Posts

Showing posts with the label food

मानाचा मुजरा!

घाण पाऊस होता, दुकानाच्या पायरी वर कसाबसा उभा होतो, हवा तर इतकी होती की पाऊस वरून पडतोय की खालून कळेना, इतका भिजलेलो की विचारू नका, समोर टपरी वर कंदीलातला दिवा जेमतेम दिसत ह...

काही लोकांना शिक्रण आवडते...

🍌 लोकांना काय आवडेल काय नेम नाही, बघा ना काही लोकांना शिक्रण आवडते, काय आहे ना मला एक तर दूध आवडत नाही त्यात केळं तर अजिबात नाही, ह्या दोघांची ती शिक्रण... 😑 आणि "कोकणस्थ असून शिक्रण आवडत नाही असं कसं!" मग माझा प्रतीप्रश्ण... "तुला मटकी उसळ / कारल्याची भाजी / आळूचं फदफदं आवडतं का?" उत्तर हो आलं तर आलिंगन आणि  "नाही" आलं तर "तसच मला शिक्रण नाही आवडत" ... सोपं आहे गणित! 😉 लहानपणी दादा / काका / मामा मंडळी तोंडाने  फुरsssफूरsss  आवाज करत पोळ्यांबरोबर खायचे, त्याने तर अजूनच आवडेनासं झालं ते प्रकरण! त्यात काही लोकं त्यात तूप ओततात... बाबो भलतेच शौकीन चामारी! लिहितानाच कसं तरी होतंय!!! 🙄 शेवटचं एक: आयुर्वेद सांगतं, दुधात फळ 'मिक्स' करू नयेत, कोणीही ऐकत नाही बघा आयुर्वेदाचं पण 😟 #सशुश्रीके २६/०९/२०१७

दडपे पोहे

Image
ओला खवलेला नारळ, तो पण वाडीतला... हातसडीचे पोहे, थेट भट्टीतून घरी आणलेले, मिरचीची फोडणी किव्वा लोणचं, मस्त पांढरा कांदा विळीवर बारीक चिरलेला, पण सगळ्यात महत्वाचे हे सर्व आजीच्या त्या प्रेमळ हाताने बनवलेले! ते दडपे पोहे 👌  जगातला कुठला ही पदार्थ आणि ते दडपे पोहे, अशक्य तुलना! आणि वाढताना ही चमचा नाही, मस्त हातानीच... आणि खतानाही हातच! स्वर्ग सुख होतं ते, पायऱ्यांवर गोणपाटावर पाय ठेऊन कुठीतरी तंद्री लागायची आणि तोंडात लाळेचा महापूर 😙 #सशुश्रीके | १२ मे २०१७

दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम...

लिफ्ट मध्ये भयाण शांतता असते, आणि मॅक्सिमम कॅपसिटी १०लोकं असेल आणि त्यात तेव्हढीच लोकं असतील तर काही बघायला नको, डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी लोकं वर खाली *शून्य अवकाशात शून्य* पाहात असतात, तेवढ्यात एक आवाज येतो, नको तिथून... ...म्हणजे पोटातून... भूक लागल्यावर येतो तो! 😯 माझ्या बाजूलाच एक लठ्ठ माणूस डोळे वर करून *हे आत्ताच व्हायला हवं होतं का?* अश्या भावनेचा चेहराविष्कार करतो. 🙄 माझ्या हातात असलेला बिस्कीट पुडा मी हळूच त्याच्या हातात सुपूर्त करतो, तो घ्यायचा नाहीये ह्या शरीराविष्कार तुडवत हातात घेतो. तेव्हढ्यात माझा मजला येतो. 🚶🏽 🤚 राहूदे चा हाताविष्कार फुलवत मी माझ्या मजल्यावर रवाना होतो. धन्य ते पोट... धन्य त्याचं नशीब! 😂 दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम ते हेच! 😇 #सशुश्रीके

पान!

Image
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे... त्यामुळेच तर ते पान टिकतं ना, मस्त सांभाळून घेते २ही बाजू, जणू काही पुस्तकाची बांधणीच. खाद्यपरार्थ स्वरूपात मांडलेल्या त्या हिरव्या गडद पाना वरची ज्ञानाची भूक काही औरच! त्या पानावर जेवण असले की त्या गर्द हिरव्या रंगावर जो काही पदार्थ उठून दिसतो, त्याला तोडच नाही... पांढरा शुभ्र भात त्यावरचं नाजूक पिवळं वरण आणि त्याहून नाजूक साजूक तूप! मस्तच कॉन्ट्रास्ट, आजूबाजूला कोशिंबीर, आळूच्या वड्या, चटण्या, बटाटा भ...

