Posts

Showing posts with the label #marathiblog

लेट नाईननटीज - अरली २०००

काय दिवस होते!  प्लॅनेट एम ला जायचं न सीडीज ऐकायच्या.. आवडल्या की कैसेट घ्यायच्या, सीडी परवाड्याची नाही... फास्टट्रॅक दुकानात जाऊन तसेच दिसणारे गॉगल्स झेड ब्रिज, फॅशन स्ट्रीट वरून उचलायचे, दुचाकी अगदी रिजर्व च्या शेवटच्या थेंबापर्यंत चालवायची, कूल नावाची चेन गळ्यात टाकून आपण कूल आहोत हे सिद्ध करायचं, सायकल पार्किंग मध्ये लावून पैसे द्यायचे दिवसभराचे, जुन्या जीन्स मध्ये मिळालेले पैसे बघून डोळे असे चमकायचे जणू लॉटरी लागलीय... घरून पैसे मिळाले एखाद्या वस्तू / कामा साठी की उरलेले पैसे कसे हवेत जायचे! लेट नाईननटीज - अरली २००० चे ते दिवस आठवले की कसं... रिवाइंड बटण दाबावसं वाटतं. डैम! दोज वेर द डेज! दोज वेर द डेज! #सशुश्रीके २१/०१/२०२०

गुजराती vs मराठी

आम्ही ९०साली बोरिवलीच्या श्रीगणेश इमारतीत राहायचो तेव्हाची गोष्ट, मला प्रसंग आठवतो पण विषय आणि त्याची गांभीर्यता नव्हती माहीत. आज आईशी गप्पा मारताना जुन्या दिवसांच्या गप्पा रंगल्या, त्यातून काही गोष्टी *रंगीत* झाल्या... आमच्या इमारतीत अर्धे गुजराती आणि अर्धे मराठी होते, गणपती यायचे दिवस होते, त्यामुळे मराठी घरांतुन साफसफाई वगैरे करायची वेळ, घरातून काय अगदी अख्खी इमारातच मस्त छान स्वच्छ असावी हा स्वच्छ हेतू. तर झालं काय, माझी आई नेहमीप्रमाणे संध्याकाळची दळण आणायला गेलेली, इमारतीच्या फाटकात शिरतानाच भिडे काका ( आईच्या लहानपणीपासून ओळखीचा, आक्षीचा शेजारी, आमचा विष्णू भिडे, पण म्हणायचे सगळे मधू ) ... तर मधू भिडे एका माणसाकडे तावातावाने गेला, पायातली चप्पल हातात घेऊन त्या इसमाच्या श्रीमुखात खेचली, आई पळत पळत डबा बाजूला ठेऊन काय झालं काय विचारताना मधू भिडे म्हणाला, सोड... अजून दहा वेळा मारीन त्याला कानाखाली! गर्दी वाढली, एका बाजूला गुजराती एका बाजूला मराठी... नंतर कळाला प्रकार. तो गांधी म्हणून एक होता, आमच्या इमारतीचा कार्याध्यक्ष (सेक्रेटरी) आणि त्याच्या घरी चालू होते घराचे काम...

जुग जुग जियो रहमान... तुझसे ही जिंदा है... ...तेरा हर एक फॅन 😊

Image
असं म्हणतात की भूक लागली की काहीही गोड लागतं, मग माझं ही असच काहीसं. रहमान ने काहीही वाढलं की माझे हे भूक लागलेले कान काहीही गोड मानून ओढून घेतात स्वर/संगीत... लोकांनी, मित्रांनी रहमानला कितीही शिव्या घातल्या तरी त्या पचवतो मी, पचनव्यवस्था असली मजबूत आहे की रामायण/महाभारतातल्या त्या युद्धाचे बाण आठवतात... प्रतिकार क्षमता पेक्षा सहनशीलता टू द मॅक्स! म्हणे काहीही कर पण रहमानला गायला सांगू नकोस पुढच्या शो मध्ये, काय राव ह्यावेळी बोर केलं रहमान ने, शो ला मजा नाय आली.. पूर्वीचा रहमान भारी होता... हे सगळं पेलत असताना मनात 'रोजा-बॉम्बे पासून ओके-जानू' पर्यंत सगळं वाहत असतं. झरा-नदी-सागर जसं येईल तशी बोट-जहाज बदलत असतोय हा कान. पुलंच्या कथाकथनात एक मस्त किस्सा आहे, कोणीतरी गात असतं न जमत नाहीये म्हणून कोणतरी शिव्या देत असतं, तर रावसाहेब नावाचे पात्र जे काय फोडतात शब्दांनी त्या _कोणतरी_ ला!! ... म्हणे "तसं गाऊन दाखवा, मग कसं मूळव्याध होतोय की नाही बघा!" असो... मी भक्त आहेच नो डाउट... रहमान भक्त. 😊 अगदी ९२ सलापासून निस्सम अविरत भक्ती करतोय आणि करत राहीन. ...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

