Posts

Showing posts with the label daughter

रेड बस, मोठी! (अन्वया उवाच)

Image
रेड बस, मोठी! (अन्वया उवाच) शुक्रवार सकाळ (अरब देशातला रविवार) , मस्त आरामात उठलो आम्ही सर्वच! मी चहा करत होतो, तेव्हढ्यात अन्वयाचा आवाज आला बेडरूम मधून, 'आई, आई'… मी गेलो अन्वयाला घ्यायला, सकाळी सकाळी तिला ५-६मिनिटे कडेवर ठेवावं लागतं, जोपेत असतं ना ध्यान! मग तिला देव्हार्याच्या उंच टेबलावर किंवा ओट्यावर बसवून 'मम' करत आम्ही चहा करतो! (मम म्हणजे आपण पूजेत बायकोला करायला लावतो न तसलं मम, म्हणजे चहा तीनेही केल्याचे तीला आणि मलाही समाधान!) असो, तर मी कुठे होतो… हा तर अन्वयानी सुरुवात केली बडबडायला अन्वया - मी बस मध्ये बसलेले, तू पण होतास आई पण होती! मी - कुठली बस? अन्वया - रेड बस, मोठी! (मी मनातल्यामनात विचार करत होतो कुठल्या बस बद्दल बोलत आहे ही!?) अन्वया - रेड बस, मोठी! त्याला मोठे डोर्स पण होते! मी - ओह्हो, तुला स्वप्न पडलय का मनी? ते ड्रीम असेल ग्ग! अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) ड्रीम? मी - हो, तुला ड्रीम मध्ये दिसली असणार बस! रेड बिग बस… राईट! अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) हो! अजून २-३ मिनीटे सख...

यूनिक प्रदीप येरागी.

Image
यूनिक प्रदीप येरागी. ह्याला पहिल्यांदा २००६ ला भेटलेलो, मुंबईत कामाला होतो तेव्हा, तशी बऱ्यापैकी मोठी होती एजेंसी त्यामुळे ४-५ क्रिएटिव ग्रुप्स होते त्यातल्या एका ग्रुप मध्ये तो ज्वाइन झालेला. प्रोफेशनली इतका काही जास्त संबंध नाही आला, आणि तो ज्वॉइन झाल्यावर मी सोडला जॉब ७-८ महिन्यातच, असो... पण महत्वाचं काय, त्या कालावधीतही छोट्या छोट्या किस्यांमुळे तो लक्षात राहिला...जॉब सोडून नंतरच्या काळात ही खुप धमाल केली, एकंदरीतच खुप अवली होता! जास्त न वाढु देण्या इटपत केशरचना, ५-१०% पांढरी झालेली 2mm दाढी, आणि पिळदार मिश्या... मध्येच कुडते वगैरे घालून यायचा, फेटा काय बांधायचा! मस्त दाणेदार नाना टाइप आवाज आणि वन-लाइनर जोक्स मारण्यात जाम पटाइत! बोलताना तंद्री लागल्यासरखा मिशीला पिळ देत सीरियस टोन मध्ये बोलायचा आणि हळूच मध्ये एक जोक सोडायचा, मग समोरचा हसला नाही तर मी नाव बदलेन! इतका विरोधाभास, असा येरागी. बुलेट, यझदी चालवणारा, जुन्या गोष्टींवर भयंकर जीव असणारा, आम्ही मित्र मंडळी तर त्याला रेट्रो/व्हिंटेज मैन म्हणायचो! मुंबईत जॉबला होतो तेव्हा इतका भेटलो नाही जितका नंतर, दूबईतुन मुम्बई-पुण्...

माझी पोर ही माझी पोर!

