दडपे पोहे





ओला खवलेला नारळ, तो पण वाडीतला...
हातसडीचे पोहे, थेट भट्टीतून घरी आणलेले,
मिरचीची फोडणी किव्वा लोणचं,
मस्त पांढरा कांदा विळीवर बारीक चिरलेला,

पण सगळ्यात महत्वाचे

हे सर्व आजीच्या त्या प्रेमळ हाताने बनवलेले!

ते दडपे पोहे 👌 


जगातला कुठला ही पदार्थ आणि ते दडपे पोहे,
अशक्य तुलना!
आणि वाढताना ही चमचा नाही,
मस्त हातानीच... आणि खतानाही हातच!

स्वर्ग सुख होतं ते, पायऱ्यांवर गोणपाटावर पाय ठेऊन कुठीतरी तंद्री लागायची आणि तोंडात लाळेचा महापूर 😙

#सशुश्रीके | १२ मे २०१७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!