनिटे जरी एकटा असलो की कसं तरी व्हायचं, चुकल्या चुकल्या सारखं, आता सवय होत चालली आहे!  किती वाईट ना, जग बदललं काही महिन्यांत, आता आपण बदलत आहोत, घरी रहा... सुरक्षित रहा च्या नावाखाली सगळे स्वखुशीने काही नाईलाजाने दबले गेले आहेत. वर्क फ्रॉम होम आहेच पण ज्यांना शक्य नाहीत त्यांचे हाल, घरी बसून ज्यांना पगार हा पर्याय नाहीये त्यांचे! सकाळी संध्याकाळी त्यांसाठी प्रार्थना करतोय, निदान एवढं तरी नक्कीच करू शकतोय, ज्या संस्था अश्या लोकांना मदत करत आहेत त्याचे शतशः आभार. उगाच / अत्यावश्यक कारण नसताना लोकं बाहेर पडतायत त्यांना हे कळत नाहीये की ते ह्या विषाणूच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संपर्कात त्यांचे मित्र / नातेवाईक... अहो ते सोडा पत्नी-मुले ही येऊ शकतात आणि पुढे सांगायची गरज नाही, सगळ्यात वाईट गोष्ट अशी की लक्षणे उशीरा कळतात आणि तो पर्यंत उशीर ...

Father's day

Image
Father's day होता म्हणे काल, काय आहे ना... माझ्यासाठी जवळपास रोजचं आहे हे, आजूबाजूला इतक्या वस्तू आहेत, मनात आठवणी इतक्या आहेत... त्यात तो गाड्यांचा / छायाचित्र काढायचा छंद! अगदी पदोपदी आहेत बाबा माझ्याबरोबर... कळत नकळत अखंड बाबांच्या आजूबाजूलाच असतो मी, काल नेमका हा जागतिक दिवस असताना बाबांबद्दल काही लिहिलं नाही ह्याची रुखरुख नको म्हणून लिहितोय आता. जे आहे ते आहे.. विसरलो! त्यात मॅच होती... हो हो मॅच च्या पण आठवणी आहेत. काय लिहू काय नको असं झालय आता. असो... बाबा सगळ्यांनाच असतात, कोणी जवळ असतात कोणी लांब असतात, शेवटी बाबा ते बाबाच... आपण लहान असतानाचे बाबा आणि मोठेपणातल्या बाबांचा आपला प्रवास कसा घडतो ह्याबद्दल विचार केला की प्ले बटण आणि पुढे सरकणारी कैसेट आठवते... ती A साईड आणि मग B साईड! काय तुम्ही समजायचात त्यांना आणि काय त्यांचा मनात असेल, हे सगळं आता बाप झाल्यावर कळतं, कैसेट संपल्यावर! 😢 आणि ती कैसेट परत ऐकायची असेल तर इजेक्ट नावचं बटण देवाने काढून घेतलेलं असतं, आली का पंचाईत! 😤मग काय करा रिवाईंड... ऐका ती साईड B! द रिअल साईड ऑफ लाईफ. रट्टा मारून डोळ्यातून पाणी काढणारे...

ऐकता ही येईल असा एक सिनेमा!

Image
तर काय ना आज सकाळी ऑफिसला जाताना गाणी ऐकायचा मूड नव्हता गाणी ऐकायचा मूड नसला की मी कथाकथन ऐकतो, पूलं/वपु वगैरे पण आज तो पण मूड नव्हता. एक कल्पना सुचली, काही हिंदी चित्रपट आहेत आवडते ज्याचे संवाद न संवाद पाठ आहेत. त्यातलाच एक म्हणजे 'आनंद' ( Anand movie ) आपल्या सर्वांच्या आवडत्या गुलज़ारांचा, ऋषिकेश मुखर्जी साहेबांचा... एक न एक सीन प्युअर गोल्ड राव! तर मी काय केलं... ब्लूटूथ ला लावला फोन न सुरु केला मूवी... टायटल पासून राजेश खन्ना - रमेश देव च्या घरी राहायला येई पर्यंतचे संवाद ऐकले.. ऑफिस ला पोहोचे पर्यंत. सगळे प्रसंग रस्त्यावर ... सिग्नलवर जणू प्रोजेक्ट होत होते! अगदी जेव्हा पहिल्यांदा १९९० च्या आसपास पाहिलेला हा चित्रपट, मावशी कडे राहायचो मी तेव्हा, दूरदर्शन वर लागलेला दुपारी, जेवणाची वेळ होती, माझी मावशी स्वभावाला जामच कडक, तिने रागावून बघीतलं तरी तळहाताला घाम येईल असली कडक! जाम घाबरायचो मी तीला... हा पिक्चर लागला आहे हे बघताच तिने रिमोट बाजूला ठेवला आणि म्हणाली समीर हा सिनेमा बघ... आयुष्यात कुठल्याही बाईला रडताना पाहिलं नव्हतं, त्यात माझ्या मावशी सारखी...

