जूनं ते सोनं!

हा फोटो पाहिला आणि एकच आलं मनात...  


जुने  #Walkman किंवा कुठले ही #Portable cassette player पाहिले आत्ता की काय वेगळच वाटतं! Side A/B Head साफ करा, #Cassette जाम झाली की pencil ने नीट करा... नाजूक #Earphones ना सांभाळा, सारख्या batteries बदला... किंवा rechargeable batteries charge करत बसा, मग नंतर नंतर advance level आले... दोन्ही side cassette न काढता #Play करता यायला लागले, २ च्या ऐवजी एकाच batteryवर काम व्हायला लागले, Manual #equalizer मग #Pop #Rock #Jazz #Classical सारखे #Presets येऊ लागले! आणि मग #CD आता #usb, त्यातल्या त्यात cd players ने जराशी धूम केली, पण portable cassette players नी आपल्या सारख्या #Music lovers च्या मनात एक घर केलं, त्या घराचं रूपांतर बंगल्यात केलं... आणि आता ते घर स्वप्न होतं की काय असं वाटू लागलय!

जुन्या गोष्टींमध्ये एक कमालीची शक्ती असते, जसं आयुष्यात काही नवीन घडावं, यावं असं वाटतं तीतकच हे असं जुनं परत यावं नवीन करकरीत होऊन असं वाटतं, आणि जगात अश्या गोष्टीही आहेत ज्या जुन्या असून ही Brand new आहेत! उदाहरणार्थ माझ्या वडलांनी २ Twin Lens (TLR) कॅमेरे घेतलेले, एक वापरला आणि एक नाही, जो वापरला तो मी एका दर्दी मित्राला देऊन टाकला आणि जो मुळीच वापरला नाही तो अजून ही माझ्या घरी आहे! #Brand_new but Old!

हे असं असणं एक वेळगीच feeling देणारं असतं, जुनं जपा, नवीन ही असं वापरा ज्याने पुढे त्या गोष्टींचे मोल वाढेल (हल्ली तशी Quality नसते म्हणा, पण तरी)

आणि हो... मी किंवा माझ्या सारखे काही म्हणू शकतात,

जूनं ते सोनं
जूनं तेच सोनं


एक हरवणार...
म्हणून घेतले होते दोनं

कधी दिलं मित्राला दान

अजब वाढली मनाची शान

जुनं झालं नवीन आता...

नाही नुसत्या मारत बाता!

नसाल वापरत न फेकू नका

इतरांनी केलेली चूक करू नका

ज्याने जपलं तो जगला

म्हणूनच...


जो जगला त्याचे जपा

परत एकदा कळवळीने सांगतो...

जुनं ते सोनं
जुनं तेच सोनं


#सशुश्रीके २०१८/०८/०७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!