Posts

Showing posts with the label akshi

वाल

Image
आत्ता घरी हातसडीचे पोहे खात असताना एक किस्सा आठवला... आईने सांगितलेला 'वाला' बद्दल एक किस्सा... आम्ही आक्षी गावातून जात होतो, आम्ही म्हणजे मी बायको मुलगी आणि आई, समुद्रावर जाता जाता शेतजमिनी दिसत होत्या, आई आम्हाला सांगत होती... "ह्या ज्या जागा दिसत आहेत ना, त्या आम्ही भाड्याने घ्यायचो, वालाच्या शेतीसाठी." मग मी कुतूहलतेने विचारलं "मग तुम्ही विकायचे का ते!?" तर आईचं उत्तर "नाही रे, घरच्यासाठीच!" हे ऐकून मला काय बोलावं कळेच ना, म्हणजे जागा भाड्याने घेऊन मेहेनत करून पिकवलेले अन्न स्वतः च्या घरापूरते वगैरे! थोडक्यात काय *आता पैसे कमावतात...* *पूर्वी अन्न कमवायचे लोकं* म्हणून अन्नाला *चव* आणि *किंमत* दोन्ही होती! #सशुश्रीके १४/११/२०१७ (वाल*- कोकणात ह्याच वल्याची उसळ खूप प्रसिद्ध आहे) Dalimbi Usal, Val Usal, Maharashtrian Vaal by Tarla Dala - https://www.tarladalal.com/Dalimbi-Usal-Val-Usal-Maharashtrian-Vaal-4379r  

डोंगऱ्यांचा प्रवीण दादा

Image
डोंगऱ्यांचा प्रवीण दादा (भाग- १)   बांबू शोधत होता भुंगा, मी प्रवीण दादाला सांगत होतो, 'दादा... अरे हा भुंगा बघ बांबू समजून लोखंडी पायंपावर बसतोय कसा' , तो माझ्याकडे बघून हसतो, त्या हसण्यात एक निराशा होतीच... न सांगता न बोलता जाणवणारी! एखाद्या 'दादा'ला १५/२०वर्षांनी भेटणं, आणि त्याला दादा म्हणणं, वेगळं वाटतं, अडकीत्यात अडकलेली सुपारी जशी फट्ट आवाज करून फुटते तसं काहीसं! चुना लाऊन हरवलेली ती वर्ष बोटांच्या चिमटीत विसाऊन गेलेली असतात, चर्र होतं मग 'दादा' म्हणताना! काकाचं वय असताना दादा हाक मारताना. जरा मागे नेतो तुम्हाला... आक्षीच्या स्तंभाच्या जवळच वळणावर होतं डोंगऱ्याचं छोटं दुकान, किराणा मालाचं, आज ही आहे पण आता विटा सिमेंट आणि पत्र्याचं, ते जुनं नाही... शेणाने सरावलेलं, अंगणात बांबूच्या आधारावर कौलारू शेड असलेलं, २०-३०बरण्यांनी सजलेलं, ती मजा नाही, पण माणूस आहे तोच, नाव प्रवीण (दादा) डोंगरे! आई मी आणि सुषमा काकू त्याचं दुकान बघून थांबलो, त्याने लगेच 'माई, कशी आहेस!?' असा ओळखीचा प्रश्न केलाच, आई पण त्याच ओळखीने उत्तरही दिले, लहानपण...

उनाड दुपार

Image
उनाड दुपार - भाग १ झोप... छे!   झोप वगौर म्हातारे लोक्स घेतात! झोपेची वेळ तर फार महत्वाची वेळ, अक्ख गाव झोपलेलं आणि तुम्ही मस्त जेवण जिरवायला मोकळे, ताकाची चूळ भरून... दातात अडकलेले लोणी दातांच्या फटीतून खेचत उनाडगिरीला सुरुवात! पहिली भेट विहिरीला.. त्या अर्धमेल्या छोट्या बादलीला पायाने ढकलून बळजबरी 'आत्महत्या' करायला लावत माझे स्वार्थी दोन हात तिला जीवदान देण्यासाठी परत वर खेचत, का तर तांब्यातले पाणी पुरले नाही म्हणून! आणि अश्या ताज्या थंड पाण्याला कोण सोडणार, त्यातच ते पाणी अर्ध अंगावर, मग ते सुखवण्यासाठी उन्हात काठी आणि टायर घेऊन सुसाट ह्या वाडीतून त्या वाडीत. घाबरायचो नाही कोणालाच भीती मात्र वाटायची त्या भल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक खांबाची, किर्रर्रर्रर्रर्र असा अखंड आवाज, आणि त्यावर वायरांच ते जंजाळ! तिथे आलो की माझा वेग कमी असेल तर वाढायचा आणि जास्त असेल तर कमी व्हायचा! कायतरी विचित्र जागा होती ती... कोकणातलं सूक्ष्म बर्मुडा ट्रायांगल म्हणा ना! असो, रस्त्यावर पडलेल्या आणि गाड्यांच्या चाकांमुळे चिरडल्या गेलेल्या शहीद चिंचा आणि जांभळं पाहून मन कसं जड...

आक्षी!

Image
आक्षी! ती तुम्हाला वाटते ती आक्षी नव्हे! नको तेव्हा येणारी किंव्वा पाहिजे तेव्हा न येणारी! ती नव्हे, अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव म्हणजे आमचं ' आक्षी ' एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर जशी खळी पडावी ना अगदी तशीच खाली म्हणजे वळणावरच्या रस्त्यावरचा  - आक्षी चा स्तंभ, आणि त्याच वळणावर यायची ती सुंदर लाल-पिवळी साडी नेसलेली एसटी, सुंदरच ती! सौन्दर्य मनात असतं, बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी! असो, एसटी थांबली की पु.लं.च्या त्या यस्ट्यी सारख्या सर्व घटना पार पाडून झाल्या आणि एकदाचं त्या स्तंभावर ब्यागी ठेवल्या की सुरू व्हायची शर्यंत त्या मे महिन्याच्या सुट्टीच्या आखुड वाटणाऱ्या सुट्टीशी, माझी! उतरल्या उतरल्या आधी दिसायचा स्तंभ, पण माझं लक्ष्य असायचं ते एका हातगाडीवर, ती असली की माझ्या खिश्यात्ल्या एका रुपयाला जणू हजार रुपयांची किंमत यायची, एक रुपया वडा पाव, कुंठेकर काकांचा! पोटात कितीही ऐवज असला तरी तो वडा-पाव खाल्ल्याशिवाय माझी गाडी पुढे जायची नाही, गेले कित्त्येक वर्ष ते वडा-पाव एक रुपयालाच विकतात म्हणजे दर वर्षी वडयाचा आकार कमी व्हायचा, मग ...