अभिनंदन... अभिनंदन!

Image
वो रुके थे लिफ्ट के लिये, मुझे लगी थी चाय की प्यास... जा राहा था चुपचाप पॅन्ट्री मै, पीछे से आई हलकी सी आवाज! हुई खुजली उनको... पुछा बडी दिलदारी से हमको! वो - भाई कैसे हो मै - बस, खुश हू! वो - अभिनंदन... अभिनंदन! मै - हा मेरा खत्म हुआ टेन्शन, आप अपनी सुनाओ. ☺ लिफ्ट खुली, जनाब चल दिये! हम मन ही मन मे बहोत हस लिये! #TrueStory 🙏🏽 #सशुश्रीके 

आनंदी गोपाळ

Image
खरं तर हल्ली लिहायचा खूप कंटाळा येतो! म्हणजे आळस वाढलाय असो... वीकेंड ला अमृता (बायको) , सूर(मैत्रीण) आणि नीलम (मित्र) ) गेलेले ह्या मूवी ला, मी आणि आई (शुभदा) अन्वया(मुलगी माझी) साठी थांबलो, मला पण जाता आलं असतं पण मी इतका 'कीन' नव्हतो, का कुणास ठाऊक, रिव्हुज भारी होते, गाणी पण छान तरी बघायचा का नाही ह्यावर स्वतःशीच दुमत होत होतं, पण मग घरच्या लोकांनीच "बघ रे, मस्तय... सुंदर अभिनय... मिनिमम मेकअप" असा घरगुती रिव्ह्यू दिल्या नंतर राहावे ना, ऑफिसातून ६:३०ला निघून ७:१५ला घरी आलो, येताना अमृताला माझं आणि आईचं तिकीट काढायला लावलं, मग संध्याकाळचं ऑफिसचं ट्राफिक कापत १०मिनिटाच्या रोड वर ३०मिनीट काढत पोचलो, ७:५०च्या शो ला ८:०५ला, शेजारच्या एका अगडबम्ब देहाला "कधी सुरु झाला हो?*" असं विचारलं त्यानेही अगदी कौजुअली "काही जास्त नाही, जस्ट इन्ट्रोडक्शन मिस केलत... ३/४मिनिटेच झाली, जास्त नाही" असं सांगितलं न मला जरा बरं वाटलं. 😂 आता चित्रपटा बद्दल... मी अभ्यास करून, गूगल वर नावं वगैरे शोधून कलाकार किंवा इतर मंडळींची नावं लिहीत रिव्ह्...

आठवण

Image
झोपच येत नव्हती, आठवणी खोदत होतो... आणि चक्क पैसे सापडले! १०/२०/२५/५० पैसे काही रुपये... पुरलेली नाणी! आक्षीतल्या (गावातील) दाराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला शोभेची झाडे होती त्यातल्या एका झाडाच्या मुळांपाशी पुरुन ठेवलेली नाणी दिसली थेट!, डोळे चमकले... आजी कडे अरेंज / लिमलेट गोळ्या, गोळे, कोल्ड्रिंक साठी सारखेच पैसे मागायचो... त्यापेक्षा हातात उरलेल्या (उरवलेल्या) चिल्लरचा फायदा तरी करून घेऊ, झाडाला पैसे लागतील... तेव्हढाच कमावता होईन मी! सुट्टी संपल्यावर आक्षीच्या अंगणाचे गेट ओलांडल्यावर तेच गेट पुन्हा कधी दिसेल ह्या विचारात मुंबईला परतायचो... नंतरची सुट्टी कधी अर्ध्या वर्षाने कधी वर्षाने येणार... आक्षीतलं ते झाड! त्याबद्दल विसर पडलेला, सुट्टी नेहमी प्रमाणे आक्षीत... एकदा जेवताना अचानक... आजीने एका रुमालाला गाठ मारून ठेवलेली जड वस्तू माझ्या समोर आणून ठेवली! मी हसलो, ती पण हसली... "असे पैसे... जमिनीत पुरून मिळाले असते तर!" आठवण आहे ही, आठवणी मौल्यवान असतात, आठवणी पुरलेल्या असतात, खोदून का होईना सापडतात, कधी आजी कधी कोणी दुसरं! आणि हो... माझं नेहमीचं आवडतं वाक...

