३१ डिसेंम्बर संपला, नाही नाही संपवला 🤣

वाट बघत होतो कधी एकदा १२ वाजतायत न झोपतोय
Fire works वगैरे झाले पाहून , घरी आलो, बेड वर आडवा झालो... पण कसलं काय, च्यायला झोपच लागेना, मग छानसं एक लेटरिंग केलं ते इंस्टा वर रीळ स्वरूपात अपलोड केलं ग आता यापुढं काय, झोपेचं खोबरं झालेलं मग एकच पर्याय रात्री २वाजता दुबई हिंडायला निघालो, बीच वर जायचा प्लॅन होता सकाळचा सूर्य पाहायचं ठरलं पण कसलं काय गाडी हळूच दुबई हार्बर कडे वळवली, तिथे मस्त गाडया वगैरे दिसतात, आणि अडकलो मस्त ट्रॅफिक मध्ये, २तास तिथेच! मग लागली शु, पाण्याची कमतरता नको म्हणून एक fanta आणि sparkling water घेतलेली संपली, शु ची तीव्रता इतकी वाढली की च्युविंग गम चावून चावून जबडा दुखायला लागला!

शेवटी दुबई हार्बर सर्विस लेन मध्ये एक पार्किंग मिळाले, तिथे तडीक पार्क करून मेन बिल्डिंग मध्ये घुसलो! आलिशान परिसर, तुरळक बेधुंद पब्लिक आणि काही सेक्युरिटी गार्डस असा तो माहोल!

तरातरा चालणारा मी सेक्युरिटी गार्ड दिसल्यावर लग्गेच मंदावलो, अदब पणे विचारलं की बाबा वॉशरूम कुठाय, आधीच अंधार त्यात तो कृष्ण वर्णीय आफ्रिकन, त्याचे फक्त दात दिसले आणि कानात instructions ऐकू आले, मी त्या ठिकाणी एलो जे त्याने सांगितलेले, २०फुटी उंच काचेचे दरवाजे, आतुन ३/४ सेक्युरिटी / दुबळे बॉडी गार्ड सारखे आणि त्यांच्यामध्ये २/३मुली आणि पांढऱ्या जर्सी सूट मध्ये एक बऱ्यापैकी उंच गुगुटीत नॉट सो भारी सेलेब्रिटी दिसला, मी त्याला पाहून न पहिल्या सारखं केला न त्याने मला तसच काहीसं केलं, श्रीशांत नामक टुकार क्रिकेटवीर दिसलेला, पण मला माझी शु आवरायची होती, आत गेलो ...  हलका झालो, पण मागे एक तराठ तरुण टॉयलेट च्या दिशेने हात ठेवून उभा होता न "come out" असं बोंबलत थेट लाथा मारत होता दरवाज्याला, पण आतून काही resposce नाही, ३ होते दरवाजे ३ही busy! त्यातला एक दरवाजा उघडला आणि तो तरुण बेवडा तिथे विलीन झाला, असो मी बाहेर आलो ... उत्सुकतेने जरा पाहिलं आजूबाजूला की तो not so भारी इसम दिसत आहे की नाही, पण नाही ... तो तर सोडा कोणीच नव्हतं तिथं...आता गाडीकडे परत जाणार त्यात एक जण बसलेला दिसला कठड्यावर, एकटाच होता, बग्गी चालवणारा होता, त्याला हॅपी न्यू इयर विष केलं, त्याने पण मला केलं, मग माझ्यातला आनंद जागा झाला... त्याला मुरलीलाल करून टाकलं!

