स्वर्ग पाहिलेला माणूस...

खिडक्यांना नव्हत्या काचा
थंडी पाऊस बिनधास्त विजा
ऊन खेळी दिवसभर फरशींवर
झोपाळा असे साथीला

वर छत मस्त कौलारू
त्यातून डोकावे मंद वारा
बांबू असत त्यांचा सहारा
भुंगा कोळींचे राज्य तिथे

बाजूला भिंतीमध्ये कपाट असे
रद्दी दर्भ पंचांग त्यात वसे
पायपुसणी म्हणून गोणपाट
बसायला पायरीचे थाट

समोर अंगणाची वाट दिसे
दिसे मला हे चित्र
ते आक्षीतले सुंदर घर
आठवणीतला स्वर्ग

.
.
.

बरं... स्वर्ग काय असतो?
माझा तरी तोच होता स्वर्ग
मग कळलं लिहिता लिहिता
बालपण हाच तर खरा स्वर्ग!

ना ओझे कशाचे
ना कर्ज भविष्याचे
ना कशाची चिंता
ना...

असो... स्वर्ग पाहिलेला माणूस

#सशुश्रीके

५ जानेवारी २०१९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!