माझी पोर ही माझी पोर!

।। श्री ।।

माझी पोर
जीवाला घोर

बनून चोर
कच्चा दोर

कधी शांत थोर
कधी मोठा शोर

माझी पोर ती माझी पोर

बारीक चण
अंगात लै वणवण

नुसती भणभण
रोज तीच तीच गाणी चर्वण

पण
पण शेवटी माझीच हो.. माझीच ती पोर

जीवाला घोर
कधी जोरात मीठी 

मनात आलं तर पप्पी
लहान होतो क्षणात नाही कोणाची भीती
तरी शिकवतो मधून मधून अती तेथे माती

सारखं सांगतो...
असलं तर सूत नाहीतर भूत
अन्वयात काय नाही!? 'पेशंस'
बाबात काय नाही!? उत्तर तेच... 'पेशंस!'

काय शिक्लास बाबा आता सांग म्हणे हे माझं पोर...

एकच पुरे नो मोर नो मोर...
जीवाला घोर... जीवाला घोर

माझी पोर ही माझी पोर!

#सशुश्रीके
(समीर शुभदा श्रीकृष्ण केतकर)
१५ मे २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!