साहेब ३महिनेच झालेले दुबईत अवतरून, आणि आधी होते कुवेतला ७ वर्षे! ड्राइवर होता म्हणे... एक४ मजली बंगला असलेल्या साहेबांकडे होते हे साहेब, खूप काळजी घ्यायचे म्हणे सर्व ड्रायव्हर लोकांची , विथ Ac असलेली छोटी रूम होती वगैरे वगैरे सांगत होता, आणि हे सगळं सोडून इथे का तडमडलास असं विचारलं तर म्हणाला कोणीतरी आहे त्याने मला इथे बोलावलं , चांगला आहे वगैरे सांगत होता, मग मी म्हणालो परत जावस वाटत नाही का, तर म्हणतो तो कुवेती तर मला इथे येऊन घेऊन जायला तयार आहे, असो मला आता परत जायचे वेध लागलेले, ट्रॅफिक पण बऱ्यापैकी कमी झालेलं... बायकोचा पण कॉल आलेला! म्हंटल हीच ती वेळ... चावी दाबली न गाडी पळवली... पोचलो घरी न झालो आडवा, नव्हता पाडवा... कसलं तर नवीन इंग्लिश वर्ष, हाय काय न नाय काय!

तर अशी झाली माझी सांगता १ जैन्यूवरी च्या पहिल्या प्रहराची. ☺️

आता बघू कसं जातंय २०२५

२०२४ बद्दल न बोललेलच बरं!

पुढे पाहणारा #सशुश्रीके ईज मोर पॉझिटिव्ह देन मागे पाहणारा, विश यु द सेम 😊😊😊
👌🏻



this was the place!

 31st December is over... nah, scratch that – I finished it off! 🤣

Been waiting to hit midnight so I could crash on the bed. Fireworks? Checked. Got home, flopped onto the bed... but sleep? Yeah, not happening. So, I ended up creating a cool lettering piece, uploaded it as a reel on Insta, and called it a night. Except, it wasn’t. Sleep officially stood me up.

What’s next? A drive. Yep, at 2 AM, I hit the Dubai streets. Plan? Catch the sunrise at the beach. But... guess who made a U-turn towards Dubai Harbour instead? This guy. Because cool cars and vibes, duh. Except traffic welcomed me with open arms – a full two hours of it. Then came nature’s call – water shortage prevention mode on – chugged a Fanta and some sparkling water. Bad idea. The urge went from "kind of urgent" to "emergency evacuation." Even chewing gum wasn’t helping anymore.

Finally, found parking in the service lane at Dubai Harbour. Parked like a pro, made a dash to the main building – an upscale haven filled with sleepy public and bored security guards.

Walking like I own the place, I spotted a security guard and immediately turned humble. Politely asked, “Washroom, please?” The guy, an African dude with only his teeth visible in the dim light, gave me directions in his deep voice. Followed them to 20-foot glass doors, stepped inside, and boom – fancy vibes. A few lean security dudes, two or three girls, and one tall-ish guy in a white suit who might have been a celeb. Looked at him like I didn’t care; he looked at me like he didn’t either. Turns out, it was Sreesanth, the ex-cricketer with a flair for being forgettable. Whatever, I had my own crisis to resolve.

Finally, I reached the washroom. Mission accomplished. Except, drama ensued. Some drunk dude outside was banging on a stall door yelling, “Come out!” and kicking like his life depended on it. All three stalls were occupied, and no one cared to respond. Eventually, one door opened, and the drunk guy stumbled in, claiming his throne.

As I walked out, curious to see if the not-so-heavy celeb was still around – nope. Dude had vanished into thin air. Back to my car, I noticed someone sitting solo on the railing. A buggy driver, it seemed. Wished him a Happy New Year; he wished me back. And that’s when the vibe clicked.

Turns out, Mr. Buggy Guy had only been in Dubai for three months, previously spending seven years in Kuwait as a driver. His former boss, some four-story mansion owner, treated his drivers like royalty – AC rooms and all that jazz. So why leave, I asked? Someone called him to Dubai with big promises. I asked if he wanted to go back, and he said his old boss in Kuwait was ready to take him back anytime.

Anyhow, the traffic had eased, and I had my wife’s call reminding me to head home. Hit the gas, sped back, and finally crashed. No grand celebration, no hype – just a regular ol’ start to the New Year.

So, that’s how my 1st of January kicked off.

Let’s see what 2025 holds.
As for 2024? Let’s leave it in the past where it belongs.

Looking forward like #Sashushrike – because forward is always better than backward. Wishing you the same good vibes! 😊"

 

 

 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!