"कोई कारण होगा!"
काल शनिवार, रविवारी सकाळी उठायची गडबड नाही
म्हणून मित्र आलेला बिल्डिंग खाली भेटायला, गप्पा गोष्टी करण्यात साडेबारा
कधी वाजले कळलं नाही! तितक्यात समोर नवीन दुकान उघडलेले दिसले, मी मित्राला
म्हणालो चल जाऊन बघू कसे आहे वगैरे!
आत घुसलो न काही गोष्टी घेऊन
बिलिंग काउंटर पाशी आलो तर ६/७जण रांगेत उभी.. वळून बघितलं तर मित्र एका
स्टाफ ला म्हणाला की २काउंटर आहेत, एक चालू करा रात्रीचे १२:३०झालेत पण
गर्दी बघा... हे ऐकत तो स्टाफ हातातले काम।अर्धवट सोडून काउंटर पाशी आला
आणि मशीन सुरू केले, मी बेल्ट वर गोष्टी ठेवत असताना मित्रा त्याला
म्हणाला... "thank you... आपले जैसे और लोग चाहीये यहा पे... क्यू!?"
हे
ऐकल्यावर त्या मित्राकडे मिश्किल हसत तो शांत पणे म्हणाला "no sir, i
don't want more people to suffer like me!" ऐकून मी तर थंडच पडलो! इतक्या
गर्दीत सगळे आवाज बंद होऊन भयाण शांतता जाणवली... पुढे काही नाही गपचूप
बिलाचे पैसे देत गेलो दोघे घरी.
आता लिहिताना एक भजनाची ओळ आठवली
"
एक झोली मै फुल खिले है एक झोळी मे कांटे रे कोई कारण होगा..." जगात काही
लोक प्रचंड मेहनत करून कवडीमोल पैसे कमावतात आणि काही लोक कमीतकमी कामे
करून प्रचंड पैसे कमावतात! आणि उत्तर काय ... "कोई कारण होगा!"
अती विचारी #सशुश्रीके २०२४-१२-२९
---
"There must be a reason!"
It
was Saturday night, no rush to wake up early the next morning. A friend
dropped by, and we ended up chatting downstairs near the building. Time
flew, and before we knew it, it was half-past midnight. Just then, we
noticed a newly opened store nearby. I said, "Let’s go check it out!"
We
walked in, grabbed a few things, and got to the billing counter. There
were 6-7 people in line. My friend turned to a staff member and said,
“You have two counters, right? Why not open the second one? Look at the
crowd; it’s 12:30 AM already!”
The staff member paused whatever
he was doing, calmly walked to the counter, and started the second
machine. While I was placing our stuff on the belt, my friend, with a
cheerful tone, told him, “Thank you! We need more people like you here,
don’t you think?”
Hearing this, the staff member smirked quietly and replied, “No sir, I don’t want more people to suffer like me!”
That
hit like a thunderbolt. In that noisy, crowded place, it suddenly felt
like someone hit the mute button. A chilling silence took over. Neither
of us said anything after that. We paid the bill and quietly headed
home.
Now, as I’m writing this, a line from a hymn popped into my head:
“In one sack, there are flowers, in another, there are thorns… there must be a reason!”
Some
people sweat blood and earn peanuts, while others barely lift a finger
and rake in millions. Why? Because… “there must be a reason!”
Overthinking Mode: #Activated
#Sashushrike 2024-12-29
फडणीस सर...
फडणीस सर... मॉडर्न हास्कूल जंगली महाराज रोड... इयत्ता ५वी... विषय चित्रकला... उंच, मानेतल्या शीरा दिसायच्या बोलताना, कपाळावर मस्त २इंची भगवा गंध, फुल बाह्यांचा पण दंडा पर्यंत दुमडलेला शर्ट, जराशी अखुड प्यांट, भयंकर तापट, पण हसले की जाम गोड दिसायचे... आणि हो... लुना वर यायचे, सर्व शिक्षकांमधे एकदम उंच... फिट... एकदम हटके! आमच्या सांगवीच्या खाडे महाराज बाबांचं पोर्ट्रेट केलेलं, अजुन ही मठात आहे! काय सुन्दर केलय... ओइल पेंटिंग... अगदी हुबेहूब! मुंबईतुन पुण्यात आलेलो, ५वीत असेन, चित्रकला उत्तम तयाामुळे मी लाडका, त्यांचा वर्ग भरला की माझ्याकडे आवर्जुन येणार, काय दीवे लावतोय... आणि प्रकाश पडलेला दीसला... की त्यांच्या मिशीतून दिसणारे ते स्मित हास्य यशेची पावती देऊन जायचे! जिंकलो आज... असा काहीसा चेहरा व्हायचा माझा! एक आगाऊ पणा केला होता तेव्हा पालकांना घेउन ये उद्या असं आमच्या हेड मास्तरांनी सांगितलं, तेव्हा वडलांना बाजुला घेउन हलक्या आवाजात काहीतरी सांगितलं आणि बाबा हसले, तो क्षण अजुन ही आहे तसा आठवतो, माझा गुन्हा होता मी कॉपी बाळगल...
Comments
Post a Comment