।। श्री ।। माझी पोर जीवाला घोर बनून चोर कच्चा दोर कधी शांत थोर कधी मोठा शोर माझी पोर ती माझी पोर बारीक चण अंगात लै वणवण नुसती भणभण रोज तीच तीच गाणी चर्वण पण पण शेवटी माझीच हो.. माझीच ती पोर जीवाला घोर कधी जोरात मीठी  मनात आलं तर पप्पी लहान होतो क्षणात नाही कोणाची भीती तरी शिकवतो मधून मधून अती तेथे माती सारखं सांगतो... असलं तर सूत नाहीतर भूत अन्वयात काय नाही!? 'पेशंस' बाबात काय नाही!? उत्तर तेच... 'पेशंस!' काय शिक्लास बाबा आता सांग म्हणे हे माझं पोर... एकच पुरे नो मोर नो मोर... जीवाला घोर... जीवाला घोर माझी पोर ही माझी पोर! #सशुश्रीके (समीर शुभदा श्रीकृष्ण केतकर) १५ मे २०१५

अन्वया उवाच!

Image
'लास्ट टाईम' अन्वयाला कुठलीही गोष्ट १दा नाही २दा नाही ३दा वगैरे हवी असते उदा. - चोकॉलेट, ग्रेपस, बेबी टीव्हीचे कार्टून्स मग अमृता तिला अट घालते की आता बस हं, आता हे लास्ट टाईम आता अन्वया लास्ट टाईम ३ दा म्हणते.  — feeling आम्ही हरलो! ----------------------------------------------------- आजी ला 'ठकसा' लागलाय म्हणून ती औषध शाप्पिंग करायला गेल्ये! ----------------------------------------------------- अन्वया समोर चहा आणि चिप्स चोपत होतो म्हणते कशी… ते छी छी आहे म्हणून तू खातोयस ना!  ----------------------------------------------------- इंटरव्यू होता आज...माझा नाही,अन्वयाचा! अन्वयाचा पहीला इंटरव्यू. ऐकलं होतं, की लहान मुलांचा पण इंटरव्यू असतो आजकाल... आज पाहिलं, 'नाव काय?' पासून सुरुवात... रंग मग आकार ओळख... मग हाताची पकड कशी आहे खडू/पेंसिल वर वगैरे... सगळ उत्तम, इंग्लिश बोलता येत नसलं तरी शब्द येतात... त्यामुळे जमत होतं अन्वयाला, शेवटचा प्रश्न, नर्सरी राइम्स येतात का... पण अन्वया काय त्या प्रश्नाला भीक घालेना, आधीच नवीन चेहरा दि...

'सही' अन्वया समीर केतकर.

Image
अन्वया समीर केतकर. मला ठेवायचं होतं 'सही'... हो, 'सही' नाव का असू शकत नाही!? सही समीर केतकर! आणि मुलगा झाला असता तर 'श्रीमंत', श्रीमंत समीर केतकर मग सगळे लगेच, समीर किती रे स्वतःचा उधो उधो करशील! आणि मी मनातल्या मनात म्हणायचो, चायाला माझं पोर! आणि तुम्ही कोण सांगणारे! :P असो शेवटी अन्वया / अन्वय असं ठरलं, दोघांचा अर्थ 'नेक्स्ट जनरेशन' म्हणजेच पुढची पीढी, मला आवडलं! त्यातल्या त्यात जास्त न ऐकलेलं वगैरे वगैरे, अणि अर्थात बायकोच्या पसंतीला मान देणं हा स्वतःला मान देऊन घेण्यासारखच ना! ६/७/१२ दुपारची वेळ १.१६मिनिटांच्या आसपास आमच्या अन्वय/अन्वयाचा आवाज ऐकला, काय कसं वाटलं नाही शब्दात सांगता येत!  त्या हॉस्पिटलच्या पायर्यांवर स्तब्ध होऊन कानांचा  जास्तीतजास्त उपयोग करून आवाज ऐकण्याचा प्रयत्न! ज़रावेळानी... नर्स आली, आणि... बाळाला दाखवलं! मुलगी झाल्ये, मला काय करावं कळेना, अयुष्यात कधीच इतकं लहान बाळ पाहिलेलं नव्हतं, प्रत्यक्षात मी जमीनीच्या आत किव्वा जमीनीवर २-१ इंच होतो... मागुन अमृता आली! स्ट्रेचर वर, तीला डोक्टरांनी सांगितलं की मुलगी झाल्यॆ, हे ऐक...