डांबर, सिमेंट की चिखल?

आपलं मन कसं असतं माहित्ये का, उगाच तुलना करावीशी वाटली म्हणून असेल पण...अगदी सेम असच असतं मन... कडक उन्हातल्या डांबरा सारखं कच्च्या सिमेंट सारखं, झालच तर सारवलेली जमीन किंवा ...

व्यक्त व्हा!

मोठी गोष्ट! व्यक्त व्हा... म्हणजे फेबु / ट्वीटर हे माध्यम नाही प्रत्येक गोष्ट सांगायला, पण इन जनरल सांगतोय. हल्ली कमी वयातच तणावाने हार्ट एटॅक येतात, काही आत्महत्या करतात, आण...

१०२ नॉट आऊट / 102 NOT OUT

Image
102 NOT OUT छानच टाइम पास आहे,  दोन महान बॉलीवूड म्हाताऱयांनी मजा केली आहे मस्त, शेवटी भावनात्मक शेकोटी आहे, कथानकेकला उबदार पणा छान येतो त्यामुळे, कुठे बोर वगैरे होत नाही. १०२ वर्षाचे वडीलच मुलाला वृद्धाश्रमात टाकतात ही गम्मत तर ट्रेलर मध्येच सांगून टाकली आहे त्यामुळं त्याहून जास्त काही पाहायला मिळेल असं वाटतं... आणि तसं आहे ही काही, पाहून बघा... आवडला नाही तरी नाही आवडला असं तरी म्हणणार नाही असा काहीसा आहे... म्हणजेच वन टाइम वाच नक्कीच! औलाद अगर नालायक हो, तो उसे भूल जाना चाहिये, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिये. अमिताभने हा डायलॉग इतका नैसर्गिकपणे म्हटला आहे, की अभिषेकला सिनेमे मिळत नसल्याचं आठवल्याशिवाय राहवत नाही. डायलॉग रायटरला दंडवत!    3 स्टार्स फ्रॉम मी #सशुश्रीके

The Americans, TV Series Review

Image
The Americans ह्या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड 2013 मध्ये FX चॅनेलवर आला. १०पैकी ८.३ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी १३ भागांचे पाच सीझन झालेले आहेत. आता शेवटचा, सहावा सीझन मागच्याच महिन्यात सुरु झालेला आहे, गेल्या ५वर्षात ह्या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि आता ती शीगेला जाऊन पोचली आहे. विश्वासावरचा अविश्वास आणि अविश्वासावरती विश्वास किव्वा जो आहे तो कशावरून तोच, जो तुम्हाला वाटत आहे? असं काही तरी अजब कोडं घेऊन ह्या मालिकेची सुरुवात होते. एका रशियन गुप्तहेराला पकडून त्याला 'किडनॅप' करायचे काम आटोपल्यावर कळते की त्याला पकडणारे स्वतः २ रशियन्स गुप्तहेर आहेत, नुसते रशियन्स नाहीत ते एक जोडपं आहे, १९६० मध्येच रशियन्स ने अश्या जोडप्यांना 'तयार' करायला सुरुवात केलेली, त्यापैकीच एक गुप्तहेर जोडपं म्हणजे 'फिलीप' आणि 'एलिझाबेथ', कथानकाचे २ प्रमुख नायक, त्यांची दोन मूलं आणि त्यांच्या शेजारीच राहणारा FBI एजेंट त्याचे कुटुंब ह्यांच्या आजूबाजूला ही सर्व मालिका रंगवण्यात आलेली आहे. फिलिपची ट्रॅव्हल अजेंसी आणि एलिझाबेथ 'हाऊस ...

