Posts

Showing posts from April, 2020

खेळ आठवणींचा!

आठवणी नेहमी मागे असतात  मी नेमका उलटा, आठवणींच्या मागे मी असतो    एखाद्या प्रसंगी कुणाची ना कुणाची आठवण येतेच म्हणजे आता नसलेली व्यक्ती,  आजी आजोबा बाबा काही जुने मित्र  मग ते सल्ले ही देतात  'रिऍक्ट'ही होतात  आठवणींत असलेलले हावभाव, त्यांचे संवाद  तो साऊंडबोर्ड वाजतो तडीक जाम मजा वाटते! उदाहणार्थ... मॅच चालू असेल शेवटच्या टप्प्यातली  काही कमी बॉल्स मध्ये अशक्य वाटणारी धावसंख्या असेल  तर नेहमी बाबांची आठवण येते,  ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आशा ठेऊन असायचे.  असे अनेक परत परत घडणारे प्रसंग येतात आयुष्यात  त्या त्या क्षणी तो तो माणूस येऊन डोकवून जातो  #सशुश्रीके 

नशीबवान मी...

काही वर्षांपूर्वी आक्षीला गेलेलो, जुनं घर पहायची इतकी सवय होती... त्याच ठिकाणी आता आलिशान बंगला दिसला, पूर्ण नव्हता झाला, पण शेवटच्या टप्प्यात, मी गाडीतून उतरलो... कामगार येत जात होते, मी जणू काही मालकच असा शिरलो जागेत, बंगल्याच्या उजव्या बाजूने मागच्या बाजूला गेलो. आनंद आणि दुःखाचे असे काही तरी विचित्र कॉम्बिनेशन मनात खेळ करू लागले, जुन्या घरावरची कौलं, लोखंडी मोरपिशी रंगाचे खिडकितले गंज, काही लाकडं... थोडक्यात भंगारा साठी जमवलेल्या पण माझ्यासाठी असलेल्या लहानपणापासूनच्या आठवणी अश्या जमिनीवर एकावर एक रचलेल्या! डोळ्याचा कैक मेगापिक्सेल असलेला कॅमेरा मॅक्सिमम लेवल च्या अँगल मधून पॅन करत करत विहिरीपाशी आलो, दगडी आणि जेमतेम फूटभर उंची असलेल्या गोल कठड्यावर आता ३फुटी गोल भिंत पण आली होती! रहाट मात्र ठेवलेला आहे तसा होता... नशीबच त्याचं! असो, आनंद ह्याचा की अश्या अवस्थेत का होईना निदान त्या आठवणी त्या दिवशी पाहायला मिळाल्या, दुःख ह्याचं की त्या कायमच्या जाणार कुठेतरी. वस्तू काय, वास्तू काय... जीव असतो त्यांच्यात! म्हंटल तर निर्जीव, पटलं तर सजीव! आणि नाशिवंत, म्हणजेच अंत आहेच प्रत्य...

भयाण Corona

काय ना... २०२० वर्ष असलं उलथापालथ करणारं असेल असं वाटलं नव्हतं... वर्षाचा ३राच महिना! वर्क फ्रॉम होम करून ११ दिवस होतील आज, फक्त २दा बाहेर पडलो आहे ह्या दिवसात, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मनुष्य मनुष्याला इतका घाबरायला लागेल!  १० काय १०मिनिटे जरी एकटा असलो की कसं तरी व्हायचं, चुकल्या चुकल्या सारखं, आता सवय होत चालली आहे!  किती वाईट ना, जग बदललं काही महिन्यांत, आता आपण बदलत आहोत, घरी रहा... सुरक्षित रहा च्या नावाखाली सगळे स्वखुशीने काही नाईलाजाने दबले गेले आहेत. वर्क फ्रॉम होम आहेच पण ज्यांना शक्य नाहीत त्यांचे हाल, घरी बसून ज्यांना पगार हा पर्याय नाहीये त्यांचे! सकाळी संध्याकाळी त्यांसाठी प्रार्थना करतोय, निदान एवढं तरी नक्कीच करू शकतोय, ज्या संस्था अश्या लोकांना मदत करत आहेत त्याचे शतशः आभार. उगाच / अत्यावश्यक कारण नसताना लोकं बाहेर पडतायत त्यांना हे कळत नाहीये की ते ह्या विषाणूच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संपर्कात त्यांचे मित्र / नातेवाईक... अहो ते सोडा पत्नी-मुले ही येऊ शकतात आणि पुढे सांगायची गरज नाही, सगळ्यात वाईट गोष्ट अशी की लक्षणे उशीरा कळतात आणि तो पर्यंत उशीर ...

Lockdown!

ह्या Lockdown मुळे नक्की काय होतंय कळत नाही, घराबाहेर पडायला उत्सुकता आणि कुतुहलता आहे पण हिम्मत नाही, घरात बसून काम होतंय, family togetherness का काय ते असतय ते होतंय पण तरी हुरहूर बाहेर न पडता येत ह्याची, अगदी "कससच होतंय" असं म्हणतात तसं काही तरी होतंय का काय कळायला मार्ग नाही . रुग्ण वाढत आहेत, मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा 'मारणाऱ्यांची संख्या' - ह्यांच काय करावं कळत नाहिये! बँक कर्मचारी, डॉकटर, नर्सेस... झालच तर डिलिव्हरी देणारे, बिचारे... त्यांना पण असतील की पोरं बाळं, जे लोकं इथून तिथे गेले ह्या काळात ते अडकलेत! काही तर देशाबाहेर अडकलेत!!! असला सगळा विचार येतो रोज... हातात मोबाइल, डोळ्यासमोर टीव्ही, ढुंगणाखाली सोफा, वेळेवर चहा जेवण, ऑफिस मधल्या नकोत्या लोकांचे चेहरे दिसत नाहीत, सगळं कसं स्वप्नातलं घडत असताना... 'सगळं ठीक आहे पण सगळं ठीक नाहीये' असं काहीसं जीवन झालंय!  नजर लागलीय बघा जगाला आपलीच!  त्यात एक नावीन युक्तिवाद का काय ते हेतोय, Nature is taking his revenge! प्रदूषण कमी कमी होत चालले आहे वगैरे, प्राणी रस्त्यावर आणि आपण गुहेत!  आनं...