अपेक्षा...

अपेक्षा! आज पाडवा... संध्याकाळी माझे सासू सासरे आणि आम्ही सगळे मित्र परिवार बाहेर पडलो जेवायला, 'जाफ्रान' नावाच्या रेस्टोरंटमध्ये गेलो, रेसेप्शनलाच एका वेट्रेसने तोंडाव...

दही पूरी...

Image
दही पूरी...   नव्या सांगवीत राहायचो तेव्हा सांगवी फाट्यावर ४-५ गाड्या असायच्या...गाड्या म्हणजे, एक चायनीज, २भेळवाले.. वडापाव भजीपाव वगैरे, अश्या गाड्या, पुण्यातुन बसनी आलो की, किंवा संध्याकाळी सायकल वरुन घरी येताना 'अनअव्होईडेबल' अश्या त्या गाड्यांमधल्या त्या भेळवाल्याकडे माझे पाय जाऊन थांबायचे स्टूलापाशी... गम्मत म्हणजे त्या स्टूलावर कधी बसलेल्या भेळवाल्याला मी कधी पाहिलच नाही, बघावं तेव्हा हातात मोठा चमचा, मसाला पूड, पुऱ्या वगैरे वगैरे, अखंड भेळ-पूरी-पुराण चालूच! २ भाऊ होते, राजस्थानी असावेत, एक गायब असला की विचारायचो कुठे गेलाय!? उत्तर असायचं 'गाँव गया है, आजाएगा अगले हफ्ते', दोघांच्या हातात जादू होती...त्या जादूसाठीच गर्दी असायची, एक पाणी पूरी खाल्ली की २री खायच्चच पब्लिक! मला भेळ आवडायची नाही इतकी, कधी भेळ खायची इच्छा झालीच तर मुठभर खारे दाणे टाकायला सांगायचो, पण पूरी रिलेटेड सगळं खायचो, रगडापूरी, शेवपुरी, शेवबटाटादहीपूरी वगैरे... हे सर्व लिहायचा खटाटोप इतक्या साठी की त्याच्याकडे दहीपूरी असली भन्नाट चवीष्ठ ल...

फूडी वीकेंड!

काल एका रेस्टरन्ट मध्ये गेलेलो, मला वाटलं राजस्थानी असेल! श्री गंगोर फ़ूड चैन वालं, निघालं इटालियन! नाव पण जरा विचित्र होतच म्हणा, OTTIMO RESTORANTE, तेव्हाच जराशी संशयाची पाल चूकचुकलेली! ...

'भेलवलेय्या-भेलवलेय्या'

Image
।।श्री।। 'भेलवलेय्या -भेलवलेय्या' लहानपणी मावशीकडे राहायचो बोरिवालीत, तेव्हा एक भेळ वाला भैया यायचा, एका मोठ्या ताटाला एक मोठा अल्युमिनियम पत्रा गोल, दर्शनी भागावर,त्या भेळवाल्याचे नाव, भेळीचे प्राकार आणि निरनिराळ्या भेळींचे रेट्स. तो सगळा प्रकार डोक्यावर घेऊन आणि खांद्यावर इंग्रजीतला 'एच' सारखा दीसणारी लाकडी काठी घेऊन यायचा 'भेलवलेय्या -भेलवलेय्या' ओरडत, जमीनीवर तो 'एच' ठेवला की त्याचा 'एक्स' आकाराचा स्टैंड व्हायचा, त्यावर त्याचा खजिना, यायचा धड-न-दीवस- न-रात्र असलेल्या वेळी, तो आला की आमच्या बिल्डिंगच्या ट्यूबा पकपकायला लागायच्या, मग बिल्डिंगा मधली तमाम गुजराती मूलं काही कैथलिक (ह्यांचं नाव जामच लक्षात राहिलीत 'हैंडी-हेमिल्टन', बाकीच्यांची नावं विसरलो पण अशीच 'अमित-राहुल' वगैरे टिपिकल नावं) सगळे जमायचे, हातात नाणी/नोटा घेऊन, अधाशा सारखं त्या भैया कडे बघत, मग तो भेळवाला दिसेनासा व्हायचा, त्याच्या आजूबाजूला मुलांचं कडं व्हायचं, अमुक जास्त घाल तमूक घालुच नकोस आणि हा सर्व प्रकार मी आमच्या खिडकीतुन बघत असातचो, पण कधी ...

