Second track

आपण मनातल्या मनात विचार करताना बोलत असतो ना काहीतरी,
त्या संवादाला सेकंड ट्रॅक ... म्हणजेच आपला दुसरा आवाज म्हणतात म्हणे.
लिहिताना पण येत असतो, किंवा काही विचार करताना.

पण माझ्या बाबतीत आता हा आवाज केटेगराईजड झाला आहे आजकाल,
उदाहणार्थ, गाडीत असताना राग / आनंद नुसार मित्रांच्या आवाजात 'सेकंड ट्रॅक' येतो ऐकू!
एखाद्या ठरावीक संगीताबद्दल ज्या व्यक्तीला कळतं त्या व्यक्तीच्या आवाजात दाद देतो!
असे बरेच आवाज भिन्न भिन्न विषयानुसार सेव्हड झालेत 'सेकंड ट्रॅक' च्या यादीत.

मज्जा येते, व्हॉइस ओव्हर टाकल्याचा फील...  
काय काय रसायन दडलेलं असतं बघा मेंदूत!

#सशुश्रीके । १७ एप्रिल २०१९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!