Image
बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं! काय आहे ना झोप नसेल येत की मी जुन्या फोल्डर्स मध्ये घुसतो.. आणि मग सब फोल्डर्स बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!... म्हणजे जास्त शोधाशोध न करता, त्यात मुंबई-अलिबाग-आक्षी... अशी फोल्डर्स तर खचून भरलेली, उघडलं की जणू आतमध्ये स्प्रिंगांनी फेकल्यासारखी, उसळून थोबाडावर आपटतात, कधी जळमटं किंवा गंज चढलाच नाही, चकाचक अजूनही... 'वेल मेन्टेड यु नो!' काय काय आहे त्यात, दणकट झोपाळा... २-३ म्हशी आहेत आहेत काही रेडिओ काही छोटे काही मोठे टीव्ही बेहिशोबी पेन्सिल सेल्स...  काही नाणी मातीत लपवलेली, काही सायकली - काही मित्रांच्या काही माझ्या गोळ्या लिमलेटच्या, काही कॉफी बायटा काही मेलड्या खूप सारे पेप्सीकोले... ग्लास च्या ग्लास आरींज - काला खट्टे तुटलेल्या स्लिपरा, फाटलेले बूट पिवळे झालेले आणि आंब्यांचा वास (सुवास) असलेले बनियन्स फुटलेले ढोपर, खरचटलेले कोपरे... थंड पाण्याने भरलेल्या, विहिरीतून खेचलेल्या कष्टी बादल्या... शेवाळ्यातून कधी चुकून कधी जाणूनबुजून झालेली धड्पड छोट्या हौदात मारलेले मोठे सूर! पायऱ्यां...

Second track

आपण मनातल्या मनात विचार करताना बोलत असतो ना काहीतरी, त्या संवादाला सेकंड ट्रॅक ... म्हणजेच आपला दुसरा आवाज म्हणतात म्हणे. लिहिताना पण येत असतो, किंवा काही विचार करताना. पण माझ्या बाबतीत आता हा आवाज केटेगराईजड झाला आहे आजकाल, उदाहणार्थ, गाडीत असताना राग / आनंद नुसार मित्रांच्या आवाजात 'सेकंड ट्रॅक' येतो ऐकू! एखाद्या ठरावीक संगीताबद्दल ज्या व्यक्तीला कळतं त्या व्यक्तीच्या आवाजात दाद देतो! असे बरेच आवाज भिन्न भिन्न विषयानुसार सेव्हड झालेत 'सेकंड ट्रॅक' च्या यादीत. मज्जा येते, व्हॉइस ओव्हर टाकल्याचा फील...   काय काय रसायन दडलेलं असतं बघा मेंदूत! #सशुश्रीके । १७ एप्रिल २०१९

आठवण

Image
झोपच येत नव्हती, आठवणी खोदत होतो... आणि चक्क पैसे सापडले! १०/२०/२५/५० पैसे काही रुपये... पुरलेली नाणी! आक्षीतल्या (गावातील) दाराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला शोभेची झाडे होती त्यातल्या एका झाडाच्या मुळांपाशी पुरुन ठेवलेली नाणी दिसली थेट!, डोळे चमकले... आजी कडे अरेंज / लिमलेट गोळ्या, गोळे, कोल्ड्रिंक साठी सारखेच पैसे मागायचो... त्यापेक्षा हातात उरलेल्या (उरवलेल्या) चिल्लरचा फायदा तरी करून घेऊ, झाडाला पैसे लागतील... तेव्हढाच कमावता होईन मी! सुट्टी संपल्यावर आक्षीच्या अंगणाचे गेट ओलांडल्यावर तेच गेट पुन्हा कधी दिसेल ह्या विचारात मुंबईला परतायचो... नंतरची सुट्टी कधी अर्ध्या वर्षाने कधी वर्षाने येणार... आक्षीतलं ते झाड! त्याबद्दल विसर पडलेला, सुट्टी नेहमी प्रमाणे आक्षीत... एकदा जेवताना अचानक... आजीने एका रुमालाला गाठ मारून ठेवलेली जड वस्तू माझ्या समोर आणून ठेवली! मी हसलो, ती पण हसली... "असे पैसे... जमिनीत पुरून मिळाले असते तर!" आठवण आहे ही, आठवणी मौल्यवान असतात, आठवणी पुरलेल्या असतात, खोदून का होईना सापडतात, कधी आजी कधी कोणी दुसरं! आणि हो... माझं नेहमीचं आवडतं वाक...

सच्या आकलेकर.

