'सही' अन्वया समीर केतकर.

अन्वया समीर केतकर.
मला ठेवायचं होतं 'सही'... हो, 'सही' नाव का असू शकत नाही!? सही समीर केतकर!

आणि मुलगा झाला असता तर 'श्रीमंत', श्रीमंत समीर केतकर

मग सगळे लगेच, समीर किती रे स्वतःचा उधो उधो करशील! आणि मी मनातल्या मनात म्हणायचो, चायाला माझं पोर! आणि तुम्ही कोण सांगणारे! :P

असो शेवटी अन्वया / अन्वय असं ठरलं, दोघांचा अर्थ 'नेक्स्ट जनरेशन' म्हणजेच पुढची पीढी, मला आवडलं! त्यातल्या त्यात जास्त न ऐकलेलं वगैरे वगैरे, अणि अर्थात बायकोच्या पसंतीला मान देणं हा स्वतःला मान देऊन घेण्यासारखच ना!

६/७/१२ दुपारची वेळ १.१६मिनिटांच्या आसपास आमच्या अन्वय/अन्वयाचा आवाज ऐकला, काय कसं वाटलं नाही शब्दात सांगता येत!  त्या हॉस्पिटलच्या पायर्यांवर स्तब्ध होऊन कानांचा  जास्तीतजास्त उपयोग करून आवाज ऐकण्याचा प्रयत्न! ज़रावेळानी... नर्स आली, आणि... बाळाला दाखवलं! मुलगी झाल्ये, मला काय करावं कळेना, अयुष्यात कधीच इतकं लहान बाळ पाहिलेलं नव्हतं, प्रत्यक्षात मी जमीनीच्या आत किव्वा जमीनीवर २-१ इंच होतो... मागुन अमृता आली! स्ट्रेचर वर, तीला डोक्टरांनी सांगितलं की मुलगी झाल्यॆ, हे ऐकल्यावर तीला आनंदानी रडू यायला लागलं, हां सर्व प्रकार खुपच अनापेक्षित होता, अहो असा कधी विचारच केला नाही! म्हणजे...

मी सिनेमालाही गेलो तरी अगदी टाइटल येइ पर्यन्त त्या माहोल मध्ये न-असलेला... असा!

काही तासांनी जेव्हा अन्वयाला हातात घेतलं आणि चमच्यानी दूध पाजलं. काय मजा आली! तीचे ते छोटुसे जेमतेम २सेमी चे ओठ, इवलूसे नाक, सगळच कसं, जणू मला आवडतं तसं 1/12 मिनीएचर स्केल कार मॉडल! मस्त लुशकुशीत कापडात गुंडाळलेली ती माझी पोर! बेस्ट हो बेस्ट फीलिंग.

त्यादिवशी घातलेला टीशर्ट अजुन ही आहे, त्याचं ग्राफ़िक वाला पार्ट कापून फ्रेम काराय्चा प्लान आहे! कारण, त्यावर आहे कात्री, अम्रुताचं ऑपरेशन सिझेरियन होणार हे माहीत असलं तरी योगायोगानं एक कात्रीचं ग्राफीक असलेला टीशर्ट घातलेला!

त्यावेळी हे असं लिहीण्याचं वेड असतं, तर अजुन सखोल भावना व्यक्त करता आल्या असत्या, पण ठीके, अन्वयाचा प्रवास सुरु होऊन आता सव्वा दोन वर्ष होत आली, आता लिहितोय ना! देर आए दुरुस्त आए वगैरे सारखं! 😎

असो...

तीला पाहिलं की पहात राहावासं वाटतं, कारण तो चेहरा मला परत कधीच पहायला मिळणार नाहीये, कोरी पाटी... जी नवीन असते ना... अगदी तशी, तीच आठवते मला! मोठी का होत्ये ही असा प्रश्न विचारला की अरे असं म्हणु नए वगैरे शब्द थोबाड़ावर आदळतात! मी आपला मग 'बरं' असा फुलस्टॉप लाऊन विषय बदलतो.

बाकी भाषा कुठलीही असो, उदा. गाणी... मराठी बालगीते, हिंदी, तमिळ सिनेमा गीते, इंग्लिश पॉप हीने २-३दा ऐकली की गात सुटते! मजा येते, काय मस्त ना! मला १०वेळा ऐकून ही दुसर्या भाषेची गाणी गुणगुणता येत नाहीत.. अणि ही २वर्षाची पोर... गाते कसली! त्यात म्युजिकला पण सोडत नाही, त्याचे पण आवाज, अगदी गाडीच्या इंडीकेटर चा आवाज ही! कह्हर!!!

आणि 'मला मम्मम दे...' असं न म्हणता 'अन्वयाला मम्मम दे'
असं पूर्वीचे लोक स्वतःला मान देऊन बोलल्या सारखं तीचं बोलणं ऐकून जाम 'रॉयल' मजा येते!

बाईसाहेब जागव्तात ही कधी कधी पण असो, इतर मुलांसारखं लहानपणी अमेरिकन स्टैण्डर्ड टाइम नुसार जागवलं नाही हे नशीब!

लोकं (काही लोकं) म्हणतात की तीचे फोटो अपलोड नको करत जाउस, चार चौघात तीचं सारखं कौतुक नको वगैरे! पण दुःख पसरवण्या पेक्षा सुख वाटण्यात काय वाईट आहे, अणि... आणि उपाय आहेच की! 'नजर' काढतोच ना आम्ही तीची! दर शनिवारी., राहिलं कधी तर दुसर्या दिवशी.

असो हां सर्व ज्याचा-त्याचा वय्यक्तीक विचार आहे, काही लोकं नाही शेअर करत त्यांच्या मुलांचे फोटो वगैरे! प्रत्येक नाण्याला २ बाजू असतात, मी एक बाजू निवडल्ये.

असो बैक टू माझी अन्वया, दिसायला हुबेहूब बायको सारखी, देवाला मागितली एक त्यानी दिल्या दोन! अजुन किती नशीबवान असावं लागतं हो! खरच टच-वुड! माझ्या आणि अमृताच्या आई वाडलांची पुण्याई असा स्टीकर लावायचा राहिलाय गाडीच्या मागे! :)

पण 'सही' नाव, नको नको... अन्वया किती मस्त नाव आहे नई! असं स्वतःशीच बोलत असतो!

अन्वया... देव तुला आणि तुझ्या सारख्या सगळ्या मुलांना सुख समृद्धि ऐश्वर्य आरोग्य देओ! गोड पप्पी... अन जोरात मीठी...

तुझा बाब्बा... मीर शुभदा श्रीकृष्ण केतकर.


#सशुश्रीके | २४ ऑक्टोबर २०१४, सकाळचे २.१६



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!