सही कशाला हवी, सही माणसं हवीत!

Image
बोरीवलीत असतानाची गोष्ट, गोखले विद्यालयात होतो, ३/४ थीत असेन, शाळेत आम्हाला एक फॉर्म दिला, हेल्पेज इंडिया संबंधित, घरोघरी जायचं आणि पैसे गोळा करायचे, सगळ्यांनाच एक एक कागद दिलेला, नाव / पत्ता / सही आणि पुढे रक्कम वगैरे तक्ता असलेला कागद. मला तर खरं हे करायला आवडायचं नाही, पण प्रत्येकाला करणं भाग होतं, मी ओळखीच्या लोकांना आधी भेटायचो, मग घरी आलेल्या पाहुण्यांना, मग सोसायटीची अनोळखी दारं असं आठवडा भर तरी चाललं असेल, तो फॉर्म कधी एकदा पूर्ण भरतोय असं झालेलं. शेवटी आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पण गेलो, एका अनोळखी दरवाज्याची बेल वाजवली, एका आजोबांनी उघडला दरवाजा, मी त्यांना फॉर्म दाखवला, त्यांनी चष्मा नीट अड्जस्ट करून फॉर्म पाहिला, आणि हसत हसत ५ रुपयांची नोट दिली, मी त्यांना त्यांचं नाव वगैरे लिहायला सांगितलं, त्यांनी हातानेच नको नको केलं, म्हणाले तू तुझ्या नावाने देशील का? (किव्वा असच काही तरी बोलले, मला नक्की आठवत नाहीत त्यांचे शब्द) त्यांचा हात थरथरत होता, वयामुळे असेल... असो, मी काही बोललो नाही, फॉर्म वर त्यांचं नाव लिहिलं... त्यांची सही नाही मिळाली! तो दिवस आहे आणि आजचा, म...

मोठी गाडी, मोठा टीव्ही, मोठं घर

मित्राची जागा होती एका चाळीत, नाव आठवत नाही, शनिवार पेठ आणि घाटाच्या बरोबर मध्ये, चाललं तरी हालायचा मजला, जागा इतकी लहान की जेमतेम ३लोकांनी पाय पासरले तर लागतील एकमेकांना, यामुळे घरात सगळच लहान... लहान टीव्ही, लहान फ्रीज, लहान आरसा, लहान पंखा, पण मनं मोठी असतात ह्यांची, हसतमुख चेहरे दिसतात नेहमी, टेबलावर चहा बिस्किटे येतातच, काहीच नाही तर माठातल्या पाण्याचा भरलेला तांब्या! हे सगळं छान वाटतं! 👌 आणि आपण सगळ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो! मोठी गाडी मोठा टीव्ही मोठं घर 😏 #सशुश्रीके 

चाळीत राहावं एकदातरी! एक गुळगुळीत अनुभव 👌

Image
चाळीत.. गुळगुळीत असतं सगळं, म्हणजे सगळं कसं एक्सपेरियन्स असलेलं, चढताना उतरताना हात लागून लागून झालेले लाकडी कठडे, जीने, भिंतींचे कोपरे.. सगळं कसं गुळगुळीत... पावसात सोडून इतर वेळी असलेल्या जळमटंयुक्त खिडक्या, त्यातून डोकावणारी पिंपळाची पानं, ती ही त्याच माजल्यावरची... भिंतीतून जन्माला आलेली. पहिला मजला संपला न प्यासेज मध्ये शिरलं की 'दिल के टुकडे टुकडे...' वगैरे झालेल्या फारश्या, त्याची डागडुजी साठी वापरलेलं ठिसूळ सिमेंट, कोणाची तरी वाट पहिल्यासारखी वाटणारी एक म्हातारी, अजून पुढे गेलं की २-३ आजोबा, त्यांच्या हातात पेपर... आणि कोणी ऐको न ऐको, एकमेकांकडे न बघता चाललेली बडबड, अजून जरासं पुढे गेलं की कानावर नकळत राज्य करणारी आकाशवाणी, दरवाज्यातून डोकावणारी मुलं, फिस्कटलेल्या रांगोळ्या, वाळत घातलेले पण वाऱ्याने पडलेले कपडे... हे सगळं रोज पाहायचो! परत एक मजला चढायचो, हो... २मजली होती आमची ब्राह्मण वाडी, परत वरच्या लिहिलेल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात दिसायच्या, घडायच्या... एका बंद दरवाज्या पाशी येऊन मी थांबायचो, लगतच्याच उघड्या...