भुकमय बडबड

२वर्ष सहन केलं... शेवयांचा उपमा आणि दूधी/पडवळ ह्यासारख्या पाइपसदृश भाज्या! २००५-०७च्या दरम्यान, ब्राम्हण वाडीत राहायचो तेव्हा एकांच्या कडे डबा लावलेला, लहानपणी भाजी आवडली नाही की घासाबरोबर गटागटा पाणी प्यायचो... पण हा डबा खाताना ते करायचं बाळबोध डेरिंग व्हायचं नाही. कधी कधी इतका राग यायचा, की डबा अक्खा आमच्या मागच्या खिडकीतून स्वाह: किंवा पिशवीतुन फलाटावरच्या गरजू लोकांना, तो खिडकीचा मूर्खपणा १-२दाच केलेला.. पण ठीके! राग येतोच, व्यक्त करायची पद्धत चुकली! असो... माझा डब्यात बहुदा ह्या पाइपयुक्त भाज्या ५०%असायच्या पण माझा रुमपार्टनर नीलमच्या बाबतीत ते पर्सेंटेज ८०इतकं होतं! बिचारा खायचा जे मिळायचं ते, त्याला बघुन माझीच जास्त चीडचीड व्हायची! त्याला म्हणालो एकदा... की सोड ना, दूसरीकडे लाव डबा... तर नीलम अमोल पालेकर स्टाइल मध्ये म्हणाला, नको रे, नलु आत्या ह्यावरच जगतात, आता ह्यावर मी काय बोलणार! थांब मी पण लावतो तिथे डबा हे म्हणण्या इतका मी (नेमका शब्द मिळत नाहीये) अमोल पालेकर नव्हतो. दुपारचा तो चवीष्ठ डबा गिळला की ओफ्फिस वर संध्याकाळी भूक तर लागायचीच. एक जयराम नावाचा साउथ इंडियन होता, आमच...

हल्ली चटका तव्यावरुन खिश्यात थेट!

हल्ली चटका तव्यावरुन खिश्यात थेट! कॉलेजच्या वेळी वडापाव, मिसळ, साबू खिचडी, पोहे...क्वचीतच वडा सांबार, डोसे... कच्छी दाबेली किंवा सैंडविच असले प्रकार हाणायचो, सकाळचा नाश्ता ते संध्याकाळची भूक... ५-१०-१५ रूपयात पोटाला आधार मिळायचा... त्यातल्यात्यात महाग पण उत्तम पदार्थ म्हणजे लक्ष्मी रोड वरचे एक उपहार गृह... नाव नेमके आठवत नाही पण तिथे उत्तम मराठी पदार्थ मिळायचे... उदा. मटार करंज्या वगैरे, महाग होते पण दर्जा पण तसाच! मग मुंबईत जॉबला असताना पुण्यात यायचो वीकेंडला तेव्हा तो मधला फ़ूडकोर्ट.. तीथला २५रुपयाचा वडापाव ऐकून डोळे फीरायचे... बाकीच्या गोष्टीतर विचारायलाच नको! २००३मध्ये डोमिनोज पिझ्झा आणलेला बाबांनी..२५०-३०० रुपये... मला घरी आईने किम्मत विचारल्यावर कळालं... नंतर २००४ मध्ये पुण्यात मैकडोनाल्ड सुरु झाले असेल, पण कधीच गेलो नाही... ते बर्गर वगैरे प्रकरण कधी आवडलच नाही, २००७ मध्ये दुबईत आलो... इथे मैकडोनाल्डच काय तर जगतले सगळे फ्रेंचायझीज कानाकोपऱ्यात, पण वेज असल्यामुळे सबवे सैंडविच नायतर वेज-बर्गर / फ्रेंच-फ्राइज / डोनट्स इथपर्यंतच मजल... आणि दुसरा पर्याय म्हणजे मुम्बई चौ...