Image
'सच्या'... सचिन ह्या नावाला बहुतेक करून सर्वच जण सच्याच् संबोधतात, तसच ह्याला पण... अभिनव कलामहाविद्यालय पाषाण मधील आमचा २ वर्ष सीनियर खेळाडू... मस्त काम... पेंटिंग्स कड़क मारायचा आणि अजुन ही मारतो! व्हॉलीबॉल, क्रिकेट मध्ये नेहमी मैदानावर हजर... बुटका पण बऱ्यापैकी बळकट शरीर... बोलायला कोल्हापुरी टच... अन हसला की नक्कीच आकाष दिसायचं त्याला... आणि त्याला काय दिसतय वरती म्हणून समोरचा पण वर बघणार... मग काय, जोक असला काय न नसला काय, आकाश बघायला मजा यायची! अजूनही येते... 'अस्सय होय' हे त्याचं ठरलेलं उत्तर! थोडक्यात काय, येडगाव ला जाऊन पेढं खाणारा हा! लै बाराचा, हाहाहा! खुप धमाल हो... ह्यांच्या ग्रुप पण सही होता... सगळे एक से एक अवली... अणि हो पोरी पण! लफडं केलेलं / होतं एक, पण काय... पुढे भगाकार गुणाकार जमले नाहीत, मग काय अपेक्षे प्रमाणं गणित चुकलं म्हणा... असच काहीतरी! पण आता छान बायको आहे... न एक पोराचा बाप आहे, नोकरी सोडून स्वतःचा छोटा सेटअप आहे... साइड बाय साइड पेंटिंग्स पण ओढतोय, टच वुड... एकंदरीत मस्त चाललै गड्याचं! रडत असतो की काय तेच ...

खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी... ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका. (Series Review)

Image
खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका.   खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे #NARCOS मलिका. अमेरिकेत गुन्हेगार साक्षीदाराला गायब करतो, कोलम्बियात 'पाब्लो' ने कोर्टच गायब केलं! - 'स्टीव्ह मर्फी.' आता हा पाब्लो कोण न हा स्टीव्ह कोण! सांगतो सांगतो... तर हा पाब्लो आहे ना तो खलनायक आहे मालिकेचा, मालिकाचे नाव आहे 'नार्कोस'... (अमली पदार्थांची निर्मिती/तस्करी करणारे ते 'नार्कोस') त्या पाब्लोच्या मागे लागलेला पोलीस म्हणजे स्टीव्ह आणि त्याचा सहकारी पण आहे एक हावी नावाचा, दोघे DEA agent . दोघे मिळून त्या पाब्लोला पकडायला जे शक्य असेल ते सर्व करत असतात, अगदी शेवट पर्यंत! असं सगळं आहे बघा, म्हणजे पोलीस आणि गुन्हेगार ह्यामधली झकाझकी, पण ह्यात वेगळं काय असा प्रश्न पडला असेल! तर वेगळेपण असय की ही कथा सत्य कथेवर आधारित आहे, जवळपास ५ ते १०% भाग रेकॉर्डेड चित्रफितींचा वापर करून सादर केलेला आहे, फारच डोकेबाज पद्धतीने तेव्हाच्या बातम्या आणि काही खाजगी चित्रफीती वापर करून वास्तविकता अजून प्रभावीपणे दाखवण्...

आक्षी!

Image
आक्षी! ती तुम्हाला वाटते ती आक्षी नव्हे! नको तेव्हा येणारी किंव्वा पाहिजे तेव्हा न येणारी! ती नव्हे, अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव म्हणजे आमचं ' आक्षी ' एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर जशी खळी पडावी ना अगदी तशीच खाली म्हणजे वळणावरच्या रस्त्यावरचा  - आक्षी चा स्तंभ, आणि त्याच वळणावर यायची ती सुंदर लाल-पिवळी साडी नेसलेली एसटी, सुंदरच ती! सौन्दर्य मनात असतं, बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी! असो, एसटी थांबली की पु.लं.च्या त्या यस्ट्यी सारख्या सर्व घटना पार पाडून झाल्या आणि एकदाचं त्या स्तंभावर ब्यागी ठेवल्या की सुरू व्हायची शर्यंत त्या मे महिन्याच्या सुट्टीच्या आखुड वाटणाऱ्या सुट्टीशी, माझी! उतरल्या उतरल्या आधी दिसायचा स्तंभ, पण माझं लक्ष्य असायचं ते एका हातगाडीवर, ती असली की माझ्या खिश्यात्ल्या एका रुपयाला जणू हजार रुपयांची किंमत यायची, एक रुपया वडा पाव, कुंठेकर काकांचा! पोटात कितीही ऐवज असला तरी तो वडा-पाव खाल्ल्याशिवाय माझी गाडी पुढे जायची नाही, गेले कित्त्येक वर्ष ते वडा-पाव एक रुपयालाच विकतात म्हणजे दर वर्षी वडयाचा आकार कमी व्हायचा, मग ...