वॉल्टर व्हाइट!

Image
#NowWatching #BreakingBad #Again नाव मिस्टर वॉल्टर व्हाइट, वय एकूणपन्नास. करतो काय!? प्राध्यापक आहे... केमिस्ट्री टीचर. पगार पुरत नाही म्हणून काय करतो!? एका गैरेज मध्ये गाड्या धूवायचं काम! घरी कोण कोण असतं... बायको आणि एक मतीमंद मुलगा. बाकी वॉल्टरचे मित्र, नातेवाइक हे सर्व त्याच्यापेक्षा चांगल्या आर्थिक परिस्थितीतले. त्यात वॉल्टरला कळतं की त्याला कैंसर आहे आणि एक फक्त वर्ष वेळ आहे! पुढे काय... कुटुंबाला कसं सांभाळणार, घर खर्च कसा होणार... पुढे काय... तो घरी ह्या सर्व विचारांनी पाऊल टाकणार, 'सरप्राइज' त्याची जवळ जवळ सर्व मित्र मंडळी आणि जवळचे नातेवाईक त्याच्या घरी त्याला बर्थडे 'सरप्राइज' पार्टी द्यायला आलेले असतात, अर्थात बायकोनी प्लान केलेले असते सर्व, ह्याला हसावं का रडावं कळत नसतं... सगळे आनंदी असतात, त्या सर्व लोकांमधे वॉल्टरचा सालाही आलेला असतो, DEA (Drug Enforcement Administration) मध्ये मोठ्या पोस्ट वर असतो तो, टीव्ही वर न्यूज़ चालू असतात तेव्हा बातमी मध्ये त्याचाच उल्लेख, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक लोकांना श्रेडर (वॉल्टर चा साला) आणि त्...

COCO (2017)

Image
गेल्या २१वर्षातल्या पिक्सार च्या इतिहासातला एक वेगळाच अनुभव म्हणजे कोको! असं का म्हणतोय मी!? कारण आहे... आत्ता पर्यंत प्राणी, पक्षी, मासे किंवा चौकोनी/त्रिकोणी वगैरे चेहरे असलेले अथवा रबरी खेळणी, वाहनं वगैरे असलेले अनिमेशनपट आले, आणि प्रेक्षकांनी त्याचं कौतुकही केलं पण हा कोको हटके आहे नक्कीच. केवळ अप्रतिम... अगदी खरे वाटावे इतके विस्तारित मानवी हावभाव! 'कोको' म्हणजे म्हातारी आहे एक (मुख्य व्यक्तिरेखाची पणजी), तिचा सहभाग जरी कमी असला एकूण चित्रपटात तरी मूळ कथानक तिच्या अवतीभवती फिरत असतं कळत नकळत, पण मस्त धम्माल आहे आहे एकूणच! एका मेक्सिकन गावातकली कथा आहे... कोकोचे वडील (एनरेस्टॉ दे ला क्रुज), कुटुंबातले एकमेव कर्ता धर्ता असूनही जेव्हा संगीतवेडे असल्यामुळे कुटुंबाच्या जवाबदारीला विसरून निघून जातात आणि परत येत नाहीत (ह्याचं कारण ही फार विनोदी आहे, आणि ते ही प्रत्यक्षात चित्रपटगृहात पहावं असच) तेव्हा त्यांची बायको नाईआजास्तव बुटांचा व्यवसाय सुरू करते मग पुढच्या सर्व पिढ्या तोच व्यवसाय करतात,  संगीताचा 'स' सुद्धा घरात निघणार नाही अशी खबरदारी घेत असते घरातली प्र...